हरहुन्नरी, उत्साही व रांगडा रणवीर

भविष्य आपल्या हाती
हरहुन्नरी, उत्साही  व रांगडा रणवीर

रणवीर सिंग यांचा जन्म 6 जुलै 1985 रोजी मुंबईत एका सिंधी कुटुंबात झाला. भारताच्या फाळणी दरम्यान त्याचे आजी-आजोबा सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथून मुंबईत आले. चित्रतारका सोनम कपूर यांच्या आईकडून मामे भाऊ व अभिनेते अनिल कपूर यांचे ते भाचे होत. अभिनेता व्हायचे हे त्याचे आधीच ठरविले होते.

अनेक शालेय नाटके आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला. मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर रणवीरला समजले की चित्रपट उद्योगात यशस्वी होणे हे अजिबात सोपे नाही. कारण चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या लोकांना चित्रपटात प्राधान्याने संधी मिळते. शिवाय अभिनयाची कल्पना खूप दूरची आहे, असे वाटून रणवीरने सर्जनशील लेखनावर लक्ष केंद्रित केले. अमेरिकेत गेला. तिथे इंडियाना विद्यापीठातून कला पदवी प्राप्त केली.

अमेरिकेत शिकत असताना अभिनयाचे धडे घेण्याचे ठरवले आणि 2007 मध्ये शिक्षण पूर्ण केले. मुंबईत परतल्यानंतर कॉपीरायटर म्हणून नामांकित जाहिरातीत एजन्सीत काम केले. तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. अभिनयात यश मिळविण्यासाठी जाहिरात एजन्सीचे काम सोडून दिले. सर्व प्रकारच्या ऑडिशन्स देण्यासाठी चकरा मारायचे. पण त्यांना काही चांगल्या संधी मिळाल्या नाहीत. फक्त किरकोळ भूमिकांसाठी कॉल येत होते. रणवीर निराश होता.

पळत्याच्या पाठीमागे लागलो की काय, असा विचार मनात यायचे. सुमारे तीन वर्ष चित्रपटात भूमिका मिळण्यासाठी स्टुडिओत चकरा मारल्या. जानेवारी 2010 मध्ये यशराज फिल्म्सच्या कास्टिंग विभागाचे प्रमुख शानू शर्मा यांनी ऑडिशनसाठी बोलावले होते. बँड बाजा बारात नावाच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली ती इथेच!

आदित्य चोप्रा यांनी ऑडिशन टेप पाहिल्या आणि चित्रपटाचा नायक बिट्टू शर्माच्या भूमिकेत रणवीर फिट बसतो, याची त्यांना खात्री पटली. ही रणवीरसाठी मोठी संधी ठरली. त्यानंतरही रणवीर आडिशन द्यावी लागली, कारण दिग्दर्शक मनीष शर्मा यांना पूर्ण खात्री करायची होती. सुमारे दोन आठवड्यांच्या चाचणीनंतर रणवीरला बिट्टूच्या प्रमुख भूमिकेसाठी होकार मिळाला. अनुष्का शर्मा नायिकेच्या मुख्य भूमिकेत होती. बँड बाजा बारात चित्रपट रिलीज होण्यापूर्वी विश्लेषकांनी यशराज फिल्मच्या या चित्रपटाच्या यशावर प्रश्नचिन्ह लावले होते. मात्र बँड बाजा बारात सुपर हिट झाला. रणवीरने रंगविलेल्या बिट्टूची प्रशंसा झाली. आज त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत.

अभिनेता म्हणून यशाच्या शिखरावर आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणशी विवाह झाला. अभिनेता म्हणून रणवीरने प्रयत्नांची पराकाष्ठा करत हरहुन्नरी, उत्साही, रांगडा अभिनेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे.

आयुष्य रेषा - आयुष्य रेषा हा शारीरिक क्षमता दाखविते. शारिरिक क्षमता जर अंगी नसेल तर व्यक्तीचे प्रयत्न अपुरे पडतात. यश मिळण्यात अडचणी येतात. व्यक्ती काबाडकष्ट करण्यात कमी पडते. त्यासाठी आयुष्य रेषा ह्या खणखणीत हव्यात. सुदृढ, पूर्ण लांबीची व निर्दोष असावी लागते. आयुष्य रेषा जाड पातळ असेल, रंगाने गडद पसरट असेल, आडव्या रेषांनी छेदलेल्या असतील, अपुरी व खूप पातळ असतील तर शारीरिक क्षमता कमी असते. आयुष्य रेषेत बदल होत नाही. आयुष्य रेषा सुदृढ किंवा निर्दोष होऊ शकत नाही. आयुष्य रेषा सशक्त असेल तर दुर्बल होते, ती व्यक्तीच्या अव्यवस्थित जीवनशैली व शुद्ध खानपान नसल्याने. व्यायामाचा अभाव, जंक फूड, व्यसन या व अन्य गोष्टींमुळे आयुष्य रेषा दुर्बल होते. रणवीरच्या दोन्ही हातावरील आयुष्य रेषा कणखर, निरोगी असल्याने यशात शारीरिक क्षमतेचा मोठा उपयोग करून घेता आला. व्यक्तीच्या अंगी असलेली ऊर्जा, उत्साह हा निरोगी शरीर उत्तम आयुष्य रेषा असल्याचे लक्षण आहे.

