किरोच्या नजरेतून

9 ते 15 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

9 फेब्रुवारी - वाढदिवस असलल्या व्यक्तींवर मंगल, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुमच्या जीवनाचा मार्ग तुमच्या प्रयत्नापेक्षा नशिबावर जास्त अवलंबून राहील. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. तुमच्या प्रत्येक कामावर तुमच्या विशेष व्यक्तिमत्वाची स्पष्ट छाप दाखवणारी असेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची संमोहनशक्ती आहे. तुमची तर्कशक्ती उत्तम आहे. वादविवादात प्रतिपक्षावर त्यांचा एखादा कमजोर मुद्दा शोधून त्यांना जिंकण्यात तुम्हाला विशेष आनंद वाटेल. मानव समाजाबद्दल सहानुभूती वाटेल.आर्थिक बाबतीत प्रचंड यश मिळेल पण त्या संपत्तीचा स्वतः उपभोग न घेता चांगल्या ट्रस्टला दान करण्यात आनंद वाटेल.

10 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी,सूर्य या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुम्ही तुमचे काम स्वतःच्या योजनेप्रमाणे सिद्ध कराल. आयुष्यात सुरुवातीला बरेच कष्ट करावे लागतील. तुमच्या कुटुंबात आणि योजनांत अचानक अनेक बदल सुरुवातीला होत राहतील. फार लवकर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडेल. तुमच्या चतुरस्त्र बुद्धीमुळे मौलिक कल्पनांच्या आधारावर इतरांपेक्षा वेगळे अशा प्रकारे तुम्ही काम सुरु कराल. इझी मनीच्या मागे लागल्यास आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

11 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शनि, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. आदर्शवादी असून रोमँटीक आहात. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. स्वभाव अतिशय संवेदनशील असल्यामुळे सुरूवातीला सभोवतालचे वातावरण आणि संपर्कात येणार्‍या व्यक्तींशी जमवून घेणे कठीण जाईल. अतिसंवेदनतेमुळे आत्मविश्वास डळमळतो. संयमाने त्यावर मात करणे आवश्यक आहे. म्हणजे आत्मविश्वासात वाढ होईल. स्वतःच्या प्रयत्नाने व गुणामुळे आयुष्यात श्रीमंत व्हाल. वारसाहक्काने संपत्ती व स्थावर इस्टेट मिळण्याची शक्यता आहे. सन्मान आणि पुरस्काराची शक्यता आहे.

12 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात राजकारणात व सरकारी संस्थामधून यश मिळवाल. गुरूच्या उतावळेपणाला शनीने आळा घातल्याने तुमचा स्वभाव शांत राहील. कामात यश मिळवत रहाल. त्यातून बरेच काही प्राप्त करू शकाल. महत्त्वाकांक्षा जागरूक ठेवल्यास यश सहजतेने मिळेल. आर्थिक बाबतीत कोणतेही करिअर असले तरी जास्त यश मिळेल. तटस्थ स्वभावामुळे अनेकवेळा तोटा सहन करावा लागेल

13 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवरहर्षल,रवि, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. एक इशारा द्यावा वाटतो की, कोणत्याही ठिकाणी चार किंवा आठ हा आकडा आल्यास त्यागोष्टी टाळाव्यात. विचार मौलिक असतील. रूढीवाद्यांच्या विरूद्ध जाऊन आपल्याला आवडेल अशा प्रकारची कामे कराल. नवीन विचाराकडे जास्त कल राहील. त्यामुळे तुम्ही विचीत्र स्वभावाचे आहात असा गैरसमज होईल. पैशांपासून दूर रहाल. तुमचे पैसे मिळवण्याचे मार्ग तसे तोटा होण्याचे मार्ग इतरांपेक्षा वेगळे असतील.

14 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी,बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. वरील ग्रहांचे मिश्रण तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला प्रभाव टाकणारे आहे. शनीची श्रमाची आवड, बुधाची बुद्धीची तेज धार यामुळे बुद्धीला विशेष वळण लागेल. समोरच्याच्या मनात काय हे ताबडतोब समजते. भेदक दृष्टीतून समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार लपू शकत नाही. त्यामुळे इतरांवर एक प्रकारची सत्ता गाजवाल. वाचनाची फार आवड राहील. वाचलेले किंवा एकलेले लक्षात राहते. पैसा किंवा सत्ता याविषयी आकर्षण वाटणार नाही.

15 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. शुक्र शनीच्या एकत्रित प्रभावमुळे जीवनात प्रेमाच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कलाक्षेत्रात चांगली प्रगती होईल. उत्तम नावलौकीक मिळाल्याने अर्थप्राप्ती होऊ शकेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क रहा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com