किरोच्या नजरेतून

24 ते 30 नोव्हेंबर 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

24 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. जीवनात असलेला शुक्र व गुरूचा प्रभाव अन्य बाबतीत फायद्याचा आहे. तुमचे व्यक्तीमत्व सर्वांना हवेहवेसे वाटेल. नातेवाईकांना मदत करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी राहील. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे. ऐश्वर्याची आवड असून धनसंग्रहात यश मिळेल.

25 नोव्हेेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. नेपच्यूनचा प्रभाव बुद्धीपेक्षा मनावर विशेषतः आंतर्मनावर जास्त राहील. त्यामुळे भावी घटनांसंबंधी सूचक स्वप्ने पडतील. सहकार्‍यांच्या बाबतीत अति संवेदनशील आहात. भोवतालच्या वातावरणाचा लवकर परिणाम होतो. वारसाहक्काने म्हणा किंवा अन्य प्रकारच्या बक्षिसाद्वारे अर्थप्राप्ती होईल.

26 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. जीवनात उत्तम प्रगती होईल. अवैध मार्गाने धनप्राप्ती केल्यास जीवनात अनेक संकटे निर्माण होतील. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाल्यास चांगल्या मार्गाने जाल. आपले खरे मानण्याची व करण्याची वृत्ती राहील. चांगल्या मार्गाचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. अन्यथा दारिद्याच्या गर्तेत कोसळाल.

27 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. सैन्य दलाचे करिअर तुमच्यासाठी चांगले राहील. व्यवस्थापन कौशल्य आणि योजना कृतीत आणण्याची क्षमता चांगली आहे. सरकारी प्रशासन संबंधित खात्यातही तुमचही प्रगती उत्तम होऊ शकेल. तसेच काहींना उत्तम शल्यविशारद होण्याची संधी मिळेल. आयुष्याच्या सुरूवातीला संघर्ष करून आपल्या जीवनात आर्थिक सुस्थिती प्राप्त करू शकाल.

28 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या हर्शल, गुरू, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. सूर्याच्या प्रभावामुळे चेहर्‍यावर झळाळी राहील. राजकारणात उत्तम यश मिळेल. सर्वांशी सहानूभूतीपूर्वक वागणूक राहील. संभाषणात विनोद पेरण्यााच्या विशीष्ट शैली अवतीभोवती हास्याचे कारंजे उडत राहतील. त्यामुळे लोकप्रियता चांगली वाढेल. राजकारणी लोकांना आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. जीवनात यश प्राप्त होणार असल्यामुळे धनप्राप्तीच्या बाबतीतही यशस्वी व्हाल.

29 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, गुरू या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास धनु आहे. चंद्र कमजोर असल्यामुळे कोणताही निर्णय घेणे कठीण जाईल. स्वतःच्या मनाला निर्णय घेण्याची सवय करवून घेतल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. करिअर निवडण्याच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कल्पनाशक्तीवर आधारित कलात्मक कार्यात उत्तम यश मिळू शकेल. दुसर्‍यावर लवकर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे बर्‍याच वेळा आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. विवाहाद्वारे पत्नीच्या नातेवाईकांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

30 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. गुरू व मंगळ यांची युती हा एक अतिशय सामर्थ्यवान योग आहे. कोणतेही महत्त्व प्राप्त होऊन उत्तम यश मिळेल. सुरूवातीच्या काळात तुम्हाला अनेक अडचणी व संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास दांडगा राहील. काहींच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र नियतीने हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या खांद्यावर संसाराचा भार लवकर पडेल. वाईटातून चांगले असे की त्यामुळे लहानपणीच जबाबदारी घेण्याची सवय लागेल. कोणत्याही प्रकारचे काम केले तरी लक्ष्मी प्रसन्न राहील. पैसा मिळत असल्यामुळे त्यासाठी कराव्या लागणार्‍या अति श्रमाचा परिणाम होऊन स्वास्थ्य हानी होऊ नये याची काळजी घ्यावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com