गृहलक्ष्मी भाग्यवान तर कुटुंब नशीबवान

गृहलक्ष्मी भाग्यवान  तर कुटुंब नशीबवान

घरची लक्ष्मी भाग्यलक्ष्मी असेल तर आर्थिक सुबत्ता असते! प्रत्येक व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा रुपी भाग्यलक्ष्मी असते. ही भाग्य रेषा केवळ आर्थिक बाबी दाखविते. संपूर्ण आयुष्याचा आर्थिक आलेख भाग्यरेषारुपी प्रत्येकाच्या हातावर असतो. स्वयं ब्रम्हाने प्रत्येकाच्या जीवनातील आर्थिक समृद्धीची भाग्य रेषा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आराखडा अंकित केलेला असतो. काही मंडळी जन्मतःच आर्थिक बाबींचे सौख्य घेऊन आलेले असतात. ते संचिताचा डाव्या हातावर व कर्माच्या उजव्या हातावर भाग्य रेषाद्वारे दर्शविलेले असते.

सून भाग्यवान तर कुटुंब धनवान

हिंदू विवाह पद्धतीत मुलीला विवाहाच्या वेळी लक्ष्मी स्वरूप समजतात. माप ओलांडताना, पहिल्यांदा सासरला आल्यावर लक्ष्मीपूजन असते. नववधूचे लक्ष्मी पूजन म्हणजे ज्या सासुरवाडीत नववधूचे कायमचे वास्तव्य असते त्या सासुरवाडीत तिला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. मुलगी जेव्हा सासुरवाशीण होते, तेव्हा ती सून म्हणून ओळखली जाते. सुनेचा प्रवेश भाग्याच्या पावलांचे आगमन समजले जाते.

घरात येणारी सून किती भाग्यवंत आहे, यावर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक सुबत्तेचा अंदाज बांधला जातो. अर्थातच सून भाग्य घेऊन आली आहे, तिला तिच्या सासुरवाडीत कुठलीही कमतरता असत नाही. घरात लग्न झाल्यानंतर आर्थिक संपन्नता वाढलेली अनेक कुटुंबे आपण पाहतो.

यासाठी घरात येणार्‍या सुनेचे अथवा पत्नीचे भाग्य थोर असावे लागते. ती भाग्यवंत असल्यास व तिच्या आयुष्यात भगवंताने कुठलीच आर्थिक विवंचना दिली नसल्यास, त्या लक्ष्मी स्वरूप सुनेला किंवा पत्नीला सुखात ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाचे आर्थिक गणित सुधारतेे. कुटुंबाचे भाग्य नववधूच्या भाग्यामुळे बदलते.

नववधू गृहिणी असेल तरी तिच्या भाग्यामुळे तिच्या हाती पैसा राहतो. तिला प्रदान झालेल्या भाग्याप्रमाणे तिच्याकडे आर्थिक आवक असते. कुटुंबाच्या सर्व गरजा, सौख्य अथवा आर्थिक संपन्नता आदी बाबींचा लाभ होत असतो. याउलट येणार्‍या सुनेच्या पदरी भाग्य नसेल, सौख्यात उणेपणा, कायमची आर्थिक चणचण, पैसा पुरा न पडणे, हातात नसणे असे प्रकार असल्यास स्वप्न पूर्ण होत नाही. भाग्यात जेवढ्या आर्थिक विवंचना दिल्या आहेत, त्याला सामोरे जावे लागते.

काही घराणे पिढ्यान् पिढ्या धनाढ्य व अतिश्रीमंत असतात. काही लोक जीवनात उद्योग धंद्यात यश मिळवून श्रीमंत होतात. काही आपल्या प्रतिभेवर श्रीमंत होतात. काही राजकारणात आल्यावर अब्जाधीश होतात. काही चंदेरी दुनियेच्या रुपेरी पडद्यावर यशस्वी होतात. काही स्वतःच्या कला, हुशारीवर श्रीमंत होतात. गरीब व दारिद्य्र रेषेखालील वर्ग जर सोडला तर अन्य वर्गाला लक्ष्मी प्रसन्न असते, असे मानता येईल. अति श्रीमंताला देखिल काही विवंचना आहेत. मात्र आपण येथे आर्थिक आवक व लक्ष्मी प्रसन्न असण्याबाबत विचार करत आहोत.

