धनसंग्रह करणे शक्य होईल

त्रैमासिक भविष्य - मीन
त्रैमासिक भविष्य - मीन
त्रैमासिक भविष्य - मीन Quarterly future - Pisces

जुलै - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-नेपच्यून, द्वितीयात मंगळ-राहू-हर्षल, तृतीयात-शुक्र , चतुर्थात रवि- बुध, अष्टमात केतू , लाभात प्लुटो, व्ययात शनी अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची अद्याक्षरे दी, दू, झा, ज्ञा, दे, दा,खा, चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरूध्द तोंड केलेल्या माशाची जोडी असे आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व- जल, राशी द्वीस्वभाव असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग-स्त्री, सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल पायावर आहे. पायाच्या दुखापतीविषयी सावध रहा. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता-विष्णू, मित्रराशी- कर्क, वृश्चिक. शत्रुराशी-मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, विनम्र, कल्पनाप्रीय, उतावळा, परिश्रमी, इमानदार, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

द्वितीयात हर्षल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास तसा त्रास होणार नाही. मोठ्या योजना आखण्याचे काम स्थगित ठेवा, वाहनाच्या संस्थात काम मिळण्यास हा काळ चांगला आहे.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

ऑगस्ट - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी गुरू-नेपच्यून, द्वितीयात राहू-हर्षल, तृतीयात -मंगळ, पंचमात रवि- शुक्र, षष्ठात बुध, अष्टमात केतू, लाभात शनी-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीय स्थानी मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. लढाऊ वृत्ती राहिल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग असेल. भावंडांसाठी खर्च करावा लागेल.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन राहील. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. शत्रुवर विजय मिळवाल. प्रेमप्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललितकला, लेखन, सट्टे, शेअर्स यापासून लाभ होतील. कन्येचा विवाह जुळण्याचे योग.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासास निघावेसे वाटेल. विद्याभ्यासातही खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवावा वाटेल. त्यासाठी बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशाप्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसे मिळतीलही पण असे व्यवहार जपून करावे. विनाकारण विषाची परीक्षा घेणे तोट्याचे आहे.

स्त्रियांसाठी - पतीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळावे. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-नेपच्यून, द्वितीयात राहू-हर्षल, तृतीयात मंगळ, षष्ठात रवि-शुक्र, सप्तमात बुध, अष्टमात केतू, लाभात शनी-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

लाभात आलेला शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने प्रचिती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करणारे शत्रू नष्ट होतील किंवा सरळ वागतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. संततीच्या बाबतीत काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. लबाडांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तिमत्व प्रभावशाली राहील. संसारात फार चातुर्याने वागाल. उत्तम मित्र मिळतील. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. चालण्याचा नियमीत व्यायाम करा. सरळ स्वभाव राहील. हाताखालील लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल.

स्त्रियांसाठी - पती पत्नीचे आपापसातील प्रेम चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नका. काटकसर करा.

विद्यार्थ्यांसाठी- अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे दुर्लक्ष करावे. भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com