Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधशनी ग्रहाकडून हार्दिकला बळ

शनी ग्रहाकडून हार्दिकला बळ

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमधील सुरत येथे झाला. त्याचे वडील हिमांशू पंड्या सुरतमध्ये एक लहान कार फायनान्स व्यवसाय चालवत होते. जो त्यांनी बंद केला आणि हार्दिक पाच वर्षांचा असताना वडोदरा येथे राहायला गेले. आपल्या मुलांना वडोदरा येथील किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. हार्दिकने ज्युनियर स्तरावरील क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती केली आणि क्लब क्रिकेटमध्ये बरेच सामने एकहाती आपल्या संघासाठी जिंकले. तो 2013 पासून बडोदा क्रिकेट संघाकडून खेळत आहे. त्याने 2013-14 हंगामात बडोद्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या तो आस्ट्रेलियात विश्वचषक खेळत आहे. साखळी सामन्यात अपेक्षीत कामगिरी उंचावता आली नसली तर हार्दिक उपांत्य आणि अंतिम सामन्यात ठसा उमटवू शकतो, अशी ग्रहांची साथ त्याला आहे. शनी ग्रहाकडून मिळणारे बळ हार्दिकला यापुढेही उत्तम क्रिकेट खेळण्यासाठी पुरक आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

कुठल्याही व्यक्तीच्या ठायी नैपुण्य, कला असता त्या व्यक्तीला तिच्या जीवनात योग्य वेळी संधी मिळणे गरजेचे असते. ही संधी फक्त नशिबाची साथ असेल तरच त्या नैपुण्याचे सोने होते. व्यक्तीच्या अंगी नैपुण्य आहे, कला आहे परंतु नशिबाची साथ नसेल तर ती आयुष्यात त्या नैपुण्यात यशस्वी होऊ शकत नाही. हार्दिक नशीबवान आहे. त्यामुळेच आयुष्यात अंगी असलेल्या क्रिकेटमधील नैपुण्यामुळे लहान वयात मेहेनत घेऊन यशस्वी झाला.

- Advertisement -

भाग्य रेषेचा आयुष्य रेषेतून उगम – हार्दिकची भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पाऊन थेट शनी ग्रहावर जाऊन पोहोचली आहे. ही अतिशय भाग्यकारक असून ती हार्दिक यांच्या आयुष्यात आर्थिक चणचण तर येऊ देणार नाही. शिवाय नशिबाला साथ देणारी आहे. आयुष्य रेषेतून भाग्य रेषा उगम पावत असेल तर यांचे कामे बिनबोभाट होतात. आयुष्यात अडथळे आले तरी यांचे कामे थोड्या दिवसात सुरळीत होतात. त्याच्या हातावरील दुहेरी मस्तक रेषा हार्दिक यांच्या मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांचा उगम एकत्रित आहे. वयाच्या 17 वर्षी मस्तक रेषा आयुष्य रेषेतून स्वतंत्र झाली आहे. म्हणजेच वयाच्या 17 व्या वर्षी हार्दिक स्वतंत्र निर्णय घेण्यास सबळ झाला. आयुष्य रेषा व मस्तक रेषा एकत्र असताना व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम नसतात. मात्र अश्शा व्यक्तींवर वडीलधार्‍याची शिकवणूक, वडीलधार्‍यांचा आदर व त्यांच्यावर झालेले उच्च संस्कार व त्यांना आयुष्यभर साथ देतात. त्या मानाने आयुष्य रेषेपासून मस्तक रेषा स्वतंत्र उगम पावत असेल तर अशा व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात व त्यांची आयुष्यातील तत्वे सुद्धा वेगळी असतात.

