Wednesday, May 8, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

- Advertisement -

13 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. स्वतंत्र बाणा हे तुमचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे किंवा दुसर्‍याच्या निर्देशनाप्रमाणे काम करणे जड जाईल. कोणत्याही कामाचा प्रमुख म्हणून काम केल्यास जीवनात यश मिळेल. विचार मौलिक असल्यामुळे इतरांपेक्षा ते वेगळेच असतील. काहीना ते विचीत्र वाटेल. काही वेळा घरातील लोकांना व नातेवाईकांना ते विचित्र वाटतील. मुळ कुटुंबापासून वेगळे रहाणे प्रगतीच्या दृष्टीने चांगले राहील. आर्थिक स्थितीची इतरांना कल्पना येणे कठीण राहील. तरीही मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल.

14 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्षल, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. बुध आणि रविचा एकत्रित प्रभाव फार चांगला आहे. बुद्धी तीक्ष्ण राहून अचूक निर्णय घेता येतील. घाईने निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे स्वभाव काहीसा क्रोधी व उतावळा होईल. विरोधक भेटल्यास हे गुण जास्त जोर धरतील. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. लेखक, कलाकार, अभिनेता यापैकी कोणतेही काम निवडल्यास उत्तम यश मिळेल. सर्वंकष ज्ञानामुळे कोणत्याही करिअरमध्ये उत्तम धनप्राप्ती करणे सहज शक्य आहे.

15 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. स्वभाव अतिशय उदार असून सर्वांविषयी सहानुभूती वाटेल. प्रेमाशिवाय जीवन जगणे म्हणजे जिवंतपणी मरण अशी तुमची धारणा राहील. प्रेमळ स्वभावामुळे मित्रांची संख्या भरपूर राहील. पैशांचा ओघ नैसर्गिकपणे तुमच्याकडे वाहत येईल. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्याल. त्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागणार नाही.

16 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, सूर्य, चंद्र, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव अतिशय महत्त्वाकांक्षी राहील. इतरांच्या मनावर आपण अधिराज्य गाजवाल असे वाटेल पण कार्यक्षेत्र कोणते का असेना स्वार्थापोटी नाही तर यशासाठी आकर्षण असल्यामुळे असे होईल. थोड्याशा अभ्यासाने तत्वज्ञान, गूढशास्त्र नाटक या सर्व विषयात प्राविण्य मिळवाल. पैशांचे मुळीच आकर्षण नाही. दुसर्‍याच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती कराल.

17 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, शनि,नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, इच्छाशक्ती प्रबळ राहील. स्वभाव गंभीर व मते निश्चीत रहातील. आयुष्याच्या पूर्वार्धात अनेक बंधने व जबाबदार्‍या आल्याने प्रगतीमध्ये अनेक अडथळे येतील. अशा प्रकारच्या बंधनात अडकल्यामुळे भोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणणे शक्य होणार नाही. महापूरात वाहणार्‍या ओंडक्याप्रमाणे नशीब हेलकावत राहील. इच्छाशक्ती प्रबळ असल्याने भरपूर धनसंग्रह होऊ शकेल.

18 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, चंद्र,नेपच्यून, सूर्य, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची मांडणी अशी आहे की, बंधने घालण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तुम्ही त्याच्याविरूद्ध बंड कराल. दुसर्‍यांशी संबंध ठेवतांना त्याच्य चातुर्य व शहाणपणाचा सकारात्मक उपयोग करणे फार आवश्यक आहे. स्वभाव निडर असून स्वतंत्र बाण्याचे आहात. छोट्या छोट्या कारणांवरून रागाचा पारा लगेच वर चढेल. त्यावर नियंत्रण ठेवल्यास त्या शक्तीचा प्रगतीसाठी चांगला उपयोग होईल.

19 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. विचार करण्याची व निर्णय घेण्याची गती तीव्र राहील. विचारांचे कृतीत रूपांतर करण्याची क्षमता चांगली आहे. परिश्रमाची आवड आहे. दिलेला शब्द कटाक्षाने पाळाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकत राहील. व्यक्तीमत्वात बर्‍याच प्रमाणात संमोहनशक्ती आहे. भाग्य असे आहे की, मातीचे सोने करण्याची क्षमता अंगी आहे. मोठ मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापनाचे काम चांगले जमेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात थोडया अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रगतीकडे वेगवान वाटचाल चालू राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या