मुत्सद्दी जयशंकरांवर रवीची कृपा!

मुत्सद्दी जयशंकरांवर रवीची कृपा!

नशिबात मोठा चमको असता त्या व्यक्तीची घोडदौड कुणीही थांबवू शकत नाही. परंतु नशीब साथ देताना सातत्याने मेहनत, प्रयत्न व अक्कल हुशारीने केलेली कामे जीवनात खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर होत. त्यांची निवड 1977 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत झाली. तेथपासूनच त्यांच्या आयुष्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. भारताच्या परराष्ट्र सेवेत नोकरी करणारे जयशंकर 2019 पासून गुजराथ राज्यामधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर भारताचे विदेश मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली. परराष्ट्र व्यवहारातील प्रशासकीय योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. अलिकडे युरोपसह अमेरिकन देशांच्या जागतिक दादागिरीला त्यांच्याच पद्धतीने सुनावल्यामुळे त्यांची ही मुत्सद्देगिरी विशेष चर्चेत आहे. त्यांच्या धाडसी परराष्ट्र नितीमुळे अ‍ॅफ्रो-आशियाई देशांत त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे.

जयशंकर यांना रशियन, इंग्रजी, तमिळ, हिंदी, संभाषणात्मक जपानी, चिनी आणि काही हंगेरियन भाषा अवगत आहेत. सात भाषा समजणारे व बोलणारे जयशंकर यांच्या बुद्धिमत्तेची व विद्वत्तेची प्रशंसा जगभरात होते. मातृभाषा सोडून कोणतीही भाषा अवगत करायला मेहनत लागते. मातृभाषेसह सहा भाषा समजणे व त्यावर प्रभुत्व असणे ही मोठी गोष्ट आहे. परराष्ट्र सेवेत असताना तेथील बोली भाषा येणे, त्यातल्या त्यात रशियन व चिनी भाषा येणे हे खूप महत्वाचे आहे. इंग्रजी भाषा भारतात नवीन नाही. परंतु जपानी भाषा सुद्धा त्यांना अवगत झाली, ते त्यांची दुसरी पत्नी जपानी असल्याने घडले. या सर्व भाषा अवगत असल्याचा जयशंकर यांना त्यांच्या जीवनात परराष्ट्र खात्यात काम करीत असताना खूप मोठा फायदा झाला असणार यात वाद नाही.

बोटांवरच्या ठश्यांवरून व्यक्तीच्या अंगचे कौश्यल्य, विद्वत्ता, कल व बुद्धिमत्तेची पातळी कळते. जयशंकर यांच्या हातावरील ठश्यांचे फोटो उपलब्ध नसले तरी हातारील रेषा व ग्रह यांच्या अभ्यासाने व्यक्तीच्या अंगची बुद्धिमत्ता कळते. बोटांच्या ठश्यानुसार तीन प्रकारचे कौशल्य व्यक्तीच्या अंगी कमी जास्त प्रमाणात असते. त्यात काही व्यक्तींना कानाने ऐकू आलेले जास्त लक्षात राहते. काहींना प्रत्यक्ष डोळ्याने खात्री करून गोष्टी लक्ष्यात राहतात तर काहींना गोष्टी आत्मसात करण्यासाठी सराव करणे आवश्यक असतो. या तीनही महत्वपूर्ण बाबी ग्रहांच्या कारकत्वात समाविष्ठ असतात. गुरु ग्रह विद्वत्ता देतो, बुध ग्रह हुशारी व चातुर्य देतो, शनी ग्रह चिकाटी व संशोधनास कामाला येतो, मंगळ ग्रह धाडस देण्याबरोबर सारासार विचार शक्ती, निर्णय क्षमता व युक्ती बहाल करतो. चंद्र ग्रह कल्पना विस्तार, योजना व नियोजन देतो, शुक्र ग्रह प्रेम, रोमान्स व रोमँटिक भावना प्रदान करतो. सूर्य ग्रह, मान सन्मान कीर्ती बहाल करतो व कलाकौशल्य प्रदान करतो. हातावरील प्रत्येक बोटाखाली ग्रहाचे स्थान आहे, वरचा मंगळ व चंद्र ग्रहाला बोट नसले तरी, बुधाचे बोट म्हणजे करंगळीच्या खाली अनुक्रमे बुध, वरचा मंगळ व खाली मनगटापर्यंत चंद्र ग्रहाला स्थान आहे या तिन्ही ग्रहांचे कारकत्व करंगळीत समाविष्ट असते. हातावरील रेषा ज्या ज्या ग्रहावर जाऊन थांबतात किंवा उगम पावतात अथवा त्यांच्या प्रवासात त्या ग्रहावरून जातात त्या वेळेसत्या ग्रहांचे कारकत्व त्या रेषेस बहाल होत असते.

