आनंदी माणूस व्हा!

आनंदी माणूस  व्हा!

तुमच्याकडे महान हेतू असू शकतात, तुमच्याकडे महान महत्त्वाकांक्षा असू शकतात, तुमच्याकडे अनेक इच्छा असू शकतात, परंतु मूलभूतपणे, या जगात तुम्ही जे काही करता त्या सर्व गोष्टी तुमच्या आत असल्याचे दर्शवितात.

या ग्रहावर, मानवजातीला झालेली बहुतेक हानी, बहुतेक दुःख, बहुतेक त्रास हे सर्व केवळ चांगल्या हेतूनेच केले गेले आहेत, वाईट हेतूने नाही. या ग्रहात जास्तीत जास्त मानवी कत्तल आणि हत्या फक्त चांगल्या हेतूने घडली आहे.

जर तुम्ही जगाकडे पाहिले तर हा संघर्ष चांगल्या आणि वाईट दरम्यान नाही. स्वतःला चांगले म्हणवणारे लोकच नेहमी लढत आहेत. जगात दहशतवादी म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या माणसाला, त्याला आपण खूप चांगलेच आहोत असे वाटते. स्वतःला तो जितका चांगला समजतो, तितका अधिक तो आपल्यासाठी भयानक ठरतो. तुम्ही स्वतःला जितके चांगले समजता तितके जास्त संघर्ष करता. वाईट माणसं एकमेकांशी भांडत नाही आहेत. नेहमीच चांगली माणसं, चांगल्या हेतूने भांडत असतात.

तर आपले हेतू ठीक आहेत, परंतु मूलभूतपणे, प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वत: वर काम करणे आवश्यक आहे कारण तुम्ही तुमच्या अज्ञानातून जे काही करता, त्यातून तुम्ही केवळ स्वतःला आणि तुमच्या सभोवतालच्या जगाला अपाय करत असतात.

माणसाची पहिली आणि सर्वात मूलभूत जबाबदारी म्हणजे एक आनंदी माणूस बनणे; कारण तुम्ही काहीही करत असा किंवा तुमच्या जीवनात तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात याने काही फरक पडत नाही, मग तो व्यवसाय असो, पैसा, सत्ता, शिक्षण, सेवा किंवा तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करत आहात, कारण आतून कुठेतरी तुम्हाला वाटतं की हे केल्याने तुम्ही आनंदी व्हाल.

आम्ही करत असलेली प्रत्येक कृती ही आनंदी होण्याच्या आकांक्षेतून उभारून येत आहे. आज आपण इतक्या प्रचंड ताकदीने आनंद शोधत आहोत की या ग्रहावरील समस्त जीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात घालत आहोत. गेल्या 100 वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या ग्रहावर बरेच काही केले गेले आहे. अशा अनेक सोयी आणि सुविधा आहेत ज्यांचा 100 वर्षांपूर्वी कधी स्वप्नातही आपण विचार करू शकलो नसतो. असे असूनही, आपण हे म्हणू शकत नाही की 100 वर्षापूर्वी मानवजात जितकी आनंदी होती तितकी ती आजही आहे.

म्हणून तुम्ही करत असलेले कोणतेही कृत्य काय हेतूने केले जाते हे महत्त्वाचे नाही, कारण मूलभूतपणे तुम्ही जे आहात तेच करायचा प्रयत्न करत आहात. म्हणून मनुष्याने आपल्या आयुष्यात हे कार्य हाती घेतले पाहिजे. बाह्य गोष्टी किंवा व्यक्तीमुळे नव्हे तर स्वतःला स्वत: च्या नैसर्गिक स्वभावाने आनंदी मनुष्यात घडवलं पाहिजे - असं झालं नाही तर नकळत, चांगल्या हेतूने, मनुष्य त्याच्या सभोवतालचे सर्वकाही नष्ट करेल.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com