किरोच्या नजरेतून

१६ ते २२ सप्टेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

जन्मतारखेनुसार भविष्य..

16 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कन्या आहे. आदर्शवादी आहात. विचार उच्च स्तराचे राहतील. कल्पनाशक्ती चांगली असेल. भौतिक सुखाचे आकर्षण वाटेल. तर्कावर उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. मानसशास्त्र किंवा तशा प्रकारची अन्य शास्त्रे याविषयी आकर्षण वाटेल. उत्तरार्धात सुख उपभोगाल. आर्थिक बाबतीत सर्व सोयी उपलब्ध असूनही चिंता करण्याची सवय जाणार नाही.

17 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. आयुष्याच्या पूर्वार्धातम अनेक अडचणी येतील. तुम्ही केेलेल्या कामाचे श्रेय इतर लोक घेतील. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मोठ मोठ्या ग्रंथाचे परिशीलन कराल. उत्तरार्धात आयुष्य तौलनिकदृष्ट्या सुखकर होईल. दुसर्‍यावर टीका करण्याची नकारात्मक प्रवृत्ती कमी करा. अतिशय संशयी व सावध रहाण्याच्या सवयीमुळे आर्थिक बाबतीत मिळालेल्या संधीची बस आयुष्यात अनेक वेळा चुकेल नंतर पश्चाताप होईल.

18 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. मंगळ व बुधाचे एकमेकांशी बरेच चांगले जमते. त्यामुळे उत्साह व निश्चयात्मक शक्तीमुळे जीवनात उत्तम यश मिळेल. परिक्षक किंवा समीक्षक म्हणून उत्तमप्रकारे काम कराल. मोठ्या उद्योगात पदाधिकारी म्हणून उत्तमप्रकारे काम कराल. आर्थिक बाबतीत जीवनात चांगले यश मिळेल. त्यासाठी तुमची कल्पनाशक्ती व योजकता कामाला लावा.

19 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. हर्शल व बुध यांच्या प्रभावामुळे विचारांची गती व ज्ञानग्रहणशक्ती चांगली राहील. पैसे मिळवण्यासाठी फार महत्त्वाकांक्षा राहील. पण सुरुवातीच्या आयुष्यात मोठे अडथळे येतील. कारण अस्थिर मन व असमाधानी स्वभाव यातून निर्माण होणारी चिंता होय. मनाची एकाग्रता वाढविल्यास आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल.

20 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तीक्ष्ण व सुपीक बुद्धीमत्तेतून अनेक प्रकारच्या योजना आकार घेतील. वेळ पडल्यावर प्रवास करून त्या यशस्वी करून दाखवाल. साधी रहाणी उच्च विचारसरणी यामुळे आर्थिक बाबतीत जेमतेम रहाल. हवे ते आणि जीवनावश्यक तेवढेच उपलब्ध व्हावेे. अशा विचारांमुळे पैशाच्या मागे न लागता बौद्धिक कार्यात मग्न रहाल.

21 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या गुरू, बुध ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असाल. तशी उन्नती झाली तरी मनाचे समाधान होणार नाही. त्याही वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत भिण्याचे काही कारण नाही. तरीही नसती चिंता करण्याची सवय जाणार नाही.

22 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. हर्शलच्या प्रभावामुळे भौतिक व स्वतंत्र कल्पना सुचतील. त्यामुळे स्वभाव विचीत्र आहे असे तुमच्या प्रतिस्पर्ध्यास वाटेल. कोणाशी लवकर मैत्री करणे जमणार नाही. त्यामुळे मित्रांची संख्या व पाठींबा कमी राहील. आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्वतंत्रपणे चांगला पैसा कमवाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com