किरोच्या नजरेतून

22 ते 28 डिसेंंबर 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

22 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकरआहे. हर्षलच्या प्रभावामुळे जीवनात अनेक वळणांचा अनुभव येईल. हर्षल शनीचा जुळा भाऊ आहे असे म्हणतात त्यामुळे जीवन नेहमी नशीबावर अवलंबून राहील. बुद्धीमत्ता तीव्र असल्याने विशिष्ट विषय निवडून त्यात प्राविण्य संपादन करता येईल. कल्पनाशक्ती चांगली आहे. संबोधक वृत्ती चांगली आहे. आर्थिक परिस्थिती कधी कमी आवक तर कधी जास्त आवक अशी राहील.

23 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. जीवनात बुध ग्रहाचा प्रभाव महत्त्वाचा राहील. बुद्धीमत्ता तीव्र असल्यामुळे मानसिक स्थिती चंचल राहील. त्यासाठी हात किंवा बुद्धी सतत कामात गुंतवून ठेवले पाहिजे. फार महत्त्वाकांक्षी आहात. क्रिडा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. पण त्यातील अपघातापासून सावध रहावे लागेल. साहित्य, विज्ञान, वैद्यक, कायदा यापैकी एखाद्या क्षेत्रात यश मिळेल. पैसा हातचा मळ आहे असे वाटण्या इतका पैसा सहज मिळेल.

24 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. अतिथी सत्काराची आवड आहे. मित्रमंडळ खूप मोठे असेल. पाळीव प्राण्यांची आवड आहे. वैवाहिक संंबंध बर्‍याच दुरच्या स्थळी घडून येईल. नातेवाईक व सर्वांशी संबंध प्रेमाचे व नेकीचे असतील. धनप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न केला नाही तरी विपुल प्रमाणात पैसा मिळेल. शिवाय विवाह, बक्षीसाद्वारे धनप्राप्ती होईल.

25 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. नेपच्यून ग्रहाचा जास्त प्रभाव राहील. अध्यात्म व गूढशास्त्रात चांगली प्रगती होऊ शकेल. जीवनातील भावी घटनांची स्वप्नाद्वारे, अगोदरच सूचना मिळतील. गूढशक्तीकडून सारखे मार्गदर्शन होत राहील. असा वारंवार त्रास होत राहील. त्यामुळे महत्त्वाकांक्षा वाढत राहील. तिच्यावर अंकुश ठेवल्यास फायद्याचे राहील. आर्थिक बाबतीत मते व मार्ग वेगळा असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत लबाडांपासून सावधान रहा.

26 डिेसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. शनीचा प्रभाव आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षेत अनेक अडचणी उभ्या राहतील. स्थितप्रज्ञ स्वभावामुळे त्यावर मात करून पुढे जाल. उत्तम न्यायाधीश,वकील, व्यापारी म्हणून चांगले यश मिळेल. साहसी स्वभावामुळे जीवनात उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारत राहील. अनेक नातेवाईकांची जबाबदारी उचलावी लागल्यामुळे आर्थिक स्थितीवर ताण पडेल.

27 डिसेेंंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. तुम्ही फार आशावादी आहात. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेतांना वृत्ती काहीशी हुकूमशाही राहील. निडर वृत्तीमुळे अचानक उद्भवलेल्या प्रसंगातून जाण्यासाठी लोक मदत करतील. विवाहापासून आर्थिक फायदे संभवतात. एकापेक्षा अधिक विवाहाची शक्यता. आर्थिक बाबतीत फार भाग्यवान आहात. अकल्पितपणे वारसाहक्क, विवाह, शेअर्ससारख्या व्यवहारातून आर्थिक लाभ होतील.

28 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या शनि,सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. स्वभाव नेहमी आनंदी, आशावादी राहील. उत्साह दांडगा राहील. उदारमतवादी आहात. आपले मत स्पष्ट सांगण्याची सवय आहे. धाडसाने नवनवीन कामात उडी घेणे फार आवडते. इतरांना मदत करण्यामुळे सहसा कोणी फसवू शकणार नाही. कोणत्याही प्रकारच्या कामापासून विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घेऊ नये.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com