किरोच्या नजरेतून

26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

26 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. कोणतेही काम शिकणे किंवा करणे सहज शक्य होऊन यश मिळेल. मात्र त्यामुळे करिअरच्या बाबतीत सुरुवातीला सारखे तळ्यात मळ्यात चालू राहील. सातत्य न टिकविल्यास करिअरमध्ये अनेक वेळा बदल घडवून येईल. कोणाशीही सहज मिसळण्याचा स्वभाव असल्याने सर्वांशी तुमचे चांगले पटेल. कर्जाची भिती वाटेल. गुंतवणूकीच्या बाबतीत तुमचे निर्णय अचूक असतील. पण शंकेखोर स्वभावामुळे तुमच्यपेक्षा इतर लोकच जास्त फायदा घेतील.

27 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जीवनात प्रेमविवाह, स्नेह याचे फार महत्त्व राहील. जीवनाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा राहील. व्यक्तीमत्वात संमोहनशक्ती आहे. इच्छाशक्तीत वृद्धी करून भौतिक प्रगतीसाठी तिचा उपयोग केल्यास जीवनात तुम्हाला यश उत्तम मिळेल. धन संग्रहाची आवड नसूनही हळूहळू का होईना प्रयत्नाने तुम्ही उत्तमप्रकारे धनसंग्रह करू शकाल.

28 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. मनाची ठेवण धार्मिक असल्याने कोणत्याही करिअरमध्ये असले तरी भक्तीमार्गाचे आकर्षण राहील. स्वभाव आदर्शवादी, कल्पना विश्वात रमणे असल्याने परदेशगमन सहज शक्य आहे. तेथे स्थायीक होण्याचाही योग आहे. कर्तृत्वामुळे भरपूर प्रसिद्घी व पैसा मिळेल. पण तो टिकवणे तुम्हाला जड जाईल.

29 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. तुमच्या जीवनावर शनीचा प्रभाव फार राहील. आयुष्यात सुरूवातीपासूनच अनेक अडथळे व विरोधाला तोंड द्यावे लागेल. दुसर्‍याकडून मदत मिळणे कठीण असल्यामुळे तुमची प्रगती स्वतःच्या कर्तृत्वाने करावी लागेल. सहनशीलता व निश्चयात्मक बुद्धीने यशस्वी व्हाल. सल्ल्याच्या जोरावर बनेक लो श्रीमंत होतील. मात्र स्वतःसाठी त्याचा उपयोग न केल्याने धनप्राप्ती कठीण होईल.

30 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे जीवन नशीबाच्या प्रवाहात वर खाली होणारे राहील. सर्व काही सुरळीत चालू असतांना अचानक मधला काळ अडचणींनी भरलेला असेल. 35 व्या वर्षानंतर 60 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. या काळात उर्वरीत जीवनासाठी बेत करून ठेवल्यास चांगले राहील.

31 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे.सूर्य व हर्षल यांच्या प्रभावामुळे व्यक्तीमत्व विशिष्ट प्रकारचे व इतरांपेक्षा वेगळे राहील. तुमचे विचार मौलिक असतील. त्यातून अनेक विधायक कार्य पार पाडाल. बर्‍याच वेळा असे होईल की, यश मिळता मिळता हुलकावणी देईल. पण जीवनात यश मिळेल हे नक्की. स्वभाव काटकसरी असल्याने आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत फार सावधानता बाळगा. त्यातून पुढे कमाई होईल.

1 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य राहील. कल्पनाशक्ती चांगली असून दैवी कृपेने प्रतिभेची देणगी जन्मतःच लाभली आहे. अतीसंवेदनशीलतेमुळे दुसर्‍याने सहज वापरलेला शब्दही तुम्हाला लागेल. कल्पनाशक्तीवर आधारित सर्व प्रकारच्या लेखन, चित्रकला, इ. कलामध्ये यश मिळू शकेल. आत्मविश्वासात वाढ केल्यास तुमची स्वप्ने खरी करू शकाल. पैशाचे आकर्षण नसल्यामुळे गरजेइतका पैसा मिळाला तरी तुम्ही खूष रहाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com