Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

11 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून,सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. बुद्धी अतिशय तीक्ष्ण आहे. सामाजिकतेची भर पडल्याने दुधात साखर पडल्यासारखे झाले आहे. आत्मविश्वास दांडगा आहे. करिअर करण्याच्या दृष्टीने अनेक संधी प्राप्त होतील. नावलौकीक प्राप्त होईल. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत भाग्यवान असले तरी पैशाच्या बाबतीत आकर्षण वाटणार नाही. तरीही अर्थप्राप्ती भरपूर असेल.

- Advertisement -

12 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास सिंह आहे. इच्छाशक्ती प्रबळ असून महत्वाकांक्षा दांडगी आहे. कोणतेही काम सर्व शक्तीनिशी कराल. आदर्शवादी वृत्तीमुळे मित्रांची संख्या मोठी असेल. आर्थिक बाबतीत स्वतःचे निर्णय कार्यान्वित केल्यास आर्थिक स्थिती सुधारत जाईल. गुुंतवणूकीच्या बाबतीत निर्णय अचूक असतात.

13 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. स्वतंत्रबाणा असल्यामुळे दुसर्‍याच्या निर्देशनात काम करणे जड जाईल. प्रमुखपदी नेमणूक झाल्यास उत्तम यश मिळेल. कधी कधी घरातील व बाहेरील लोकांचे सहकार्य मिळणे कठीण जाईल. त्यामुळे कुटुंबापासून दूर जाणे योग्य राहील. आर्थिक स्थितीची इतरांना केल्पना येणे कठीण राहील. तरी मोठ्या प्रमाणात पैसा मिळत राहील. मात्र पैशापेक्षा त्यातून मिळणार्‍या अधिकाराबद्दल जास्त आकर्षण राहील.

14 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि,हर्षल, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. बुध व सूर्याचा एकत्रित प्रभाव फार चांगला आहे. घाईने निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे स्वभाव काहीसा क्रोधी व उतावळा राहील. जनतेशी संबंध येईल असे कोणतेही काम निवडल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. नवीन योजना तयार करण्यात हुशार आहात. सर्वंकश ज्ञानामुळे कोणत्याही करिअरमध्ये उत्तम धनप्राप्ती करणे सहज शक्य होईल.

15 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या रवि, शुक्र, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. स्वभाव अतिशय उदार असून सर्वांविषयी सहानुभूती वाटेल. प्रेमळ स्वभावामुळे मित्रांची संख्या मोठी राहील. सामाजिक कार्यात झोकून द्याल. पैशाचा ओघ नैसर्गिकपणे तुमच्याकडे येत राहील. त्यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही

16 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल,नेपच्यून, रवि, हर्शल ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास सिंह आहे. स्वभाव अतिशय महत्त्वाकांक्षी राहील. ललितकलाविषयी आकर्षण वाटेल. थोड्याश्या अभ्यासाने त्यात प्राविण्य संपादन होईल. स्वतःसाठी पैशाचे आकर्षण वाटणार नाही. मात्र इतरांचे भले व्हावे म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पात्रता यावी म्हणून मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती कराल.

17 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि,शनि, चंद्र,नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, इच्छाशक्ती प्रबळ राहील. स्वभाव गंभीर व मते निश्चीत राहतील. आयुष्याच्या पूर्वार्धात अनेक जबाबदार्‍यांमुळे प्रगतीत अनेक अडथळे येतील. इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे भरपूर धनसंग्रह होऊ शकेल. कमी श्रमात व कमी वेळात अधिक धन देण्याचे आमिष दाखवणार्‍या योजनांपासून दूर रहा.

- Advertisment -

ताज्या बातम्या