Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

10 जून –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल, बुध या गमहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास मिथुन आहे. तुमचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. त्यामुळे तुमचा व्यवहार सर्वांशी सहानुभूतिपूर्वक राहील. अतिशय संवेदनशील, आदर्शवादी, उत्तम कल्पनाशक्ती हे तुमच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी असल्याने ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही जीवापाड मदत कराल. एकाच वेळी दोन प्रकारच्या कामांपासून तुम्हाला धनप्राप्ती होईल. त्यात दुसर्‍याने दखल दिलेली तुम्हाला मुळीच चालणार नाही. तुम्ही द्विस्वभावाचे असल्यो तुमच्या मनात नेमके काय आहे हे इतरांसाठी एक कोडे राहील. शेअर्ससारख्या व्यवहारात अंदाज बर्‍याच वेळा अचूक असतील.

11 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास मिथुन आहे. स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्तीचा प्रभाव राहील. नवीन विचार आणि कल्पनांचे आकर्षण वाटेल. दृष्टीकोन उदार व उदात्त असल्यामुळे सर्वांशी तुमचे वागणे सहानुभूतीपूर्वक राहील. भांडणे, विरोध करणे इ. गोष्टींबद्दल घृणा वाटेल. इतरांच्या भांडणात मध्यस्थी करून तडजोड करवून घेणे चांगले जमेल. त्यामुळे कधी कधी विनाकारण त्रासदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. मुत्सद्दी, कलावंत किंवा व्यावसायिक म्हणून जीवनात उत्तम यश मिळेल. बौद्धीक कार्य करण्यात आनंद वाटेल. आवश्यकतेनुसार पैसा मिळत राहील.

12 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी असल्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान कराल आणि यशाची कितीही उंची गाठली तरीही समाधान वाटणार नाही. लगेच महत्त्वाकांक्षाचा परीघ वाढवून पुढील लक्ष्य प्राप्त करण्यासाठी धडपड सुरू कराल. व्यवस्थापन कौशल्य चांगले असल्याने मोठ मोठ्या कंपन्याचे संचालक शासनात उच्च पदाधिकारी, महापालिका आयुक्त, इ. पदावर आरूढ होणे सहज जमेल. पैसा मिळवण्यासाठी विशेष धडपड करावी लागणार नाही. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. धनसंग्रह करण सोपे जाईल.

13 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. तुमच्यावर सहसा एकत्र न सापडणार्‍या हर्शल, बुध या ग्रहांच्या प्रभावामुळे जीवन इतरांपेक्षा वेगळ्या वळणाचे राहिल. नवीन कल्पना मौलिक विचार व अंतःस्फूर्ती यांच्यामधून भाव आणि उलाढालीचे अचूक अंदाज काढता येतील. सामाजिक बाबतीत सुधारणावादी रहाल. आर्थिक स्थिती चढउताराची राहील. अकल्पितपणे त्याबाबतीत भाग्याचे दरवाजे उघडतील. व तितक्याच अचानकपणे बंदही होतील. असे सारखे चालू राहील.

14 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. बुध अतिशय प्रभावी असल्यामुळे बौद्धिक कामामध्ये चांगले यश मिळेल. कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी कोणाचेही लक्ष जाणार नाही असे उपाय शोधून काढून आयुष्यात अनेकांना संकटापासून मुक्त कराल. कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याच्या अनेक योजना सहज सुचतील. असामान्य बुद्धीमत्तेमुळे नवनवीन कल्पनाद्वारे पैसा मिळवून धनी होणे कठीण जाणार नाही. अतिशय श्रीमंत लोकांत बोलबाला राहील.

15 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, बुध, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. काही तरी विशेष करून जनतेसमोर उत्तम छबी व नावलौकिक वाढविण्याच्या दृष्टीने भाग्यवान आहात. पैसा मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. अशा प्रकारच्या संधी शोधता येतील. एकाच वेळी अनेक स्त्रोतांपासून धनप्राप्ती होईल. कल्पनाशक्ती अतिशय चांगली आहे. त्यामुळे संगीत, कला, साहित्य क्षेत्रात उत्तम यश मिळेल. अर्थप्राप्तीच्या बाबतीत नेहमी नशिबाची चांगली साथ मिळेल. बक्षिस म्हणून अन्य जणांची मालमत्ता मिळण्याचा योग आहे.

16 जून –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, बुध, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. सहकार्‍यांत असलेले गुण पारखून त्याचा बेमालूम उपयोग करून भरपूर फायदा घेण्याची कला अवगत आहे. महत्वाकांक्षा दांडगी असली तरी इतरांप्रमाणे पैसा मिळवणे हे ध्येय नसून सामान्य जणांवर अधिसत्ता गाजविण्याची हौस राहील. लांबच्या प्रवासाची आवड आहे. आर्थिक बाबतीत फार विचित्र अनुभव येतील. अगदी जवळच्या व्यक्तीपासून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक बाबतीत सतर्क रहा.

- Advertisment -

ताज्या बातम्या