Friday, May 10, 2024
Homeभविष्यवेधहर हर शंभो..

हर हर शंभो..

प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्र (Shivratri) म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात. परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र (Shivratri) ही महाशिवरात्र (Shivratri) म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्रीला (Shivratri) अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे.

महाशिवरात्र म्हणजेच भगवान शंकराची महान अशी रात्र. महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते. भगवान शंकरांंच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र होय.

- Advertisement -

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. परंतु माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला जे शिवरात्र येते तिला महाशिवरात्री असे म्हणतात.महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती…

महाशिवरात्रीच्या पौराणिक कथा – प्रत्येक सण वा उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा या असतातच, त्याप्रमाणेच महाशिवरात्रि सण साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहेत.

पहिल्या कथेनुसार, ज्यावेळी सागर मंथन झाले त्या वेळी संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. विश्वाची निर्मिती होत असताना समुद्रातून हलाहल विष देखील बाहेर आले. या हलाहल विषामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याची शक्ती होती. भगवान श्रीशंकरांनी हलाहल विषयाला प्राशन करून संपूर्ण ब्रह्मांडाला वाचवले.

परंतु विष प्राशन केल्याने शिव शंकराचा कंठ निळा झाला, व त्यांचा संपूर्ण देह दहा करत होता. या वेळी वैद्याने भगवान शिवाला संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितले. त्यावेळी सर्व देवांनी मिळून भगवान शिवशंकर जागे् ठेवण्यासाठी नृत्याची आणि गायनाची व्यवस्था केली. विष पिल्याने संपूर्ण शरीरात दाह होत सल्याने भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य केले. अशा प्रकारे भगवान शंकर संपूर्ण सृष्टीला वाचवले म्हणून या दिवशी महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो.

महाशिवरात्री दिवशी भाविक रात्रभर भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, कीर्तन, गायन अशा कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण रात्रभर जागरण करतात.

दुसर्‍या कथेनुसार, एक शिकारी होता,तो रोज शिकार करून आपल्या पूर्ण कुटुंबाचे पालन करीत होता. एके दिवशी तो शिकार करण्यासाठी निघाला. संपूर्ण दिवस तो शिकार करण्यासाठी जंगलात फिरू लागला परंतु त्याला एकही शिका न मिळाल्याने त्याने रात्रीच्या अंधारात शिकार करण्याचे ठरवले. तो एका झाडावर चढून बसला ते झाड होते बेलाचे, या झाडाच्या खाली महादेवाची पिंड सुद्धा होती. शिकार नीट दिसावे म्हणून तो बेलाच्या झाडाचे एक एक पान तोडून खाली टाकत होता, नकळत ते पान महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडत होते.

पहाटेच्या वेळी तिथे एक हरिण आले, शिकारी ने त्या हरणावर नेम धरला. शिकारी बाण सोडणारच होता तोवर ते हारीण म्हणाले, हे पारध्या तु बाण सोडणार आणि माझी शिकार करणार हे अटळच आहे, परंतु मी तुला विनंती करतो तू माझी शिकार करण्याच्या अगोदर मला एकदा माझ्या संपूर्ण कुटुंबाला भेटू दे, माझी सर्व कर्तव्य मला पार पाडून येऊ दे.. हरणाने त्य शिकार्‍याला वचन दिल्याने, शिकार्‍याने त्याची विनंती मान्य केली. थोड्यावेळाने शिकार्‍याच्या समोर हरणाचा संपूर्ण परिवार येऊन थांबला व प्रत्येक जण म्हणू लागला, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून शिकार्‍याला आश्चर्य झाले. त्यानंतर शिकार्‍याने पूर्ण कुटुंबाला सोडून दि,ले व तेव्हापासून शिकार करण्याचेही सोडून दिले. शिकार्‍याची रात्री उपवास घडला व त्याच्याकडून शिवलिंगाची पूजा झाली. त्यामुळे शिकारी पावन झाला. अशाप्रकारे महाशिवरात्रीच्या पुराणांमध्ये कथा आहेत.

तर काही कथेनुसार असे कळून येते की, महाशिवरात्री या दिवशी शिव शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. म्हणून महाशिवरात्र साजरी केली जाते. त्यामुळे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे .

महादेवानी या दिवशी तांडव नृत्य केले होते. महादेवांना शांत करण्यासाठी व भुलोकाचा विनाश टाळण्यासाठी सर्व लोकांनी भगवान शिव शंकराकडे प्रार्थना केली होती.

महाशिवरात्रीचे व्रत करणार्‍या साधकाला मोक्षप्राप्ती होते, असे आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे. महाशिवरात्री म्हणजे प्रपंचात राहून माणसाचे कल्याण करणारे व्रत. या व्रताचे पालन केल्याने साधकाचे सर्व दु:ख, वेदना संपतात, तसेच मनोकामनाही पूर्ण होतात. शिवाची आराधना केल्याने धन-धान्य, सुख-सौभाग्य, समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. भक्तीभावाने आणि भावनेने आत्म्यासाठी हे अवश्य केले पाहिजे, सप्तलोकांच्या कल्याणासाठी भगवान आशुतोष यांची पूजा करावी भगवान भोलेनाथ.नीलकंठ आहेत, विश्वनाथ आहेत.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रदोष काल म्हणजेच सूर्यास्तानंतर रात्र होण्याच्या दरम्यानचा कालावधी, म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीला प्रदोष काल म्हणतात. त्याचवेळी भगवान आशुतोष प्रसन्न मुद्रेत नाचतात. याच वेळी लोकप्रिय भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. यामुळेच प्रदोषकाळात भगवान शंकराची पूजा करणे किंवा शिवरात्रीला भगवान शंकराचा जागर करणे फार शुभ मानले गेले आहे. प्रदोष काळात महाशिवरात्री तिथीला सर्व ज्योतिर्लिंगांचा उदय झाल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या