किरोच्या नजरेतून...
भविष्यवेध

किरोच्या नजरेतून...

16 ते 22 जुलै या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जन्मतारखेनुसार भविष्य..

16 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कर्क आहे. इच्छाशक्ती जर वाढविली तर बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली प्रगती करू शकाल. शारीरिक कामांपेक्षा बौद्बिक कामाची जास्त आवड वाटेल. तुम्ही फार भावनाप्रधान असून कल्पनाशक्ती चांगली असल्याने कलाक्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. चित्रकार, कवी प्रवचनकार, व्याख्याता अशा क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती करु शकाल. आयुष्याच्या पूर्वार्धात कामातून पैसे मिळणे अवघड जाईल. आर्थिक बाबतीत जीवनात विचित्र अनुभव येतील. जीवनात आर्थिक दृष्टीने अचानकपणे अनेक लोक येतील व तितक्याच अचानकपणे जातील.

17 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. तुमच्यावर शनीचा मोठा प्रभाव असल्यामुळे तुमचा स्वभाव अतिशय गंभीर असून इच्छाशक्ती प्रबळ राहील. त्वरित निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात अनेक कौटुंबिक जबाबदार्‍या आल्याने प्रगती करणे जड जाईल. आपण नशिबाच्या पिंजर्‍यात अडकलो आहोत असे सारखे वाटत राहील. कामात सातत्य टिकवल्यास आयुष्याच्या शेवटी उत्तम यश मिळेल. सातत्याने काम करत राहिल्यास आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

18 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, मंगळ, नेपच्यून, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास त्याविरुद्ध बंड करून उठाल. दुसर्‍याच्या निर्देशनाप्रमाणे तुम्हाला काम करणे जड जाईल. स्वभाव स्वतंत्र आणि निडर बाण्याचा आहे. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. विवाह उशिरा करणे फायद्याचे ठरेल. लवकर विवाह घातक आहे. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत एक तर तुम्ही अतियश यशस्वी व्हाल किंवा होण्याची शक्यता आहे. तरीही एखादी योजना यशस्वी होऊन आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

19 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, करिअरमध्ये अनेक बदल होतील. तुमच्यावर भोवतालच्या परिस्थितीचा फार परिणाम होईल. धाडसी स्वभावामुळे अनेक अद्भूत अनुभव तुम्हाला येतील. आयुष्यात हळूहळू प्रगती होईल. मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागू देणार नाही तरीही प्रसिद्धीच्या झोतात रहाल. प्रवासासंबंधीच्या व्यवसायात चांगला पैसा मिळेल.

20 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, सूर्य हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे महत्त्वाकांक्षा व स्वप्ने मोठी आहेत. आणि त्यात तुम्हाला यशस्वी होण्याची संधी आहे. कामाविषयी उत्साह दांडगा आहे. कला क्षेत्रात विशेष क्रांती करता येईल. आर्थिक स्थितीप्रमाणे नेहमी चढउतार होत राहतील. कारण गुंतवणुकीविषयी घाईगर्दीने निर्यण घेतल्यामुळे परिस्थिती एकच पातळीवर ठेवणे जड जाईल.

21 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. तुम्ही स्वतंत्र बाण्याचे, निडर, धाडसी आहात. बोलण्यातून व धोरणातून हे गुण स्पष्ट होतात. स्वभाव अतिशय उदार असल्याने सर्वांविषयी सहानुभूती दाखवाल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उच्च व बौद्धिक स्तरातून आहे. हाताखालील लोकांवर अधिराज्य गाजविण्याची हौस आहे. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत घाबरण्याचे मुळीच कारण नाही. सुरुवातीला काही वर्षे त्रासात गेली तरी त्यावेळी पेरलेले श्रमाचे बीज पुढील आयुष्यात फळफळून वर येईल.

22 जुलै -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमचे व्यक्तिमत्त्च इतरांपेक्षा वेगळे असल्याने कामानिमित्त संपर्कात येणार्‍या व्यक्तीशी जमवून घेणे जड जाईल. तुमचे विचार आणि कल्पना मौलिक असतील. त्यामुळे त्या इतरांना पटतीलच असे नाही. स्वभाव भावनाप्रधान आणि संवेदनशील असल्याने लहान लहान घटनांचा व इतरांच्या एखाद्या शब्दाचा मनावर खोल परिणाम होईल. काही कारण नसताना व संबंध नसताना कोर्टात हेलपाटे घालावे लागतील. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत कुणाशी पटणार नाही. म्हणून आर्थिक बाबतीत तुम्ही स्वतःचे स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यास आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

Deshdoot
www.deshdoot.com