त्यांच्या तळहाताचे वैशिष्ट्य असे कि प्रमुख रेषा त्यांचे उगम व शेवट हे रेखाशास्त्राच्या नियमानुसार आहे, म्हणजेच भाग्यकारक रेषा आहेत. तळहातावर भाग्याला आडव्या येणार्‍या प्रभाव रेषांची गर्दी नाही, दोन प्रभाव रेषा आहेत. याही चंद्र ग्रहावर आहेत व त्या शुभकारक आहेत. चंद्र ग्रह शुक्र ग्रहापेक्षा मनगटाकडे अधिक चा उभार घेतल्याने जयशंकर यांच्याकडे अधिकची विद्वत्ता लाभली आहे. हातावर बोटांची उंची प्रमाणात आहे. पहिले गुरुचे व तिसरे रवी ग्रहाचे बोट लांबीला सारखे आहेत. करंगळीची लांबी उत्तम आहे. ती रवी ग्रहाच्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍याच्यावर गेली असल्याने त्यांचेकडे वक्तृत्व आहे. हातावरील चारही बोटे शास्त्रानुसार प्रमाणशीर आहेत. त्यामुळे बोटांखालील ग्रह अनुक्रमे गुरु, शनी, रवी व बुध शुभकारक आहेत. बोटांची लांबी कमी जास्त असता त्या त्या बोटांखालील ग्रहांमध्ये न्यूनता येते. जयशंकर यांच्या हातावरील भाग्य रेषा शुक्र ग्रहावरून उगम पावते आहे. आयुष्य रेषेला छेद देताना आयुष्य रेषा तुटली आहे. परंतु दोनही आयुष्य रेषा एकमेकींच्या समोर थोड्या लांबीला असल्याने गंडांतर योग् झाला नाही. शुक्र ग्रहावरून उगम पावलेली भाग्य रेषा त्या व्यक्तीच्या आयुष्यात निश्चितच ऐश्वर्य प्रदान करते. जय शंकर यांच्या हातावरील आयुष्य रेषेला छेद देऊन शनी ग्रहावर जाणारी भाग्य रेषा वय वर्ष 22 पासून बारीक झाली आहे. पुढे तिसाव्या वर्षा पासून हि भाग्य रेषा तलम व आणखी बारीक होत शनी ग्रहावर जाऊन थांबली आहे. तेथून पुढची भाग्यरेषा अत्यंत भाग्यकारक आहे.

आयुष्य रेषा वयाच्या 47 च्या दरम्यान थांबलेली असली तर शुक्रावरून येणार्‍या भाग्यरेषेत ती विलीन होत आहे. या भाग्य रेषेने आयुष्य रेषा सांधली गेली आहे. मनगटाच्या जवळून शुक्र ग्रहावरून उगम पावणारी भाग्य रेषा आयुष्य रेषा व भाग्य रेषा अश्या दोनही कारकत्वाने हातावर असल्याने आयुष्य रेषा तळहाताच्या मध्य भागी थांबली असली तरी जयशंकर यांचा जीवन प्रवाह भाग्य रेषेत विलीन होत असल्याने त्यांना आयुष्मान योग आहे. जयशंकर यांच्या हातावर तीन आयुष्य रेषा आहेत. त्यापैकी पहिली गुरु ग्रहाखाली मस्तक रेषा व आयुष्य रेषा एकत्रित वय वर्ष 22 पर्यंत आहेत. त्यामुळे जयशंकर हे थोरा मोठ्यांचा सल्ला ऐकून घेतात, समजावून घेतात व त्यानंतरच निर्णयाप्रत येतात. याचे कारकत्व मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांचा प्रवास एकत्रित असल्याने त्यांना लाभला आहे. हि आयुष्य रेषा वयाच्या 47 वर्षाला थांबली आहे. तसेच हातच्या मध्यावरून भाग्य रेषेला जोडून तिसरी आयुष्य रेषा मनगटाकडे जात आहे. हि रेषा सुद्धा त्यांना निरोगी आयुष्य बहाल करते आहे.