तरच लक्ष्मी प्रसन्न

1. पूजा पाठ, व्रत वैकल्य, तपस्या, उपासतापास, वास्तूदोष निवारण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मी नशिबातच असावी लागते.

2. सत्कर्म करणार्‍याला व दोन नंबरच्या धंद्यावाल्यांनासुद्धा लक्ष्मी प्रसन्न असते.

3. तुमचा उद्योग धंदा कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यावर लक्ष्मी प्रसन्न असत नाही.

4. पापभिरू, सज्जन व भोळ्या व्यक्तींवर सुद्धा लक्ष्मी अप्रसन्न असू शकते.

5. मेहनत व जास्तीचे प्रयत्न, कष्ट घेणार्‍या व्यक्तीच्या नशिबी 15 ते 30 टक्क्यांपर्यंत नशिबापेक्षा जास्त लक्ष्मीचा लाभ मिळतो.

6. काही भाग्यवान व्यक्तींच्या नशिबी अचानक धनलाभ असतो, सट्टा, लॉटरीत तर काही दत्तक गेल्यानंतर त्यांचे नशीब पालटते.

7. वाडवडिलांची व दूरच्या नातेवाईकांची संपत्ती बर्‍याच व्यक्तींच्या नशिबी असते. पण ते कुठल्या वयात मिळणार हे लक्ष्मी ठरवते. अर्थातच त्याच्या खाणा खुणा हस्त सामुद्रिकशास्त्राद्वारे संपत्ती कधी मिळेल याचे निश्चित भाकीत करता येते.

8. लक्ष्मी नशिबात आहे तोपेर्यंत ती थांबते. नशिबाच्या मापाप्रमाणे आर्थिक लाभ देते. लक्ष्मीची साथ प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळ्या वय वर्षात असते.

9. लक्ष्मी ही नशीबवान व्यक्तीच्या भाग्यात असते.

ज्याअर्थी लक्ष्मी कृपा सज्जन, दुर्जनांवरही प्रसन्न असते त्याअर्थी लक्ष्मी ही मनुष्याच्या संचितात असावी लागते. जोपर्यंत संचितात लक्ष्मीकृपा असते. तेव्हा ती व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या व गुन्हेगारालाही प्रसन्न असते. शिक्षा भोगत असताना सुद्धा व्यवसायात प्रचंड कमाई होत असल्याची अनेक उदाहरणे आपणास दिसतील. अशा व्यक्ती शिक्षा भोगून झाल्यावर संपत्तीचा उपभोग घेताना दिसतात.

खूप सज्जन, विद्वान, हुशार, भोळा, नेकीने काम करणार्‍या व्यक्तींच्या नशिबातही लक्ष्मी अप्रसन्न असू शकते. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती हि नशिबातच असावी लागते. व्यक्ती परत्वे लक्ष्मी कृपा भिन्न असते. तसेच काही काळासाठी अरुष्ठ तर काही काळात चलती असते. काहींना कायम अरुष्ठ तर काहींना कायम चलती असते.

गृह लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी प्रसन्न असेल तर कुटुंब नशीबवान असते. परंतु या उलट परिस्थिती असू शकते. पुरुष देखिल भाग्यवान असतात. घराण्यातील एखादा कुलदीपक हा नशीबवान असतो त्याला लक्ष्मी प्रसन्न असते. तो जे काही व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करेल त्यात त्याला कायम बरकत असते. नुकसान होत नाही. काही घराणे, राजकारणी, उद्योजक पिढ्यान पिढ्या श्रीमंत असतात. काही कुटुंबे पिढ्यानपिढ्या गरिबीत असतात. 80 टक्के जनतेला त्यांचा चरितार्थ भागविता येईल एवढीच आवक लक्ष्मी देते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com