Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

1 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, गुरू, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. स्वभाव आनंदी व दांडगा आहे. चेहर्‍यावर सदैव हास्य झळकत राहील. आशावादी आहात. नवनवीन कल्पना कृतीत आणण्याचे धाडस तुमच्यात आहे. एका उद्योगात अपयश आले तर लगेच उद्योगाचा मार्ग बदलून दुसरा उद्योग सुरू कराल. काही झाले तरी शेवटी यशाची माळ गळ्यात पडेल. आध्यात्मिक शक्तीमुळे समोरच्याच्या मनात काय चालले आहे ते लगेच समजते. कुणीही फसवणूक करू शकणार नाही. कर्तृत्त्वशक्ती चांगली आहे. मात्र दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जमत नाही.

- Advertisement -

2 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास धनु आहे. स्वभाव सौम्य आहे. आशावादाबद्दल साशंक असता. आत्मविश्वास थोडासा कमी आहे. सांसारिक प्रगतीबद्दल विशेष रस नसून अध्यात्मात जास्त रमता. बौद्धिक उंची जास्त आहे. अध्यात्म, धर्म, गूढशास्त्रे आणि तत्सम शास्त्रात गोडी वाटेल. स्वप्ने बर्‍याच प्रमाणात खरी होतात. भावी काळातील घटनांची चाहूल अगोदरच चाहूल लागते. बरीच भाकिते खरी होतात. धार्मिक गुरू किंवा शिक्षक म्हणून चांगले यश मिळेल. पैसे मिळवण्यात जरी रस वाटला नाही तरी बुद्धीमत्ता व अनाकलीय सामर्थ्य पाहून कोणत्याही क्षेत्रात उच्चपद प्राप्त होईल.

3 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. भाग्यांक 3 असल्याने गुरू ग्रह अतिशय प्रबळ झाला आहे. गुरूच्या सामर्थ्याने ज्या कार्यात हात घालाल त्याचे सोने कराल. नेत्याचे गुण नैसर्गिकपणेच असल्याने कोणत्याही क्षेत्रात गेले तरी लोक प्रमुखपद देतील. त्या पदाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळून लोकांचा विश्वास खरा करून दाखवाल. धनप्राप्ती चांगली असून वृद्धापकाळासाठी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.

4 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, सूर्य हर्षल ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. जीवनात अनेक अकल्पित वळणे असतील. हर्षल जीवनावर कधी आपली क्रूर छाया पाडेल ते सांगता येणार नाही. जीवनात कर्तृत्त्वापेक्षा नशीबाचा जास्त भाग असेल. स्वतंत्रवृत्ती असल्याने दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जड जाईल. आर्थिक बाबतीत कधी फायदा तर कधी तोटा असा चढउतार सारखा चालू राहील. त्याचा पूर्वी अंदाज येणार नाही.

5 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या बुुध, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. सतत कामात मग्न असणे याचे जणू व्यसनच आहे. हाताला काम किंवा डोक्यात भावी योजनांचा आराखडा बनविण्यात मग्न असणे असा तुमचा सारखा उद्योग चालू असतो. अतिशय स्वतंत्र वृत्ती, प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि प्रचंड आशावाद असे जीवनाचे थोडक्यात वर्णन करता येेईल. आवडी निवडी पक्क्या असतील. त्यात थोडा जरी बिघाड झाला तरी रागाचा पारा एकदम वर चढेल. लोकांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारांनी धनप्राप्ती कराल. गुंतवणूकीतून लाभ होईल.

6 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास धनु आहे. गुरू व शुक्र एकत्रित असल्यामुळे स्वभावाला वेगळीच मनोरंजक झळाळी आलेली आहे. हृदयाची श्रीमंती पाहून लोक जीव टाकतील. तुम्ही जेथे जाल तेथे स्वच्छ वातावरण तयार झाल्याने उदासीनता औषधालाही सापडणार नाही. प्रयत्न करा किंवा नाही धनप्राप्ती होतच राहील. त्यात आणखी विवाहाद्वारे व अन्य बक्षिसाद्वारे भर पडत राहील.

7 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, गुरू, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. वरील तीनही ग्रह एकत्र आल्यामुळे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी झाले आहे. पण त्याबरोबरच जीवनात अनेक विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपच्यूनमुळे बौद्धिक प्रगती चांगली राहील. स्वप्नाद्वारे घडणार्‍या घटनांची चाहूल अगोदरच लागेल. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क रहा.

- Advertisment -

ताज्या बातम्या