Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

जन्मतारखेनुसार भविष्य..

19 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. विचार करण्याची व निर्णय घेण्याची गती तीव्र राहील. विचारांचे कृतीत रूपांतर करण्याची क्षमता चांगली आहे. परिश्रमाची आवड आहे. दिलेला शब्द कटाक्षाने पाळाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकत राहील. व्यक्तीमत्वात बर्‍याच प्रमाणात संमोहनशक्ती आहे. भाग्य असे आहे की, मातीचे सोने करण्याची क्षमता अंगी आहे. मोठ मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापनाचे काम चांगले जमेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात थोडया अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रगतीकडे वेगवान वाटचाल चालू राहील.

- Advertisement -

20 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट बुद्धीमत्ता धारदार करण्यासाठी चांगली मदत करेल. विचार उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. अनेक लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. कोणत्याही प्रकारच्या करिअरमध्ये लवकरात लवकर प्रगती करण्याची संधी मिळेल. कलाक्षेत्र, साहित्य, संगीत, नाटक यामध्ये उत्तम प्रगती. आर्थिक बाबतीत तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मात्र तुम्हाला त्याचे म्हणावे असे महत्व पटणार नाही. तरीही अलौकीक मार्गाने पैसा येत राहील.

21 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, रवि, हर्षल, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य आणि गुरूच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा फार दांडगी राहील. कितीही यश मिळाले तरी ते कमी वाटल्यामुळे की काय तुम्ही आणखी उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न कराल. जबाबदारीच्या उच्च पदावर करिअरमध्ये व समाजात पोहोचण्याचा तुमचा आटोकाट प्रयत्न राहील. प्रगतीची वाटचाल करतांना तुम्ही त्यात इतके गुंतून जाल की, स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत काळजी घ्या. संपत्ती व आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय अचूक निघाल्यामुळे श्रीमंत होणे फार जड जाणार नाही. भावी घटनांचा अचूक वेध घेण्याची दैवी शक्ती जन्मतःच प्राप्त झाल्याने व्यापार, उद्योग अथवा आर्थिक उलाढालीत उत्तम यश मिळेल.

22 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या वैयक्तिक गुणांचा इतरांवर लवकर व मोठा प्रभाव पडेल. विचार आणि कृतीच्या बाबतीत स्वतंत्र बाणा असल्यामुळे इतरांच्या हाताखाली किंवा निर्देशनाप्रमाणे काम करणे तुम्हाला जड जाईल. कोणत्याही कामाचा प्रमुख म्हणून काम केल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. कामात इतरांपेक्षा नाविन्य आणि वेगळेपणा असेल मात्र त्यामुळे काही लोकांना तुमचा स्वभाव विचीत्र असल्याचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या योजना,हालचाली व रणनीती इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. पैशाचे जास्त आकर्षण नसूनही विपुल प्रमाणात धनप्राप्ती राहील.

23 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, सूर्य, बुध, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. बौद्धिक कामासाठी ग्रहांची चौकट फार चांगली आहे. सखोल बुद्धिमत्ता व अचूक निर्णय याच्या जोरावर उत्तम प्रकारे प्रगती करू शकाल. दुसर्‍याच्या मनात तुमच्याविषयी काय चालले आहे हे सहज ओळखता येईल. मात्र स्वभावातील उतावळेपणामुळे कधी कधी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत सावधान रहा. आत्मविश्वास दांडगा असल्यामुळे जीवनात यश मिळविणे सहज शक्य होईल. तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक क्षेत्रात नवनवीन व आकर्षक योजना तयार करून त्यातून भरपूर पैसा मिळवणे सहज शक्य होईल..

24 ऑगस्ट –वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, बुध,शुक्र, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमची सर्वांशी वागणूक सहानूभूतीपूर्वक राहील. जीवनात प्रेमाला महत्त्च राहील. तुमचे प्रेम आदर्श असेल. सहजपणे कोणाशीही मैत्री कराल. त्यामुळे मित्रसंख्या मोठी राहील. सामाजिक कामाची फार आवड असेल. समारंभ किंवा पार्टी देण्यात फार आनंद वाटेल. मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवाल. यात मुळीच शंका नाही. निरनिराळ्या वित्तीय संस्थातून गुंतवणूक करून हळुहळु धनी व्हाल.

25 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, चंद्र,नेपच्यून, सूर्य, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची मांडणी अशी आहे की, बंधने घालण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तुम्ही त्याच्याविरूद्ध बंड कराल. दुसर्‍यांशी संबंध ठेवतांना त्याच्य चातुर्य व शहाणपणाचा सकारात्मक उपयोग करणे फार आवश्यक आहे. स्वभाव निडर असून स्वतंत्र बाण्याचे आहात. छोट्या छोट्या कारणांवरून रागाचा पारा लगेच वर चढेल. त्यावर नियंत्रण ठेवल्यास त्या शक्तीचा प्रगतीसाठी चांगला उपयोग होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या