किरोच्या नजरेतून

23 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

23 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्युन, बुध, शनी, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. बुध आणि शनीचा एकमेकाला सहयोग असणे तसेच बुधाच्या तीक्ष्ण बुद्धीला शनीच्या अथक परिश्रमाची साथ मिळणे हा एक मोठा योग आहे. त्यामुळे बौद्धिक कार्यात तुमची चांगली प्रगती होईल. स्वतंत्र बाणा व दुसर्‍यावर अधिकार गाजविण्याची वृत्ती राहील. मानवी मनाचा तुम्ही बारकाईने अभ्यास कराल. आर्थिक बाबतीत तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकाल. बौद्धिक कार्यातून विपुल धनप्राप्ती होईल.

24 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनी, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. 24 तारखेला जन्म झाल्यामुळे तुमच्यावर गुरुचे प्रभुत्व राहील. प्रेमामध्ये सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती राहील. कलाकौशल्याचे तुम्हाला फार आकर्षण राहील. तत्संबंधित अथवा जनतेसमोर येण्यास आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यवसायात उत्तम यश मिळेल.आर्थिक बाबतीत भाग्य शोधत येईल.

25 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि, या ग्रहाचा वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्युन, चंद्र, हर्षल, शनी, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. 25 तारखेचा जन्म असल्याने तुम्हाला गुरुचीही साथ मिळेल. स्वतःचा आवडता उद्योग करण्यामध्ये कितीही अडथळे आले तरी ते पार करुन तुम्ही त्यात यश मिळवाल. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा एखादे ध्येय किंवा लक्ष्य ठरवून ते प्राप्त करण्यासाठी धडपडत राहण्याची तुम्हाला फार आवड वाटेल. नेहमी हातात पैसा खेळते राहील.

26 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, हर्षल, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा थोडे हटके असेल. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची तुमची सवय आहे. मग तुम्ही कोणत्याही व्यवसायात अथवा नोकरीत असेना. त्या विचारांना तत्वज्ञानाची झालर असेल. संधीच्या पाठीमागे न जाता त्याच तुम्हाला शोधून काढून महत्वाच्या किंवा जबाबदारीच्या पदावर आरुढ करतील. गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला भौतिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. एकाच कामात टिकून राहील्यास विपुल धनप्राप्ती होईल.

27 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनी, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमच्यावर ग्रहांची कृपा राहील. तुमची महत्वाकांक्षा दांडगी असेल. तुमचा बौद्धिक स्तर चांगला राहील. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे कला क्षेत्रात विशेषतः टीव्ही व सिनेमात तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. काही ना काही विशेष काम केल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे भाग्य प्राप्त होईल धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. केलेल्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न पाहून लोक चकित होतील. कर्तृत्वाबरोबर दैवाची साथ असल्याचा अनुभव अवश्य येईल. गुंतवणूकीतून भरपूर उत्पन्न मिळेल.

28 फेबु्रवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. कौटुंबिक परिस्थितीत अनपेक्षित बदल संभवतात. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तुम्ही आपला असा स्वतंत्र उद्योग करुन आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत कमी श्रमात व कमी वेळात अधिक पैसा मिळविण्याचे आमिष दाखविणार्‍या सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घेऊ नये.

1 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. बौद्धिक विचारापेक्षा तुमच्यावर मन व भावना यांचा जास्त पगडा राहील. तुम्हाला जन्मतःच अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त आहे. त्यामुळे आयुष्यात होणार्‍या भावी घटनांची सूचक स्वप्नाद्वारे आधीच चाहूल लागेल. श्रद्धा सबुरीचा अवलंब यशदायी ठरेल. आर्थिक बाबतीत चिंता करण्याची तुमची सवय असली तरी प्रत्यक्षात तुम्हाला तशी अडचण कधीच अनुभवावी लागणार नाही. नोकरी व व्यवसायात भरभरून यश मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com