किरोच्या नजरेतून

22 ते 28 सप्टेंबर 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

22 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. हर्शलच्या प्रभावामुळे भौतिक व स्वतंत्र अशा कल्पना सुचतील. त्यामुळे स्वभाव विचीत्र आहे. असे प्रतिस्पर्ध्यांना वाटेल. कोणाशी लवकर मैत्री करणे जमणार नाही. त्यामुळे मित्रांची संख्या कमी राहील. आर्थिक बाबतीत अनेक जणांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्वतंत्रपणे चांगला पैसा मिळेल.

23 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास तुला आहे. निरनिराळ्या व्यक्ती व वेगवेगळ्या परिस्थितीशी सहज जमवून घ्याल. हा तुमचा प्लस पॉईट आहे. कोणत्याही प्रकारचे करिअर अथवा धंदा असला तरी त्यात सहज यशस्वी होऊ शकाल. एकाच वेळी अनेक प्रकारच्या उलाढालीत आणि उद्योगात भाग घेतल्याने आर्थिक स्थिती चांगली होणार यात शंका नाही.

24 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. जीवनावर शुक्राचा प्रभाव जास्त राहील. सुरूवातीला अनेक प्रेमप्रकरणे असली तरी नंतरच्या काळात विवाहानंतर जीवन सुरळीत होईल. वैवाहिक सुख सुरळीत होतील. पारंपारिक कौटुंबिक धंदा स्वीकाराल किंवा धाडस आणि स्वतंत्र जीवनाच्या प्रबळ इच्छेमुळे घर सोडून स्वतंत्र करिअर उभे कराल. भाग्याची चांगली साथ लाभेल. मित्र व सहकार्‍यांच्या भरघोस आर्थिक मदतीमुळे आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

25 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. आदर्शवादाकडे कल राहील. विचार उच्च असून कल्पनाशक्तीही प्रबळ राहील. दुसर्‍याला एखादी गोष्ट पटवतांना तिची कारणे सविस्तर समजावून सांगत पण आपली मते दुसर्‍यांवर लादणे आवडणार नाही. आर्थिक बाबतीत काळजी घेणे हा स्वभाव धर्म आहे. संधी चुकवू नका. धनी व्हाल.

26 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. सुरूवातील प्रगतीत अनेक अडथळे येतील. वयाच्या 35 व्या वर्षानंतर अशा सर्व अडथळ्यांना पार करून प्रगतीकडे वाटचाल बिनधास्तपणे चालू होईल. जास्त मिसळून रहाणे जमणार नाही. तुमच्या कष्टाचे फळ लुबाडण्याचा इतर लोक प्रयत्न करतील. सावध रहावे. अतिसावधानतेमुळे झालेल्या आर्थिक संधी वाया जाऊ न दिल्यास आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

27 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. स्पष्टवक्तेपणा हा विशेष गुण आहे. दुसर्‍याचा दोष त्यांच्या तोंडावर सांगणे कधी कधी महागात पडेल. शत्रुसंख्या वाढत राहील. मेेकॅनिकल इंजिनिअर होऊन यंत्राद्वारे फायदा मिळवू शकाल. पैसा मिळवणे अवघड काम नाही कामाच्या झपाट्यामुळे भरपूर पैसा मिळेल.

28 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. निसर्गाचा अभ्यास करण्याची आवड आहे. उद्योगशील असून हाती घेतलेले काम जलद गतीने करणे आवडतेे. पैसा मिळवण्यासाठी जीवनात अनेक संधी प्राप्त होतील. इतरांचा विश्वास संपादेन केल्यामुळे सतत पदोन्नती होत राहील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com