जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

1 ते 7 जुलै या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

1 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल,चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. चंद्राचा प्रभाव असल्यामुळे करिअरमध्ये बरेच बदल होत रहातील. सभोवतालच्या परिसराचा प्रभाव राहील. जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. त्याबरोबर देशाच्या भल्यासाठी काही करावे अशी इच्छा राहील. जीवनाच्या उत्तरार्धात चांगली प्रगती होईल. स्वभाव संवेदनशील असून आपल्या मनातील गोष्टी सहसा इतरांना कळू देणार नाही. नेहमी चांगली प्रसिद्धी मिळेल. उद्योगात सतत बदल करत राहिल्यास धनसंग्रह करणे कठीण जाईल. उद्योगाला धरून राहिल्यास इच्छेप्रमाणे धनप्राप्ती होईल.

2 जुलै -

3 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. तुम्ही स्वतंत्र बाण्याचे आहात. स्वभाव धाडसी व निडर आहे. ऐनवेळी इतरांच्या मदतीला धावून जाल. सर्वांशी तुमची वागणूक सहानुभूतिपूर्वक राहील. खालच्या लोकात व वरिष्ठातही लोकप्रिय रहाल. शासकीय अधिकारी व राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून चांगले काम करू शकाल. आपल्या देशाविषयी प्रेम वाटेल. परदेशगमनची इच्छा तीव्र राहील. तर काहीची पूर्ण होईल. जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायक असेल तर उत्तरार्धात पूर्ण सुखी रहाल. आर्थिक सुस्थितीबद्दल घाबरण्याचे कारण नाही. जीवनाच्या पूर्वार्धात केलेल्या कष्टाचा मजबूत आर्थिक पाया तयार होऊन त्याची उत्तम फळे उत्तरार्धात चाखाल.

4 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, सूर्य, नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमच्या कल्पना आणि विचार अत्यंत मौलिक व विचारशील आहेत त्यामुळे ते विचित्र आहे असे इतरांना वाटेल. त्यामुळे ते तुम्हाला येन केन प्रकारेन त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अनेक वेळा कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून केलेली आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल.

5 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. स्वभाव संवेदनशील असल्याने भोवतालच्या परिसराचा व तेथील रहात असलेल्या लोकांचा फार प्रभाव असेल. आयुष्याच्या सुरुवातीला आत्मविशास कमी आहे असे वाटेल त्यामुळे कोणतेही काम हाती घेण्याची भीती वाटेल. पण एकदा का आत्मविश्वास दांडगा झाला की, तुमची घोडदौड थक्क करणारी असेल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण आहे. त्याद्वारे इतरांवर अधिसत्ता चालविण्याची इच्छा राहील. जीवनाच्या पलीकडे जाऊन संशोधन करणे आवडेल. तुम्ही घेतलेले किंवा सुचलेले निर्णय कार्यान्वित केल्यास तुम्हाला प्रचंड प्रमाणात धनप्राप्ती करून देईल.

6 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. इतरांपेक्षा वेगळं अस जीवन राहील. त्यामध्ये प्रेम, रोमान्स, महत्त्वाकांक्षा यांना विशेष स्थान असेल. तुमचा स्वभाव दयाळू, उदार व व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने एक प्रकारची चुंबकीय शक्ती आहे. यापेक्षा विशेष आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही करिअर निवडले तरी त्यात प्रचंड यश मिळेल. हाच तुमच्या जीवनाचा प्लस पॉइंट आहे. दैववादावर प्रचंड विश्वास असल्याने कितीही प्रयत्न केला तरी दैवात असेल तेच होईल अशी तुमची धारणा आहे. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात.

7 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. आपले चारित्र्य व इच्छाशक्ती यांचे सामर्थ्य निर्माण केल्यास इतरांपेक्षा बौद्धिकदृष्ट्या काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. संधी मिळाल्यास जीवनात अनेक वेळा प्रवास घडेल. विवाहाच्या बाबतीत मात्र तुम्ही तितके भाग्यवान असू शकणार नाही. आर्थिक बाबतीत अनेक विचित्र अनुभव येतील. एखादी व्यक्ती अचानक जीवनात मदत करण्यायाठी पुढे येईल आणि तेवढ्याच अनपेक्षितपणे जीवनातून निघून जाईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com