Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

28 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. कुंडलीत मुख्यतः रवि आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. ज्यामुळे जीवनात अशा काही घटना घडतील की तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात याल. अंतस्फूर्तीचा देणगी जन्मतःच असल्याले भावी काळातील घटनांची अगोदरच चाहूल लागेल. त्याचा उपयोग नोकरी, धंद्याच्या फायद्यासाठी होऊ शकेल. जीवनात धनप्राप्तीचे बरेच अनपेक्षित प्रसंग येतील व त्यात तुम्हाला यश मिळेल.

- Advertisement -

29 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृषभ आहे. जीवनात चंद्र व नेपच्यूनचा प्रभाव अधिक असल्याने कल्पनाशक्ती प्रगल्भ राहील. याच्या जोरावर कला क्षेत्रात जोरदार मुसंडी माराल. संवेदनशील स्वभावामुळे भव्य निवासस्थानात राहण्यापेक्षा लहान पण स्वतःच्या मालकीच्या घरात रहायला जास्त आवडेल. आर्थिक स्थिती नेहमी वर खाली होत राहील. मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला तरी तो टिकवणे फार जड जाईल.

30 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. गुरूच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. ती प्राप्त करण्यासाठी वैचारिक व शारीरिक सामर्थ्य असल्याने प्रचंड उत्साहाने लक्ष्य प्राप्तीचा प्रयत्न कराल. ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्यात प्रचंड यश मिळवाल. अनेकांना रोजगार देण्याची क्षमता असेल. मोठ मोठ्या संस्थानांशी संंबंध असल्याने उत्तम यश मिळू शकेल. धनप्राप्तीच्या बाबतीत आदर्शवाद कार्यान्वित करण्यात यश मिळेल. त्यातून प्रचंड पैसा प्राप्त करून श्रीमंत व्हाल.

1 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. हुकूमत गाजवण्याची हौस वाटेल. योजना व कल्पना मौलिक असतील. वागणुकीत सौम्यपणा राहील. दूरदृष्टी चांगली असल्याने योजना कार्यान्वित करतांना त्याचे चित्र अंतचक्षुसमोर आधी स्पष्टपणे दिसत राहील. त्यामुळे सहज यश मिळेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने भाग्यवान आहे. उधळेपणामुळे पाण्यासारखा पैसा खर्च कराल.

2 मे – वाढदिवस असलेल्या चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमच्यावर कल्पनाशक्ती, रोमान्स, कलादृष्टी याचा जास्त प्रभाव राहील. साहित्य, कला, संगीत संबंधित कार्यात यश मिळेल. आर्थिक बाबतीत अचानक भाग्याची साथ मिळेल. कधी कधी एकदम त्याउलट परिस्थिती निर्माण होईल.

3 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट फार सुंदर आहे. यश स्वतःहून तुम्हाला शोधीत येईल. मात्र शुकाच्या छंदी फंदी वागण्याच्या आहारी न जाण्याचे पथ्य पाळले पाहिजे. सामाजिक व व्यापारी व्यक्तीशी जवळीक साधून त्या क्षेत्रात सहज पुढे जाऊ शकाल. आर्थिक बाबतीत फार भाग्यवान आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ आहे. मोठ्या प्रमाणात आखलेल्या योजनांत प्रचंड यश मिळेल.

4 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट आयुष्य इतरांपेक्षा बरेच वेगळे असणार असे सांगितले जाते. तत्वज्ञानी, लेखक, संगीतकार यांच्यासाठी ही चौकट फार चांगली आहे. कार्य करतांना जितकी परिस्थिती कठीण तितका उत्साह अधिक राहील. लक्ष्य प्राप्त कराल यात शंका नाही. आर्थिक स्थितीत बराच चढ उतार होत राहील. अन्य लोकांनी न चोखाळलेल्या मार्गाने पैसा मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या