किरोच्या नजरेतून

9 ते 15 सप्टेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

जन्मतारखेनुसार भविष्य.. Future by date

9 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगल, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कन्या आहे. मत प्रकट करतांना गुळगुळीतपणाचे धोरण स्वीकार कराल. मंगळ व बुधाच्या एकत्रितपणामुळे रिस्क घेण्याकडे कल राहील. लहान घटनांनी रागाचा पारा वर चढेल. यांत्रिक उपकरणांचा उपयोग फायद्याचा राहील. अध्यात्म व धार्मिक गोष्टींबाबत आकर्षण राहील. आर्थिक बाबतीत चांगलेच यश मिळेल. मौलिक विचारातून केलेल्या कामामुळे बराच पैसा हाताशी लागेल.

10 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. बुद्धीमत्ता तीक्ष्ण असल्याने ज्ञानग्रहण करणे सोपे जाईल. वैचारिक पातळी सामान्यापेक्षा वरच्या दर्जाची राहील. निसर्गाचे आकर्षण राहील. निरनिराळ्या भाषेवर प्रभुत्व राहील. आयुष्याच्या मध्यांतरात कोणत्या एका व्यवसायात स्थिर व्हाल. आणि त्या निर्धारित रस्त्यावर आगेकूच कराल. धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील.

11 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. कल्पना अतिशय प्रगल्भ राहील. बौद्धिक कार्यात यश मिळू शकेल. साधी रहाणी उच्च विचारसरणी अशी वृत्ती राहील. शांतपणे जीवन जगणे जास्त आवडते. आर्थिक स्थिती बौद्धिक कामापासून विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. मोठा व्यापार करणार्‍या कंपनीत पदाधिकारी झाल्यास बराच पैसा मिळेल. याशिवाय साहित्य क्षेत्रात प्रवेश केल्यास उत्तम लेखक, टिकाकार, प्रवास वर्णने लिहीणारा लेखक म्हणून उत्तम मानधन मिळू शकेल.

12 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. चांगली परिस्थिती प्राप्त करण्यासाठी धडपड राहील. बुद्धीवर ताण पडून स्वास्थहानी होऊ नये याची खबरदारी घ्यावी. आर्थिक यश उत्तम राहील. कारण ठरवलेले अंदाज चुकत नाही व इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच असणार. आर्थिक चिंता करू नका. एकावेळी अनेक उद्योग करून धनप्राप्ती होईल.

13 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, नेपच्यून, सूर्य ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. नेपच्यूनचा प्रभाव राहील. त्याचा परिणाम म्हणून बाणा स्वतंत्र राहील. इतरांच्या विचारांनी त्यांच्याबरोबर मिसळून काम करणे जमणार नाहीत पण त्यामुळे अडचणी निर्माण होतील. धनप्राप्तीसाठी स्वप्रयत्नावर अवलंबून रहावे लागेल. एकट्याने काम केल्यास विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. आर्थिक बाबतीत फसवणूकीची शक्यता.

14 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे इतर कोणत्याही ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीशी तुमचे चांगले जमू शकेल. त्यामुळे स्वतःला एकाच वेळी अनेक प्रकारच्या कामात गुंतवून घ्याल. किंवा करिअरमध्ये अनेक वेळा बदल होण्याचा संभव आहे. पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कामे पत्कराल. कितीही बदल झाले तरी पैसे मिळत राहतील. पुष्कळ वेळा भाग्यानेही धनप्राप्ती होईल. वार्षिक उत्पन्न चालू राहील.

15 सप्टेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुधामुळे शुक्राचे सामर्थ्य वाढलेले आहे. सर्वांशी सहानुभूतीने वागाल. आपला संसार व जागेविषयी तुम्हाला प्रेम राहील. आर्थिक आवक तुमच्यासाठी भाग्योदयकारक योग आहे. नातेवाईकच नाही तर मित्रही अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतील. बक्षिसपात्र व वारसाहक्काने बरीच संपत्ती मिळेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com