जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

13 ते 19 मे या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

20 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,रवि, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांच्या चौकटीतील चंद्र जास्त प्रभावाखाली असल्यामुळे स्वभाव सौम्य राहील. तुमची कल्पनाशक्ती, कलाप्रेम, आदर्शवाद यांच्यामुळे तुमचा कल अध्यात्म, गूढशास्त्रे यांच्याकडे जास्त राहील. तुमचे घर म्हणजे सुंदर वस्तूंचे संग्रहालय असल्यासारखे राहील. कारण तुम्हाला सुंदर वस्तू गोळा करण्याचा छंद असेल. चंचल स्वभावामुळे वारंवार प्रवास करावा वाटेल.

21 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, शुक्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. मात्र स्वभावात शुक्राला वाव देऊन स्वतःवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाकांक्षेवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे. नेहमी आपल्यापेक्षा उच्च दर्जाच्या लोकांशी मग तो सामाजिक संबंध असो वा व्यापारी संबंध असो जवळीक साधली पाहिजे. अन्यायाविरुद्ध बंड करायची हौस वाटेल. लवकर विवाह केल्यास वैवहिक जीवनात विचीत्र अनुभव येतील. आर्थिक आघाडीबाबत कोणत्याचे प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. पैसा मिळवण्याची संधी शोधता येईल.

22 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. तुमचा जीवनरथ इतरांपेक्षा वेगळा आणि चांगला आहे. तत्त्वज्ञानी लेखक, संगीतकार अशा कामात उत्तम यश मिळेल. भौतिक दृष्टीने भाग्यवान आहात. जीवनात अनेक बदल संभवतात. शिवाय ते सर्व अकल्पिक अचानक असतील. अडचणीवर मात करणे चांगले जमेल. याची प्रचिती आणीबाणीच्या प्रसंगी जास्त येईल. सहकार्याच्या निर्देशनाखाली काम करणे मुळीच जमणार नाही. आर्थिक बाबतीत अनुभव इतरांपेक्षा वेगळे असतील.

23 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. बुद्धिमत्ता तीक्ष्ण, मौलिक राहील. मानसिक जागरूकता, तर्कशक्ती अतिशय चांगली आहे. सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय आहे. स्वभाव स्वतंत्र आहे. तरी सर्वांशी मिळून मिसळून वागाल. मात्र इतरांच्या प्रभावात कधीही येणार नाही. सर्वकष बुद्धीमुळे सर्व कार्यात उत्तम यश मिळवू शकाल. मात्र ते सर्व मनापासून अंगीकारलेले असेल. आर्थिक उलाढाली मित्रांसाठी कोडे असेल. पैसा मिळवण्याचा मार्ग इतरांच्या लक्षात येणार नाही. पण धनी व्हाल हे निश्चीत.

24 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शुक्र , बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. जीवनाचा आधार प्रेम आहे. मग हा वैयक्तिक असो की, सार्‍या मानव समाजावर असो तुमच्या भावना व संवेदना तीव्र आहेत. स्वभावात भक्तिभाव असल्यामुळे जीवनात त्यासाठी काहीही त्याग कराल. ही एक गोष्ट सोडून निरस वाटेल. प्रेमाच्या इतकीच द्वेषाची भावनाही प्रबळ असते. त्यामुळे तुम्ही कधी देवदूत वाटाल तर विरोधकांना सैतान असल्यासारखे वाटाल. टोकाची भूमिका घेतल्यास विचार अतिरेकीप्रमाणे असतील. म्हणून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात.

25 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुम्हाला विचीत्र वस्तूंचा संग्रह करणे आवडेल.गूढशास्त्राबद्दल आकर्षण असेल. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगली प्रगती होईल. अखिल मानव संबंधित भावी घटनांचा भास होत राहील. विज्ञानाची आवड असल्यास त्यात संशोधक इंटरनेट, टी. व्ही. अथवा रेडिओशी संबंधित असेल. एकाच प्रकारचे काम करत राहिल्यास बेचैन वाटेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात बर्‍याच प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.

26 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, चंद्र,शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, करिअर व जीवन दोन्हीही इतरांपेक्षा बरेच हटके असेल. एक तर अतिशय सामर्थ्यंवान व भाग्यवान ठराल. किंवा त्या उलट होईल. प्र्रेमाची भूक मोठी असल्याने जीवनात एकाकी असल्यासारखे वाटेल. प्रेमासाठी बराच त्याग कराल पण प्रतिसाद उलट मिळेल. विशेषतः नातेवाईक दुःख देतील व आर्थिक नुकसानही करतील. केवळ भाग्याची साथ म्हणून नव्हे तर हिशेबीपणा,सतर्कता, व शहाणपणा याचा उपयोग करून भककम योजनांमध्ये पैसा गुंतविल्यामुळे श्रीमंत व्हाल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com