
सौ. वंदना अनिल दिवाणे
2 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शनि, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. आदर्शवादी आहात. स्वभाव महत्त्वाकांक्षी असून जीवन सुधारण्याचे अनेक मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध असतील. जीवनात सुरूवातीला त्रास काढावा लागेल. आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अनेक प्रकारचे बदल संभवतात. प्रवासाची आवड राहील. मानवी समाजाला उपयुक्त गोष्टी कल्पनाशक्तीतून निर्माण कराल. जीवनाच्या उत्तर भागात श्रीमंतीचे योग आहेत. वारसाहक्कानेही पैसा मिळेल. अनेक प्रकारची बक्षिसे व सन्मान प्राप्त होतील.
3 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरु, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. सामाजिक संस्था, सरकारी खाते, राजकारणात चांगले यश मिळेल. बौद्धीेक कामात यश मिळेल. शारिरीक कामात रस वाटणार नाही. मोठमोठ्या संस्थांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकाल. काहीही केली तरी यश मिळेल यात शंका नाही. आर्थिक बाबतीत इतरांपेक्षा चांगले यश मिळेल.अधून मधून तोट्याची शक्यता तरी सावध रहावे.
4 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि , हर्षल, शनि, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. विचार मौलिक आहे. नवनवीन विचार करण्याची सवय आहे. नवीन प्रकारच्या अध्यात्मिक विचाराकडे जास्त आकर्षित होता. सामान्या लोकांशी म्हणावे तसे जमणार नाही. तुमचा स्वभाव संवेदनशील आहे. त्यामुळे इतरांशी जवळीक साधणे जड जाते. तुमच्याविषयी इतरांचे गैरसमज होतात. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेता. सामान्य माणसांना असते तेवढे पैशाचे वेड तुम्हाला नाही. पैसे मिळवण्याचे मार्ग इतरांपेक्षा वेगळे आहेत. नुकसान झाले तरी इतरांपेक्षा वेगळे होतील. लबाडांपासून दूर रहा.
5 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. दोन्ही ग्रह एकत्र येणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. बुधामुळे चांगले विचार व शनिमुळे कष्ट करण्याची आवड पुढे जाण्यास उद्युक्त करेल. मानवी स्वभावबद्दल चांगली जाण आहे. विचारांचे पृथक्करण चांगल्याप्रकारे करता येईल. पैसा किंवा सत्ता याचे आकर्षण नाही. पण तुमचे कार्य इतरांनी मान्य करावे म्हणून तुम्ही धडपडता. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही दिलेला सल्ला फायद्याचा राहील. स्वतःसाठी मात्र उपयोग करत नाही. बौद्धिक कामात श्रीमंत व्हाल.
6 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे.आपल्यावर मनापासून प्रेम करावे असे तुम्हाला सारखे वाटत राहील. पण अशी प्रेमाची भूक भागविणारी व्यक्ती मिळणे कठीण आहे. लहानपण जरी त्रासात गेले असले तरी तारूण्याचा काळ सुरू होताच भाग्योदय होईल. बर्याच वेळा बेभरवश्याच्या संस्थामधून केलेली गुंतवणूक पैसा देऊन जाईल. सार्वजनिक संस्थामधून पदाधिकार्याच्या रूपाने चांगला पैसा मिळू शकेल.
7 फेब्रुवारी -वासूढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, नेपच्युन, चंद्र, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुमचा स्वभाव अतिशय संवेदनशील असल्याने इतरांच्या नकळत उच्चारलेल्या एखाद्या शब्दानेही आपला अपमान झाला असे वाटत राहील. तसेच आपले करिअर नेमके कोणते हे तुम्हाला लवकर कळणार नाही. आपल्या भोवतालचे वातावरण व संपर्कात येणार्या लोकांबद्दल तुम्ही फार सतर्क म्हणजे जागरुक रहाल. सरकारी गुंतवणूकीत पैसा सुरक्षित राहील.
8 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे राहील आणि ते वेगळेपण इतरांच्या लगेच लक्षात येईल. कोणतेही करिअर असले तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार कराल. कारण तुम्हाला मुळातच अध्यात्माची आवड राहील. तुमच्या जीवनात अशा काही विचित्र घटना घडतील की त्यामुळे लहान वयातच तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडेल. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास आवश्यकतेपुरता पैसा जवळ राहील.