जन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth

15 ते 21 जुलै या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

15 जुलै :

तुमच्या ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमचे जीवन चांगल्या अर्थाने इतरांपेक्षा वेगळे असेल. तुमच्या जीवनात प्रणय, रोमान्स व त्याचबरोबर प्रचंड महत्वाकांक्षा असल्याने तुम्ही कर्तृत्व आणि मनोरंजन याची धमाल उडवून द्याल. तुमचा स्वभाव फार उदार असून हृदय कोमल आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारची संमोहन शक्ती असल्याने अनेक लोक तुमच्याकडे ओढले जातील. परंतु अंध विश्वासाच्या मात्र तुम्ही विरुद्ध राहाल. तुमचा नशिबावर विश्वास असला तरी स्वप्रत्नाने त्यात सुधारणा करण्याची तुमच्या जवळ धमक आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही फार भाग्यवान आहात.

16 जुलै :

तुम्ही तुमची इच्छाशक्ती जर वाढवली तर तुमच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेद्वारा जीवनात चांगली प्रगती करू शकाल. शारीरिक कामापेक्षा तुम्हाला बौद्धीक कामाची जास्त आवड वाटेल. तुम्ही फार भावनाप्रधान असून तुमची कल्पनाशक्ती चांगली असल्याने कलाक्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकाल. चित्रकार, लेखक, संगीतकार, कवी, प्रवचनकार व व्याख्याता अशा प्रकारच्या कामात तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. आयुष्याच्या पूर्वार्धात तुमच्या कामातून पैसे मिळविणे जड जाईल. तुमची महत्वाकांक्षा दांडगी असल्याने तुमचे लक्ष्य उच्च प्रकारचे राहील. आर्थिक बाबतीत जीवनात तुम्हाला फार चिवित्र अनुभव येतील तुमच्या जीवनात आर्थिकदृष्टीने अचानकपणे अनेक लोक येतील व तितक्याच अचानक ते जातील.

17 जुलै :

तुमच्यावर शनिचा मोठा प्रभाव असल्याने तुमचा स्वभाव फार गंभीर असून तुमची इच्छाशक्ती प्रबळ राहील. तुमची त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात तुमच्यावर कौटुंबीक अनेक जबाबदार्‍या आल्याने प्रगती करणे तुम्हाला जड होईल. उत्तरार्धात मात्र त्या जबाबदार्‍या बर्‍याच प्रमाणात कमी होतील. तरी पण तुम्हाला नेहमी आपण नशीबाच्या पिंजर्‍यात अडकलेला आहोत असे सारखे वाटत राहील. कामात सातत्य टिकविल्यास आयुष्याच्या शेवटी उत्तम यश मिळेल. शेअर्स अथवा सट्ट्यासारख्या बेभरवशाच्या व्यवहारात भाग न घेण्याचे पथ्य पाळल्यास व सातत्याने काम करीत गेल्यास तुम्हाला आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

18 जुलै :

कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास तुम्ही त्या विरुद्ध बंड करुन उठाल. दुसर्‍याच्या हाताखाली किंवा दुसर्‍याच्या निर्देशनाप्रमाणे काम करणे तुम्हाला जड जाईल. तुमचा स्वभाव निउर व स्वतंत्र बाण्याचा आहे. तुमच्या क्रोधाचा पारा आयुष्याच्या पूर्वार्धात परिस्थितीशी व संपर्कात येणार्‍या व्यक्तीशी जमवून न घेता आल्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक वेळा निवासस्थान व करिअर बदलण्याची वेळ येईल. नातेवाईकांशी तुमचे म्हणावे असे पटणार नाही. विवाह उशीरा करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. लवकर विवाह तुमच्यासाठी जीवनाच्यादृष्टीने घातक आहे.आर्थिक उलाढालीच्या बाबतीत एक तर तुम्ही अतिशय यशस्वी व्हाल किंवा त्या उलटही होण्याची शक्यता आहे.

19 जुलै :

तुमच्या करिअरमध्ये अनेक बदल होत राहतील. तुमच्यावर भोवतालच्या परिस्थितीचा फार परिणाम होईल. तुमच्या धाडसी स्वभावामुळे अनेक अद्भूत अनुभव तुम्हाला येतील. तुम्हाला आपली जागा व कुटुंब याविषयी फार प्रेम वाटेल. तुमच्या आयुष्यात हळूहळू पण प्रगती होईल. तुम्ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात रहाल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सारखा बदल करीत गेल्यास धनसंग्रह करणे तुम्हाला फार जड जाईल. प्रवासाचे फार आकर्षण असल्यामुळे त्यासंबंधीत व्यवसायात तुम्हाला चांगला पैसा मिळेल.

20 जुलै :

तुमची कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे तुमची महत्वाकांक्षा व स्वप्ने मोठ-मोठी असतील आणि आश्चर्य म्हणजे त्यात तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे. तुमच्या कामाविषयी तुमचा उत्साह दांडगा राहिल. हाताखालच्या लोकांनी तुमच्या आदेशाप्रमाणेच चालले पाहिजे, असा तुमचा आग्रह राहिल. कला क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष क्रांती करता येईल. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये नेहमी चढउतार राहिल. त्याचे कारण म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती एकाच पातळीवर ठेवणे जड जाईल.

21 जुलै :

तुम्ही फार स्वतंत्र बाण्याचे, निडर व धाडसी असून तुमच्या बोलण्यातून व धोरणातून हे गुण स्पष्टपणे प्रगट होत राहतील. त्याचबरोबर तुमचा स्वभाव अतिशय उदार असल्याने तुम्ही सर्वांविषयी सहानुभूती दाखवाल. तुम्ही आपल्या कनिष्ठ व वरिष्ठ लोकांमध्ये फार लोकप्रिय राहाल. याचे कारण म्हणजे स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेऊन ती तुम्ही वेळेवर नेटाने व इमानदारीने पूर्ण कराल. तुमचा जीवनाकडे पाण्याचा दृष्टीकोन उच्च बौद्धीक स्तरातून आहे. आपल्या हाताखालील लोकांवर अधिराज्य गाजविण्याची तुम्हाला फार हौस आहे. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत तुम्हाला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. सुरवातीची काही वर्षे त्रासात गेली. पुढील आयुष्यात फळफळून वर येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com