किरोच्या नजरेतून

2 ते 8 सप्टेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

2 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कन्या आहे. कल्पनाशक्ती फार चांगली असून बुद्धीमत्ताही अतिशय तीक्ष्ण आहे. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असे तुमचे जीवन राहील. आत्मविश्वास थोडा कमी असल्याने जीवनात इतरांना मागे टाकून पुढे जाणे हे तुम्हाला जमणार नाही. परंतू आत्मविश्वासात वाढ करण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात उत्तम यश मिळवाल. मोठ मोठ्या कंपनींमध्ये चांगल्या पदावर काम केल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. अभ्यास केल्यास व योग्य मार्गदर्शक मिळाल्यास टिकात्मक लेखनाद्वासा ही अर्थप्राप्ती होऊ शकेल.

3 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. लहानपणापासून आपण काही तरी भव्य दिव्य करावे. अशी तुमची महत्त्वाकांक्षा राहील. जन्मतः प्राप्त परिस्थितीतून वर येऊन उच्च गाठण्यासाठी सतत कार्यरत रहाल. कोणतेही वरचे पद प्राप्त झाले तरी मनाचे समाधान मुळीच होणार नाही. काहींना काही आजार निर्माण होण्याचा धोका आहे. खरे तर तुमची आर्थिक स्थिती चांगली रहाणार आहे. पण कितीही पैसा मिळाला तरी मनाचे समाधान न झाल्यामुळे उगीचच चिंता करीत आणची धडपड कराल.

4 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. हर्षल ग्रहाच्या प्रभावामुळे स्वभावात काहीसा विचीत्रपणा निर्माण होईल. तुमच्या कल्पना मौलिक असल्यामुळे इतरांपेक्षा स्वतंत्र व मौलिक असतील. इतरांकडूनही कामात सहकार्य मिळणे कठीण जाईल. आर्थिक बाबतीत सहकार्य घेण्याच्या प्रयत्नात फसवणूकीची शक्यता आहे. स्वबुद्धीने अर्थार्जन केल्यास उत्तम यश मिळेल.

5 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुमच्या जीवनावर असलेल्या बुधाच्या प्रभावामुळे कोणत्याही व्यक्तीशी व कशाही परिस्थितीत हातमिळवणी करण्यात हातखंडा राहील. शिवाय तुम्हाला विशीष्ट करिअर हवे असे नाही. कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याची बुद्धीमत्ता जवळ असल्याने एकाच वेळी अनेक उद्योग करण्याची प्रबळ इच्छा राहील. आपल्या कार्यक्षेत्राची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम प्रगती होईल. त्यामुळे अर्थप्राप्ती करणे जड जाणार नाही.

6 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. सर्वांविषयी सहानूभुती वाटेल. विवाहानंतर जीवन सुरळीत चालू होऊन अडचणी येणार नाहीत. धार्मिक कार्याकडे विशेष लक्ष राहील. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. मित्रमंडळींकडून मदत मिळत राहील.

7 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या नेपच्यून, चंद्र, बुध ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. आदर्शवादी आहात. विचार उच्च पातळीचे आहेत. कल्पनाशक्ती चांगली आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात इच्छेप्रमाणे भौतिक सुख कमी उपलब्ध होतील पण उत्तरार्धात पैसा, प्रतिष्ठा भरपूर प्रमाणात मिळेल. आर्थिक बाबतीत अनेक संधी उपलब्ध होतील.

8 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुमच्या मताविषयी विशेष आग्रही नाही. स्वभाव गंभीर आहे. इतरांपेक्षा वेगळ्या विषयाचा एकांतात बसून खोलवर अभ्यास करणे आवडते. आर्थिक बाबतीत शनिच्या प्रभावामुळे अतिसावधानता असल्याने पैसा मिळवण्याच्या चालून आलेल्या संधी निघून जातील. कोळसा खाण, जमीन व घरे इ. गुंतवणूक कराल तर त्यातून उत्तम आर्थिक उत्पन्न येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com