जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

17 ते 23 जून या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

17 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनि, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या व्यक्तीमत्वाचा विशेष ठसा इतरांना जाणवेल. जीवनावर नशिबाचा फार मोठा हात असेल. हकनाक न्यायालयीन कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी सतर्क राहून अवैध गोष्टी करणार्‍यांपासून चार हात दूरच रहा. खोटे आळ येण्याची शक्यता आहे. सावध रहावे, या सवयीमुळे आर्थिक बाबतीत चांगलाच फायदा होईल. व्यापारामध्ये हळुहळू बस्तान बसवुन चांगला धनसंग्रह करू शकाल.

18 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कर्क आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण राहील. तिचा उपयोग बौद्धिक परंतु निरर्थक काथ्याकूट करण्यात तुम्ही मोकळ्या मनाचे व स्पष्टवक्ते आहात. दुसर्‍याचे दोष तोंडावर सांगितल्यामुळे शत्रूंची संख्या मोठी असेल. संशोधनाचे काम तांत्रिक कार्यात यात विशेष यश आहे. व्यक्तिमत्त्व विद्युत शक्तीने भरलेले राहील. त्यामुळे भोवती नेहमी वलय असल्याचा भास होईल. आर्थिक उलाढालीत भाग घ्याल त्यातही तुम्हाला यश मिळेल.

19 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. दयाळू मनाचे असल्याने वागणूक सहानुभूतिपूर्वक राहील. अशा स्वभावाचा लबाड लोक गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. मन अतिशय चपळ असल्याने कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीस धैर्याने तोंड देऊ शकता. स्वभाव अतिशय महत्त्वाकांक्षी असल्याने एका वेळी दोन व्यवसायांत गुंतवून घ्याल. ग्रहांची चौकट अतिशय चांगली असल्याने धनप्राप्तीचे उत्तम यश मिळेल.

20 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, बुध, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. स्वभावातील सौम्यपणा व उत्तम कल्पनाशक्ती हे विशेष जाणवणारे गुण असतील. नवीन कल्पना व विचार यांचे आकर्षण वाटेल. उदारमतवादी असल्याने इतरांशी वागणूक स्नेहाची असेल. भांडणे, मारामारी, तावातावाने बोलणे यांची अ‍ॅलर्जी आहे. तरी अश प्रसंगी हजर राहवे लागते. साहित्य व इतिहास यांचे आकर्षण असते. पैसा मिळविण्याचे आकर्षण नसते. गरजेपुरता पैसा मिळून समाधानी असाल.

21 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे या एकाच विचाराने आयुष्यभर झपाटलेले असाल. पुढील यशाची शिखरे निर्धारित करून ती गाठण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत रहाल. व्यवस्थापन कौशल्या चांगले असल्याने मोठ्या कंपनीचे प्रमुख, शासकीय उच्च पदस्थ अधिकारी, नगरपालिका प्रमुख म्हणून उत्तम प्रकारे काम करू शकाल. कामानिमित्त लांबचा प्रवास घडेल. आर्थिक बाबतीत जीवनात सहज यश मिळेल. धनसंग्रह प्रचंड असेल व अधिकारही चांगले राहतील.

22 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, चंद्र बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. ग्रहांच्या चौकटीत सहसा एकत्र न येणारे हर्षल व बुध आहेत. त्यामुळे तुमचे जीवन इतरांपेक्षा आगळे वेगळे असेल. स्वभाव स्वकेंद्री आहे. संपर्कात येणारे लोक व हव्या असलेल्या वस्तू इतरांपेक्षा आगळ्यावेगळ्या असतील. जीवनात अकल्पित व अचानक अशा घटना घडतील. त्यामुळे जीवनाला विशेष असे वळण लागेल. भविष्यात घडणार्‍या घटनांची दैवी शक्तीमुळे आगाऊ चाहूल लागेल. आर्थिक जीवनात नेहमी चढउतार असतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात असली तरी पैसा हाती राखून ठेवणे जड जाईल.

23 जून -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. बुद्धीचा कारक असलेला बुध ग्रह अतिशय प्रबल असल्याने बौद्धिक चपलता आणेल. इतरांना न सुचणारे उपाय काढून प्रगतीच्या मार्गावर घोडदौड सुरू राहील. वैचारिक वेगवान गतीशी मेळ खाणारे लोक उपलब्ध नसल्याने सहकारी मिळणे जड जाईल. कमी श्रमात व कमी वेळात पैसा मिळवून देणार्‍या सर्व योजनांचे आकर्षण वाटेल. शेअर्स किंवा सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घेण्याची इच्छा पूर्ण होऊन त्यात उत्तम यश मिळेल. वेगवान वैचारिक प्रगतीमुळे कधी कधी तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक आवक होईल. कधी कधी चुकीच्या निर्णयामुळे ती थंड असेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com