Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

22 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, चंद्र, रवि, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. सहसा एकत्रित न येणारे हर्षल व बुध ग्रह आहे. त्यामुळे तुमचे जीवन आगळे वेगळे असेल. स्वभाव स्वकेंद्रित आहे. संपर्कात येणारे लोक व हव्या असलेल्या वस्तू इतरांपेक्षा आगळ्या वेगळ्या असतील. जीवनात अचानक व अकल्पित अशा घटना घडतील. त्यामुळे जीवनास वेगळे वळण लागेल. भविष्यकाळातील घटनांची चाहूल लागेल. आर्थिक जीवनात चढ उतार राहतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात झाली तरी पैसा हाती राखून ठेवणे जड जाईल.

- Advertisement -

23 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्रया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. बुद्धीचा कारक असलेला बुध ग्रह प्रबळ असल्याने बौद्धिक कामात चपळता असेल. इतरांना न सुचणारे उपाय काढून प्रगतीच्या मार्गावर उत्तम घोडदौड चालू राहील. वैचारिक वेगवान गतीशी मेळ खाणारे लोक सहसा उपलब्ध नसल्याने सहकारी मिळणे जड जाईल. कमी श्रमात व कमी वेळात अधिक पैसा मिळवून देणार्‍या सर्व फार आकर्षणवाटेल. शेअर्स सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घेण्याची इच्छा पूर्ण होईल. व त्यात उत्तम यशही मिळेल. वेगवान वैचारिक गतीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आवक होईल.

24 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास कर्क आहे. ग्रहांची चौकट भाग्यकारक आहे. जनतेच्या संबंधित सर्व प्रकारच्या व्यवसायात चांगले यश मिळेल. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे संगीत,कला, साहित्य यात उत्तम यश मिळेल तरीही अधोगतीचा झटका लागण्याशी शक्यता आहे. त्याकाळात फार उदास व दुःखी असल्यासारखे वाटेल. आर्थिक बाबतीत फार भाग्यवान आहात. वारसा हक्काने किंवा अन्यप्रकारे प्रॉपर्टी किंवा बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.

25 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,नेपच्यून, बुध, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. इतरांच्या कल्पनाचा चांगल्याप्रकारे उपयोग करून त्यातून विपुल धनप्राप्ती करू शकाल. मात्र तुम्ही केलेला बदल इतका नाविन्यपूर्ण असेल की, या कल्पना इतरांच्या आहेत हे कोणाच्या लक्षातही येणार नाही. स्वभाव अत्यंत संवेदनशील असून तुमचे विचार उच्च पातळीचे व दूरदृष्टीचे असतील. गूढशास्त्राचे फार आकर्षण वाटेल. आर्थिक बाबतीत अनुभव विचीत्र असतील. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांबद्दल फसवणूक होण्याचा संभव असल्यामुळे सतर्क रहाणे आवश्यक आहे.

26 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,शनि, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. प्रत्येक कामावर तुमच्या व्यक्तीमत्वाची खास अशी छाप असेल. तुमची प्रगती प्रयत्नांपेक्षा नशीबावर जास्त अवलंबून राहील. त्यामुळे त्याविषयी काही करणे तुमच्या हातात रहाणार नाही. विनाकारण शत्रू कोर्ट केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल. मात्र सावधगिरी बाळगल्या त्यातून सुटू शकाल. मित्रांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. विज्ञान, गणित विषयात यश मिळेल.

27 जून – वाढदिवस असलेल्या बुध, चंद्र, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. पण त्यामुळे वादविवाद व भांडणे होण्याची शक्यता आहे. स्पष्टवक्तेपणामुळे शत्रुंची संख्या मोठी राहील. नवीन संशोधनात यश मिळेल. उतावळ्या स्वभावामुळे आर्थिक बाबतीत घाईने निर्णय घ्याल व त्यातूनही चांगले यश मिळेल.

28 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, रवि, हर्षल, बुध या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कर्क आहे. स्वभाव दयाळू राहील. सर्वांशी सहानुभूतीचे संबंध रहातील. मात्र कधी कधी स्तुतीने हूरळून जाऊन स्वतःचे नुकसान करून घ्याल. महत्त्वाकांक्षेच्या आड अनेक संकटे येतील. तरी या सर्वांवर मात करून आपले लक्ष्य प्राप्त कराल. त्यासाठी बरीच धडपड व प्रयत्न करावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या