Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधजे सर्वोत्तम आहे ते इतरांना द्या!

जे सर्वोत्तम आहे ते इतरांना द्या!

कोणतेही कार्य करताना ते चांगल्या प्रकारे सर्वोत्तम केले पाहिजे. यात कोणीही यावे, हा एकच दृष्टिकोण असला पाहिजे. हा दृष्टिकोन अनुभवावर आधारित आहे आपल्या सर्वांच्या अंतरी प्रभू परमात्मा आहे. म्हणून प्रत्येक जण महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सर्वांच्या अंतरी आत्मा आहे आणि आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत. जेंव्हा आपण या दृष्टिकोनातून एखादे कार्य करतो तेंव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या कडून काही चांगले प्राप्त व्हावे अशी अपेक्षा करतात. प्रत्येकाच्या हृदयात प्रभू विराजमान आहे हे लक्षात घेऊन त्याचा आदर केला पाहिजे.

समाजातील काही लोक ठराविक माणसांना खूष करण्यासाठी मेहनत घेतात. ते आपल्या मालकांना, साहेबांना, श्रीमंतांना किंवा यामुळे त्यांच्यावर उपकार होतील या हेतूने आपल्याकडील सर्वोत्तम देत असतात. परंतु खर्‍या अर्थाने तेच लोक महान आहेत जे सर्वांच्या सोबत समान व्यवहार करतात.

- Advertisement -

असाच एक संदेश आहे की – आपण काहीतरी करतो आणि आपल्याला असं वाटते काही ठराविक लोकच याचा फायदा उठवितात. किंवा काही ठराविक लोक या कार्याची स्तुती करतात. त्यामुळे आपण निराश होता कामा नये. असं सांगितलं जातं की जर आपण एखाद्याच्या जीवनात बदल करू शकलो तर तेंव्हा आपण जीवन जगण्यास योग्य ठरतो. जर आपण काही प्रयत्न केला आणि भले जास्त लोक जमले नाहीत तरी सुद्धा आपण दुसर्‍याची मदत करतोच. जरी एक दोन व्यक्ती आल्या तरी आपण असा विचार करता कामा नये की जे करण्याची योजना आपण तयार केली होती त्याकरता काही लोक पुढे आलेत, असे म्हणणे अयोग्य ठरते. हे, लक्षात घेण्याची बाब आहे कि आपण लोकांच्या जीवनात एक बदल घडवून आणत आहोत. त्यासाठी मेहनत करीत आहोत. परंतु या कार्याचा काही थोडे लोक लाभ घेतात. तेंव्हा त्या लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. आपण निराश होऊन आपले प्रयत्न सोडता कामा नयेत.

आपण जी कृती करतो तिला प्रभू पहात असतो. आपण आपले सर्वोत्तम करीत राहिले पाहिजे. बक्षीस सेवा करण्यामध्ये आहे, सेवेच्या फळात नाही. अशाप्रकारे, आपण जर जीवन जगलो तर आपण रोज रात्री निश्चिंतपणे समाधान व शांतीने झोप घेऊ शकू. कारण आपण आपले सर्वोत्तम दिलेले आहे. आपल्या अंतरी आनंद व प्रसन्नतेचे वरदान प्राप्त होते, जे आपले सर्वोत्तम दिल्यावर मिळत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या