मस्तक रेषा चंद्र ग्रहावर न उतरता थोटीशी खालच्या बाजूला तिरकी होऊन वरच्या मंगळ ग्रहावर हाताच्या कडेपर्यंत आहे. वरचा मंगळ ग्रह या मस्तक रेषेने उच्चीचा केला आहे. त्यामुळे थंड डोक्याने विचारपूर्वक निर्णय करून मुत्सद्देगिरीला अतिशय पूरक असा हा वरचा मंगल ग्रह जय शंकर यांना लाभला आहे. हृदय रेषा गुरु ग्रहावर सरळ गेली आहे. ती कमानदार नाही. त्यामुळे मुत्सद्देगिरीत आपल्या देशाचा व स्वतःचा पहिला विचार ते करतात. भावनेच्या भरात वाहवत जाणे त्यांना मंजूर नाही. चंद्र ग्रहावर एक रेषा हाताच्या बाहेरून आत रवी रेषेपर्यंत जाऊन मिळाली आहे. हि रेषा त्यांना कुठल्याही अंतिम निर्णयापर्यंत जाण्यासाठी, ग्रहपाठ व विचार मंथन करायला लावतात. चंद्रावरची हि रवी रेषेत जाऊन मिळालेली आडवी रेषा त्या व्यक्तीला तिच्या कामात, व्यवसायात चोवीस तास संशोधनात्मक विचार करायला लावते. तसेच त्यांच्याकडे असलेल्या विषयातील विद्वता तर वाढवितेच शिवाय आपल्या कामाच्या विषयाशिवाय त्यांच्या डोक्यात दुसर्‍या विषयाचे विचार येत नाहीत.

जयशंकर सध्या भारताचे विदेश मंत्री आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. तरीही ते त्यांच्या कामाच्या विषयात वेड्यासारखे झपाटल्यागत निरंतर मंथन व संशोधन करीत असतात. मुसद्देगिरीत बाजी मारतात. चंद्र ग्रहावरून मनगटाच्या बाजूने अजून एक रेषा त्यांच्या हातावर उगम पावते आहे. ती मस्तक रेषेत जाऊन मिळत आहे. हि उभी चंद्र ग्रहावरची रेषा परदेशातील वास्तव्याबरोबरच भविष्यातील घटनांची चाहूल देणारी आहे. चंद्र ग्रहावरची रेषा मस्तक रेषेत जाऊन मिळाल्याने जयशंकर यांच्या मनाप्रमाणे व कल्पनेप्रमाणे भारत देश्याच्या हिताच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलण्यात व मुत्सद्देगिरीत यश मिळवून देण्याचे कारकत्व सामील आहे. जयशंकर यांचा हातावरील अंगठा मजबूत, लांब व दोन्ही पेरे प्रमाणात असल्याने त्यांची विचारशक्ती अफाट आहे व नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा त्यांचा बाणा हा अंगठ्याच्या दुसर्‍या पेर्‍याने बहाल केला आहे. त्यांच्या हातावरची सर्वात जबरदस्त व उच्च गुणांनी युक्त अशी रवी रेषा भाग्य रेषेतून उगम पाऊन ती थेट रवी ग्रहावर जाऊन थांबली आहे. हि रेषा त्यांना देशो देशीच्या राजनैतिक राजदरबारात, शिष्टाचारानुसार मान्यवरासोबत मानसन्मान, ख्याती, कीर्ती देत आहे. रवी ग्रहावर आणखी एक रेषा हृदय रेषेतून उगम पावते आहे व ती करंगळीच्या पेर्‍यात जाऊ थांबली आहे. रवी बुध एकत्रित कारकत्वाची रेषा देशोदेशी विदेशात मान सन्मान बहाल करते आहे. पद्मश्री एस.जयशंकर यांच्यावर रवी ग्रहाची कृपा आहे. त्यामुळेच

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com