सेवेतून मिळतात आशिर्वाद !

jalgaon-digital
2 Min Read

मानव महान कार्य करतो त्यापैकी इतरांची सेवा करणे हे कार्य होय. देत रहा, देत रहा, देत रहा. अनेकजण आपल्याकडील प्राप्त वस्तू देताना चिंतीत असतात कारण त्याची अशी समजूत असते की दिल्याने आपल्याला कमतरता भासेल.

त्यांना ठाऊक नसतं कि सृष्टिच्या विपुलतेच्या नियमानुसार मोठ्या मनाने आणि कृतज्ञता भावनेने इतरांना दिलेली गोष्ट अथवा वस्तू ती कोणत्याही अन्य मार्गाने आपल्याचकडे परत येते.

जेंव्हा आपण देतो तेंव्हा आपला कधीच तोटा होत नाही. अशीही शक्यता असते की एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करण्याची संधी मिळते, त्याग करण्याची संधी, त्यानुसार आपण दिलेली वस्तू आपल्याला परत मिळाली असेल, किंवा परिस्थिती बदललेली असेल, किंवा ती वस्तू देण्याची गरजच वाटली नसेल.

तरी सुद्धा दुसर्‍यांची सेवा करण्यामुळे समाधानाचे जे बक्षीस मिळते तेंव्हा आपल्याला जाणवतं की आपल्यावर प्रभु कृपेचा वर्षाव होत आहे. आपण देवाचे आभार मानतो की आपण स्वार्था ऐवजी सेवाभावाची निवड केली.

इतरांना देण्यासारखी अन्य कोणतीही प्रसन्नता नाही. जे निस्वार्थ भावनेने देतात त्यांना कळून चूकते की देण्याने कधीच नुकसान होत नाही. न मागता भरभरून कृपेचा वर्षाव आपल्यावर होत असतो आणि आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी एकरुप होण्याचे ध्येय कमी कालावधीत प्राप्त करू शकतो. आपल्या हृदयात प्रभू प्रेमाची भर पडते. सेवा करण्यामुळे आपल्याला मिळालेल्या प्रेरणेतून आपण अध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करू शकतो.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *