
27 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. दोन शत्रू ग्रहांची तुमच्यावर एकाच वेळी नियंत्रण असल्याने जीवनात अनेक आकस्मिक आणि अद्भूत घटना घडतील. त्यावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. विशेषतः वयाच्या 31 ते 35 दरम्यान स्वतः ला आवडत नसलेल्या कामात गुंतवून घेण्याची वेळ येईल. 35 ते 60 वर्षाच्या दरम्यान आर्थिक उलाढाल जीवनात होईल. याच काळातील गुंतवणूक वृद्धापकाळात उपयोगी पडेल.
28 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, सूर्य, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. स्वभाव स्वतंत्र बाण्याचा आहे. मौलिक विचारामुळे सृजनशीलतेची फार तहान असेल. विशिष्ट स्वभावामुळे जीवनात यश मिळण्यात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. लक्ष्य निर्धारित केलेले असल्यामुळे वाटचाल त्या दिशेने होत राहील. काटकसरी स्वभावामुळे खर्चावर नियंत्रण राहील. बचतीवर जोर राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.
29 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. चंद्र व नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्ती चांगली आहे. अंर्तमन जागृतीमुळे पुढील घटनांची चाहूल आधीच लागेल. अतिशय संवेदनशील असल्यामुळे एखादी गोष्ट मनाविरूद्ध केली की अचानक प्रयत्नांचा पसारा आवरून काही काळ निष्क्रीय व शांत बसून मनाच्या जखमा उकरत रहाल. आहे त्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याची नेहमीच लोकांची समजूत होईल. कारण तीक्ष्ण बुद्दीमत्तेद्वारे हवा तितका पैसा त्वरीत मिळविण्याची कुवत आहे.
30 जानेवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. आपल्या दृढनिश्चयामुळे व स्वकर्तृत्वाने ती प्राप्त करू शकाल. शत्रुवर्ग मोठा असेल. तुमच्या प्रगतीमुळे अनेकांना मत्सर वाटेल. आपली हुकूम सर्वांनी पाळलाच पाहिजे असा स्वभाव आहे. मोठमोठ्या योजनांमधून गुंतवणूक केल्यामुळे कधी कधी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा.
31 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्शल, सूर्य, शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची कुंभ आहे. विचार मौलिक असतील. स्वतंत्रबाणा असल्याने इतरांच्या योजनात स्वतःला सामावून घेणे जमणार नाही. कौटुंबिक अडचणी संभवतात. स्वतःच्या योजनांप्रमाणे काम केल्यास भरपूर यश मिळेल. प्रचंड प्रमाणात पैसा मिळवूनही तो पाण्याप्रमाणे खर्च केल्यामुळे टिकणे कठीण जाईल. किर्ती चांगली टिकेल.
1 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्शल, शनि, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. जीवनाच्या सुरूवातीला बराच संघर्ष करावा लागेल. कौटुंबिक परिस्थितीत अनेक बदल संभवतात. लवकरच कुटुंबाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. विचार मौलिक असून बर्याच विषयात रस वाटेल. महत्त्वाकांक्षा दांडगी राहिल. विजयी होणार यात शंका नाही. बरोबर काम करणार्या लोकांशी म्हणावे तसे पटणार नाही. सदैव सतर्क रहा. डॉक्टर, वकील, आर्टीस्ट असे करीअर चांगले आहे.