किरोच्या नजरेतून

8 ते 14 सप्टेंबर 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

8 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. स्वतःच्या मताविषयी विशेष आग्रही रहाणार नाहीत. वयाच्या 35 व्या वर्षानंतर मनावरील असलेले दडपण झुगारून देऊन स्वतंत्र विचाराप्रमाणे काम कराल. मस्वभावात अतिचिकीत्सा व टीका करण्याची सवय आहे. शनीच्या प्रभावाने अतिसावधानता असल्यामुळे पैसा मिळवण्याच्या अनेक संधी निघून जातील. आपली गुंतवणूक सुरक्षित व्यापारात जसे कोळश्याच्या खाणी, जमीन, घरे इ. मध्ये गुंतवणूक कराल तर त्यातून उत्तम आर्थिक उत्पन्न येईल.

9 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. आपले मत प्रगट करताना मुळमुळीतपणाचे धोरण स्विकाराले. बोलण्यात खोचकपणा असण्याची शक्यता आहे. लहान सहान घटनांनी रागाचा पारा चढेल. वैज्ञानिक उपकरणांबाबत कुतुहल राहील. आध्यात्मिक व धार्मिक गोष्टींबाबत आकर्षण राहील. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. मौलिक विचारांतून केलेल्या कामामुळे बराच पैसा हाताशी लागेल.

10 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुद्धी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे ज्ञानग्रहण सोपे जाईल. कोणतेही करिअर मिळाले तरी त्यात जी तोड मेहनत कराल. निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व राहील. आयुष्याच्या मध्यानंतर कोणत्या तरी एका उद्योगात स्थिर व्हाल. आर्थिक बाबतीत धनप्राप्तीत अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील. औद्योगिक गुंतवणूक लाभदायक आहे.

11 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,नेपच्यून, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. कल्पनाशक्ती अतिशय प्रगल्भ आहे. बौद्धिक कार्यात चांगले यश मिळेल. आपले घोडे पुढे दामटण्याऐवजी शांतपणे जीवन जगणे हे जास्त आवडते. आर्थिक स्थिती बौद्धिक कामातून जोरदार सुधारेल. मोठा व्यापार करणार्‍या कंपनीत पदाधिकारी झाल्यास बराच पैसा मिळेल. शिक्षक अथवा प्रवास वर्णने लिहिणारा लेखक म्हणून उत्तम मानधन मिळेल.

12 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या बुध,गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. जन्मतःच असलेल्या परिस्थितीतून वर येऊन जास्त चांगली परिस्थिती प्राप्त करण्यासाठी धडपड कराल. भोवतालच्या माणसांवर हुकूमत चालवणे आवडते. आर्थिक यश उत्तम राहील. इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच असता. आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची भिती नाही. तरीही चिंता करण्याची सवय जाणार नाही. एकाचवेळी अनेक उद्योग करून धनप्राप्ती होईल.

13 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, नेपच्यून, सूर्य या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कन्या आहे. नेपच्यूनचा मोठा प्रभाव राहील. त्याचाच परिणाम म्हणून स्वतंत्र बाणा राहील. धनप्राप्तीसाठी स्वबळावर प्रयत्न करावे लागतील तरच विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकट्याने केलेल्या कामाच प्रचंड धनप्राप्ती आहे.

14 सप्टेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कोणत्याही व्यक्तीशी चांगले जमु शकेल. करिअरमध्ये अनेक वेळा बदल होण्याचा संभव आहे. असे असले तरी पैसे मिळत राहतील. कोणत्याही करिअरमध्ये धनप्राप्तीच्यादृष्टीने फायदा होईल. भाग्यानेही धनप्राप्ती होईल. वार्षिक उत्पन्न चालू राहील अशाप्रकारे गुंतवणूक करणे फायद्याचे राहील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com