किरोच्या नजरेतून

9 ते 15 जून 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

9 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. बुद्धीमत्ता तीक्ष्ण आहे. पण बोलतांना वाद करण्याची हौस राहील.स्पष्टवक्तेपणामुळे पुष्कळ शत्रु असतील. एखाद्या जनीत्राप्रमाणे तुमची उर्जा आजूबाजूला चमकत राहील. कौटुंबिेक संंबंध सलोख्याचे रहणार नाही. उतावळ्या स्वभावामुळे जास्त विचार न करता कोणत्याही आर्थिक योजनेत सहभागी व्हाल. असे धोके पत्करूनही यश मिळाल्यामुळे धनसंग्रह चांगला राहील.

10 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मिथून आहे. स्वभाव अत्यंत दयाळू आहे. व्यवहार सहानुभूतीपूर्वक असेल. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे त्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी जिवापाड मेहनत कराल. एकाच वेळी दोन प्रकारच्या कामातून धनप्राप्ती होईल. सदैव बेचैन असणे हा तुमचा स्थायी भाव आहे. आर्थिक क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवहारात अंदाज अचूक ठरतील.

11 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, बुध, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्तीचा प्रभाव राहील. नवीन विचारांचे आकर्षण वाटेल. भांडणें, विरोध इ. गोष्टींची घृणा वाटेल. कधी कधी विनाकारण त्रासदायक परिस्थितीस तोंड द्यावे लागेल. व्यावसायिक म्हणून चांगले यश मिळेल. पैसे मिळवणे यात आकर्षण वाटणार नाही. आवश्यकतेनुसार पैसा मिळतच राहील.

12 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी असल्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान कराल. ती पूर्ण होताच लगेच त्यापुढील लक्ष प्राप्त करण्यासाठी धडपड कराल. व्यवस्थापनात निष्णात असाल. तसेच पर्यटन विभागात नियंत्रणाचे काम ही सहज कराल. पैसा मिळवण्यासाठी विशेष धडपड करावी लागणार नाही. कती श्रमात अधिक धनप्राप्त कराल. धनसंग्रह करणे सोपे जाईल.

13 जून - वाढदिवस असलेल्या बुध, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. सहसा एकत्र न सापडणार्‍या हर्षल व बुध या ग्रहांच्या प्रभावामुळे जीवन इतरांपेक्षा वेगळ्या वळणावर राहील. नवीन कल्पना, मौलिक विचार आणि अंतस्फूर्ती यांच्यामधून भाव उलाढालीचे अचूक अंदाज काढता येतील. विद्युत क्षेत्र, भूकंप यांसारख्या विषयांवर अभ्यास करून अचूक अंदाज वर्तवाल. आर्थिक स्थिती चढ उतारीची राहील. अकल्पितपणे भाग्याचे दरवाजे उघडतील व बंदही होतील.

14 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. बुध अतिय प्रबळ असल्यामुळे बौद्धिक कामात चांगले यश मिळेल. कोणतेंही प्रश्न सोडविण्यासाठी इतरांचे लक्ष जाणार नाही असे उपाय शोधून आयुष्यात अनेेक संकटांपासून मुक्ती द्याल. धोकदायक योजनात भाग घ्याल व यशस्वी व्हाल. असामान्य कल्पनांमुळे पैसा मिळवून धनी होणे कठीण जाणार नाही. श्रीमंत लोकांत बोलबाला राहील.

15 जून - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. काही तरी विशेष करून जनतेसमोर उत्तम छबी व नावलौकीक वाढवण्याच्या दृष्टीने भाग्यवान आहात. अशा संधी तुम्हाला शोधत येतील. अनेक स्त्रोतांतून धनप्राप्ती होईल. संगीत, कला व साहीत्य क्षेत्रात उत्तम यश मिळेल. अर्थप्राप्तीच्या बाबतीत नेहमी नशीबाची साथ मिळेल. बक्षीस म्हणून व वारसाहक्कानेही अन्यजनाची मालमत्ता मिळण्याचे योग आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com