हार्दिकच्या हातावरील मस्तक रेषेचा एक फाटा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेला आहे. त्यामुळे व्यवहारी बनला. शिवाय मस्तक रेषा मेहनत करून घेणारी आहे. तिच्यात अनुशासन व शिस्त सम्मिलीत आहे. मस्तक रेषेचा दुसरा फाटा हा हाताच्या मध्य भागापासून मुख्य मस्तक रेषेतून स्वतंत्र होऊन चंद्र ग्रहावर उतरला आहे. चंद्र ग्रहावर उतरलेली मस्तक रेषा कल्पकता देत आहे. क्रिकेटमधील कसब आत्मसात करून त्याचा उपयोग सामन्यात कसा करावा याची अंतःप्रेरणा देत आहे. या चंद्र ग्रहावर आलेल्या मस्तक रेषेने हार्दिकच्या अंगभूत कौशल्यात भर घातली आहे. चंद्र ग्रहावरून मणिबंधाच्या थोड्यावर एक स्वतंत्र अंतःप्रेरणेची बारीक रेषा मस्तक रेषेच्या फाट्याला जाऊन मिळत आहे. या रेषेचे वैशिष्ट्य म्हणजे ऐनवेळेस वेगळा निर्णय घेण्याची क्षमता. फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना ती उपयोगी पडते. चंद्र ग्रहावरची मस्तक रेषेला जाऊन मिळालेली हि रेषा देश-विदेश प्रवास घडविते. या प्रवासात यश, मान व सन्मान मिळतो. जो हार्दिकच्या बाबतीत क्रिकेटमधून मिळत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण हाताचा आकार – खेळतील नैपुण्य असो अथवा कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य असो, ज्या व्यक्तीला विविध कला अवगत आहेत किंवा विशेष नैपुण्य आहे की, जे जादुई हाताने यशस्वी करतात ते शल्यचिकीत्सक, चित्रकार, मूर्तिकार, कारागीर असोत त्या व्यक्तीचे हाताचे व बोटांचे आकार हे विशेष असतात. बोटांच्या व हाताच्या आकाराची देणगी प्रत्यक्ष परमेश्वर कृपा आहे. हार्दिकचा तळवा उभट लांब आहे. म्हणजेच हात आयताकृती आहे. बोटे लांब व सांध्यात गाठाळ आहेत. अंगठा लवचिक व लांबीला मोठा आहे. हात आयात कृती असल्याने चेंडूची पकड उत्तम राहते. बोटे लांब असल्याने चेंडू फिरविण्याची क्षमता वाढली आहे. अंगठा लांब असल्याने चेंडूची पकड व चेंडूला दिशा देण्याची उच्चकोटीची क्षमता प्राप्त झाली आहे. बोटांच्या पेर्‍यात सांधे/गाठी आहेत. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊनच फलंदाजी अथवा गोलंदाजी केली जाते. शरीरयष्टी उंच, सडपातळ व चपळ असल्याने मैदानात चापल्य दिसून येते. हाताच्या आकाराबरोबरच मनगटातील कौशल्य कामास येत आहे. त्यामुळे हार्दिकच्या मेहनतीला कौशल्य व बुद्धिमत्तेचे बळ मिळाले आहे.

मंगळ रेषा – हार्दिकच्या हातावर वय वर्ष 45 पर्यंत मंगळ रेषा साथ देत आहे. मंगळ रेषा विना थकावट अधिकची ऊर्जा प्रदान करते आहे. या मंगळ रेषेमुळेच हार्दिक मैदानात फलंदाजी, गोलंदाजी वा क्षेत्ररक्षण यासाठी चपळता व उत्साह देत आहे. क्रीडाक्षेत्रात ज्या व्यक्तींना करियर घडवायचे आहे व त्यात उतुंग यश मिळण्याची अभिलाषा असेल तर त्यांनी आधी आपल्या हातावर खणखणीत आयुष्य रेषेसोबत मंगळ रेषेची साथ आहे कि नाही ते तपासायला हवे. निर्दोष आयुष्य रेषा निरोगी व काटकपणा देते व मंगळ रेषा हातावर असता व्यक्ती कोणत्याही मैदानी खेळात इतरांपेक्षा जास्त मेहनत घेऊन कौशल्य आत्मसात करून घेऊ शकते.

शुभ ग्रह शनी – मंगळ व शनी ग्रहाला पाप ग्रह म्हणले जाते, परंतु या पाप ग्रहांची शुभदृष्टी असता व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. हस्तसामुद्रिकदृष्टया आर्थिक संपन्नतेसाठी व आयुष्यात शिस्त, निर्धार, चिकाटी, अविरत मेहनत व निग्रह अंगी असण्यासाठी शनीकृपा आवश्यक असते. शनी ग्रहाचे हेे गुण व्यक्तीच्या ठायी शनी ग्रह प्रसन्न असता शुभ गुंणांचा लाभ होतो. शनी ग्रहावर म्हणजे मधल्या बोटाच्या मध्यभागी एकच भाग्य रेषा जाऊन पोहोचत असेल तर ही भाग्य रेषा म्हणजेच धनरेषा आर्थिक बाबींची आयुष्यातील कायमस्वरूपी चिंता मिटवीत असते. शनी ग्रह धन दौलत हि प्रदान करतो. शनी ग्रह उच्चीचा असल्यास त्या व्यक्तीला पृथी तत्वाच्या साधनसामुग्रीत यश धन, दौलत देतो. जमिनीतून येणारे उत्पन्न, ते कुठलेही पीक व व्यवसाय, शेतातील पिकांचे बनविलेले कुठलेही पदार्थ, गौण खनिज, लोखंड, कोळसा, ऑइल इत्यादी जमिनीशी संबंधित कुठल्याही व्यवसायात शनी ग्रह शुभ असता यश देतो. मैदानावरील पीच व संपूर्ण मैदान क्रिकेटचा भाग आहे. हे मैदान शनी ग्रहाच्या अधिपत्त्याखाली आहे. भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पाऊन शनी ग्रहावर जाऊन थांबली आहे. त्यामुळे हार्दिकवर असलेल्या शनी ग्रहाच्या कृपेने त्यांनी दैदिप्यमान यश व धन प्राप्त केले आहे व करीत आहे.

माो. 8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या