हृदय रेषा - हृदय रेषा कमानदार व गुरु ग्रहावर म्हणजेच पहिल्या बोटाच्या खाली जाऊन थांबलेली असावी. रणवीर यांंच्या दोनही हातावर तिची स्थिती वर्णन केल्याप्रमाणे अतिशय शुभ आहे. हृदय रेषा प्रेम ,भावना व वात्सल्याचे प्रतीक आहे. शिवाय गुरु ग्रहावर तिचा शेवट झाल्याने गुरु ग्रहाची सर्व शुभ गुण हृदय रेषेला लाभले आहेत. उजव्या हातावरील हृदय रेषेचा एक फाटा गुरु ग्रहावर सरळ गेल्याने यांच्या प्रेम भावना तीव्र असतात. त्यामुळेच रणवीर यांनी दीपिका सोबत प्रेमविवाह केला.

मस्तक रेषा - मस्तक रेषा ही बुद्धिमत्तेचे प्रतिनिधित्व करते. मस्तक रेषा तळहातावर आडवी जाते.पहिल्या बोटाखाली, आयुष्य रेषेपासून उगम पाऊन पुढे सरळ गेली तर मंगळ ग्रहाचे गुण व मनगटाकडे थोडी जरी वळली तरी मस्तक रेषेला चंद्र ग्रहाचे गुण लाभतात. रणवीरच्या डाव्या हातावर मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरली आहे. ही रेषा कल्पना शक्ती व अभिनयात गती देते. उजव्या हातावरील मस्तक रेषा मंगळ ग्रहावर गेल्याने प्रयत्नवादी व विचारपूर्वक निर्णय क्षमता प्रदान करते. याचा फायदा आयुष्याच्या 2007 ते 2010 पर्यंतच्या तीन वर्षाच्या संघर्षाला निर्धारपूर्वक सामना करण्यासाठी कामाला आला.

बुध रेषा - बुध रेषा व्यक्तीला आत्यंतिक हुशारी प्रदान करते. बुध रेषा असता व्यक्ती युक्तिबाज असते. दुसर्‍याच्या पोटात शिरून काम करून घेण्यात हे लोक तरबेज असतात. हे लोक आपल्या हुशारीचे प्रदर्शन करण्यात निष्णात असतात. यांच्यापेक्षा हुशारी असलेले लोक मागे पडतात. रणवीरच्या दोन्ही हातावरील बुध रेषा शुभ असल्याने हे लोक दुसर्‍यावर छाप पाडण्यात यशस्वी होतात.

भाग्य रेषा - रवी रेषा - अभिनयाबरोबरच रणवीर पटकथा व संवाद लेखनाने प्रसिद्ध होणार असे संकेत आहेत. डाव्या हातावरची भाग्य रेषा वय वर्ष 31 पासून शुभ झाली आहे व उजव्या हातावरील भाग्य रेषा वयाच्या 25 वर्ष पासूनच अर्थार्जनाला सुरवात करणारी आहे. रवी रेषेचा विचार करता डाव्या हातावर वयाच्या तिशीपासूनच आहे व उजव्या हातावरील रवी रेषा ही वयाच्या 22 वर्षापासून शुभ झाली आहे. त्यामुळेच यश मिळायला सुरवात झाली व हे यश दोन्ही हातावरची रवी रेषा शुभ असल्याने नमूद केलेल्या वयानंतर उत्तरोत्तर मानसन्मान वाढत जाणार आहे.

रणबीर यांच्या दोनही हातावरील रवी रेषेला हृदय रेषेतून निघालेल्या एक फाट्याने छेद दिला आहे. तेथे एक त्रिकोण झाला आहे. या रवी रेषेला छेद देणारी रेषा रणवीरकडून उत्तम कथा, पटकथा लिखाण करून घेणार आहे. वयाच्या 45 वर्षानंतर हे होणार आहे. रणवीर यांच्या हातावरील बोटे, हाताचा आकार व मुख्यतः अंगठा मजबूत आहे. निर्णय ठाम आहे. यश मिळविण्यासाठी प्रयत्न आहेत. यश मिळाल्यावरही पुढे कार्यरत राहण्याची मनीषा आहे. हे सर्व हात हाताचा आकार व बोटे प्रमाणबद्ध असल्याने घडत असते. रणवीरने आपली शारीरिक क्षमता, नृत्य व अभिनयात लागणार्‍या टेक रिटेकसाठी मजबूत केली आहे. रणवीर मेहनतीत कुठेही कमी नाही. उर्जा आणि कामावरील निष्ठा यात रणवीर कधीही कमी पडणार नाही. कारण हाताच्या ठेवणीबरोबरच हातावरील सर्व ग्रह शुभ योगात आहेत. त्यांची साथ कायम मिळालेली आहे मिळत राहणार आहे .

रणवीरने अथक मेहनत व ग्रहांच्या साथीमुळे यश मिळवले आहे. हातावरील रेषा सामान्य लोकांप्रमाणे आहेत परंतु रेषा व शुभ ग्रहांच्या साथीने तो यशाच्या शिखरावर आहे. यशा पाठोपाठ मानसन्मान येतो व मान सन्मानाबरोबरच लक्ष्मी प्राप्तीचे दरवाजे खुले होतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com