किरोच्या नजरेतून

29 डिसेंंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

29 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. भौतिक फायद्यापेक्षा आध्यात्मिक विचारांचा तुमच्यावर जास्त प्रभाव राहील. विचारांची बैठक उच्च दर्जाची राहील. धर्म अध्यात्म व गूढशास्त्रांची आवड राहील. स्वप्नाद्वारे पुढील घटनांची सूचना मिळेल पण त्यातून फायदा घेणे जमणार नाही. खाण्यापिण्याच्या आवडी विशीष्ट प्रकारची आहे. स्वभाव अतिशय संवेदनशील आहे. धनप्राप्तीचे आकर्षण नाही पण उच्चपद प्राप्तीमुळे मिळालेल्या पैशांचा इतरांना मदत करण्यासाठी उपयोग कराल.

30 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. ग्रहांची चौकट अतिशय सामर्थ्यवान आहे. त्यामुळे जीवनात भरभरून यश मिळेल. व्यवस्थापनाच्या कार्यात विशेष यश मिळेल. राजकारणात उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. त्यातून किर्ती संपत्ती दोन्ही गोष्टींची प्राप्ती होईल. शिवाय कॉन्ट्रॅक्ट, बिल्डर, ट्रान्सपोर्ट इ. मध्येही चांगला फायदा होऊ शकेल. मिळालेल्या धनाची उत्तम गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळ सुखाचा जाईल.

31 डिसेेंंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. हर्षल हा शनिचा जुळा भाऊ असल्यामुळे जीवन नशीबाच्या प्रवाहात वाहत राहील. तुमची बुद्धीमत्ता अतिशय तीव्र आहे. कल्पनाशक्ती उत्तम आहे. संशोधनाच्या काळात यश मिळेल. आपण बरे व आपले काम बरे असा स्वभाव असल्यामुळे इतरांच्या मनात गैरसमज होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र वृत्ती असल्याने दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जड जाईल. प्रमुख म्हणून काम केल्यास उत्तम धनप्राप्ती होईल. इतरांना मदतीसाठी या धनाचा उपयोग कराल.

1 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. स्वभाव अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. स्वतंत्र विचाराचे असून मौलीकता तुमचा विशेष गुण आहे. त्यातून निर्माण होणार्‍या सृजनशीलतेचा चांगला फायदा होईल. प्रत्येक बाबींच्या बारीक तपशीलात जाणे फार आवडते. एकदा का लक्ष निर्धारित केले की, ते प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नात असता. आर्थिक बाबीत सावध असल्याने योग्यप्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून चांगली धनप्राप्ती होईल.

2 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. चंद्र व नेपच्यूनच्या प्रभावामुळे तुमचा स्वभाव सौम्य, कल्पक राहील. अंतर्मनात दैवी शक्तींचा प्रभाव असल्याने भावी घटनांची चाहूल आधीच लागेल. स्वप्ने खरी ठरतील. आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती अस्थिर राहील. त्यामुळे एकाग्रता प्राप्त करणे कठीण जाईल. जगण्यासाठी आवश्यकतेपुरते पैसे असावे एवढीच अपेक्षा आहे. तरीही उत्तम धनप्राप्ती होत राहील.

3 जानेवारी- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. गुरूच्या प्रभावामुळे स्वभाव आक्रमक राहील. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात इतरांना विशेष दम वाटेल. कामाच्या बाबतीत विधायक वृत्ती असून तुमच्या योजना मोठ्या असतील. मोठ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक कराल.

4 जानेवारी - वाढदिवस असलेल्या शनि,रवि, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. स्वतंत्र बाण्याचे आहेत. त्यामुळे तुमचे विचार वेगळे आहेत. गैरसमज झाल्यामुळे भोवताली माणसे असूनही एकटे पडाल. प्रत्येक ठिकाणी विरोधक भेटतील. पण शांत राहून निश्चयाने पुढे गेल्यास यश निश्चीत मिळेल. पैसा मोठ्या प्रमाणात मिळेल पण तुमच्या अति पैसा खर्च करण्याच्या वृत्तीमुळे पैसा हातात राहणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com