Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधनकारात्मक उर्जेपासून सुटका!

नकारात्मक उर्जेपासून सुटका!

वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. दिशा आणि उपदिशांनुसार वस्तू किंवा फोटो ठेवल्यास त्यापासून सकारात्मक उर्जा मिळते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वायु, अग्नि, पाणी, माती, उजेड, गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय भाग अशा तत्त्वांचा अभ्यास करून वस्तुंची मांडणी केली जाते. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास नकारात्मक उर्जेचं सकारात्मक उर्जेत रुपांतर केलं जाऊ शकतं. घरात युद्ध, हिंसक प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो लावल्यास घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पण काही फोटोंमुळे विशेष लाभही असतात, त्याबाबत जाणून घेऊयात

घरातील दक्षिण भिंतीवर लावा फिनिक्स पक्ष्याचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर फिनिक्स पक्ष्याचा फोटो असणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते. घरातील लीविंग रुम म्हणजेच हॉलच्या दक्षिण दिशेला फिनिक्स पक्ष्याचा फोटो लावू शकता.

या फोटोवर घरातील सर्व सदस्यांची नजर पडेल आणि त्यातून लाभ मिळेल. फिनिक्स पक्षी हा अग्नि तत्त्वाचा कारक आहे. तसेच प्रसिद्धी आणि प्रगतीचा द्योतक मानला जातो. फिनिक्स हा एक काल्पनिक पक्षी आहे. हा पक्षी राखेतून जन्म घेतो असं मानलं जातं. हा पक्षी उडताना सूर्यासारखा तेजस्वी दिसतो. या पक्षाला इजिप्त संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. पौरणिक कथेनुसार या पक्षाची शेपूट सोनेरी किंवा जांभळ्या रंगाची असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या