Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 31 मार्च 2021,Horoscope Today

आजचे राशी भविष्य 31 मार्च 2021,Horoscope Today

मेष –

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक

- Advertisement -

स्थितीला बिघडवू शकते. जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते.

वृषभ –

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आजच्या दिवशी धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. कुठल्या पार्कमध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

मिथुन –

आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल.

कर्क –

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्या राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील.

सिंह –

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे! जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो परंतु, घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात.

कन्या –

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्याप्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येनंतर ही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर, तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकतात.

तुळ –

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. घरातील गरजांना पाहून आज जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होऊ शकते. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.

वृश्चिक –

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. वेळेचा सदुपयोग करणे शिका. जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर, काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी भेेट देतील.

धनु –

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि धनलाभही होऊ शकतो. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.

मकर –

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल.

कुंभ –

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. विना कुठल्या पूर्व सूचनेने नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो.

मीन –

मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी तुम्ही अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. व्यवसायात नवी आघाडी सुरु करण्यासाठी शुभ दिवस. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या