किरोच्या नजरेतून

30 जून ते 6 जुलै 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

30 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, बुध, चंद्रया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असल्याने लक्ष्य साध्य करण्यासाठी धडपड कराल. त्यातून निश्चीतपणे यश मिळेल. तरीही मानसिक समाधान न मिळाल्याने पुढील लक्ष्य निर्धारीत करून कामाला लागाल. व्यवस्थापन कौशल्य चांगले असल्यामुळे पदाधिकारी, महापालिकेतील अधिकारी इ. पदे उत्तमप्रकारे भूषवू शकाल. मित्रसंख्या मोठी असेल. पैसे मिळवणे सोपे जाईल आणि धनसंग्रहही मोठा राहील. कितीही पैसा मिळाला तरी मनाचे समाधान न झाल्याने कामात गुंतून रहाल.

1 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, हर्षल, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. चंद्राचा जास्त प्रभाव असल्याने करिअरमध्ये बरेच बदल होतील. आपली जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. जीवनाच्या उत्तरार्धात चांगली प्रगती होईल. उद्योगात सतत बदल केल्यास धनसंग्रह करणे कठीण जाईल. त्याउलट उद्योगास धरून राहिल्यास इच्छेप्रमाणे धनप्राप्ती होईल.

2 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, रवि, हर्षल, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली आहे. प्रगतीच्या स्वप्नात रंगण्याची आवड आहे. ती स्वप्न खरी करणार यात शंका नाही. कामाचा प्रकार असा असेल की, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल व जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण होतील. घाईने निर्णय घेऊन आर्थिक गुंतवणूक केल्यास बराच वेळा नुकसान होण्याची शक्यता आहे.

3 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. स्वतंत्र बाण्याचे आहात. स्वभाव धाडसी व निडर आहे. सर्वांमध्ये लोकप्रिय आहात. आर्थिक सुस्थितीबद्दल तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. पूर्वार्धात केलेल्या कष्टाचा मजबूत आर्थिक पाया तयार होऊन त्याची उत्तम फळे उत्तरार्धात चाखाल.

4 जुलै - वाढदिवस असलेल्या हर्षल, सूर्य, बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. कल्पना व विचार अत्यंत मौलिक, विचारशील असल्याने इतरांना विचीत्र वाटतील. नातेवाईकांशी न पटल्याने त्रास देण्याचा प्रयत्न करतील. भागीदारी करताना सावध रहा. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून केलेली आर्थिक गुंतवणूक फायद्याची राहील. धोक्याची गुंतवणूक फायद्याची राहील.

5 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कर्क आहे.स्वभाव अतिशय संवेदनशील असल्यामुळे भोवतालचा परिसर व लोकांचा प्रभाव राहील. आत्मविश्वास दांडगा झाला की, घोडदौड थक्क करणारी राहील. जीवनाच्या पलीकडे जाऊन संशोधन करणे आवडेल. स्वतः घेतलेले निर्णय कार्यान्वित केल्यास प्रचंड प्रमाणात धनप्राप्ती होईल.

6 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. इतरांपेक्षा वेगळे असे तुमचे जीवन राहील. व्यक्तिमत्वात चुंबकीय शक्ती आहे. कोणत्याही करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. हाच जीवनाचा प्लस पॉईंट असेल. दैववादावर विश्वास असल्याने आपण कितीही प्रयत्न केला तरी शेवटी आपल्या दैवात असेल तसेच होईल. अशी धारणा राहील. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. विवाहाद्वारे पैसा आणि जायदाद दोन्ही प्राप्त होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com