Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

6 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. आयुष्यात प्रेमविवाह, नातेवाईकांशी संबंध याचे फार महत्त्व राहील. व्यक्तीमत्वात विशेष आकर्षण असल्यामुळे अनेकांच्या संपर्कात रहाल. कौटुंबिक अडचणीमुळे प्रगतीत अनेक अडथळे येतील. धनसंग्रह करणे कठीण जाईल. पण हळुहळु का होईना बचत करून वृद्धापकाळात ठराविक उत्पन्न मिळावे अशी सोय कराल.

- Advertisement -

7 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जे काम मिळेल ते मनापासून करण्याच्या सवयीमुळे कोणत्याही करिअरमध्ये निश्चीतपणे प्रगती कराल. ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. आदर्शवादी व कल्पनाशक्ती असलेले आहात त्यामुळे वेगळ्याच विश्वात रंगून जाल. परदेशगमनाचे योग असल्याने प्रगती कराल.व्यवसायात आदर्शवादाचा प्रयोग कराल. त्यामुळे एका ठिकाणी राहण्याच्या ऐवजी अनेक ठिकाणी फिरावे लागेल.

8 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जीवनावर शनीचा प्रभाव राहील. आयुष्यात अनेक संकटे येतील. पण संघर्ष करत पुढे जावे लागेल. भरपूर सहनशक्ती व संयमाचे बळ राहील. महत्त्वाकांक्षा दांडगी असून ध्येय उंचीचे राहील. मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती झाली तरी इतरांच्या मानाने आर्थिक स्थिती विशेष चांगली राहणार नाही.

9 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळे, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. आयुष्यात पुढे जातांना वेगवान प्रगती होत असतांना अचानक काही उलट सुलट घडेल. वयाच्या 33 ते 35 वर्षाच्या काळात न आवडणारे काम करण्याची वेळ येईल. सरकारी अधिकारी किंवा महत्त्वाच्या पदावर पोहचणे शक्य होईल. पैसा मिळवण्यासाठी काही तरी अडथळे येतील. अथक परिश्रम करून आर्थिक परिस्थिती हळुहळु चांगली होईल.

10 जानेवारी- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल, शनि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. रवि व हर्षलमुळे व्यक्तीमत्वात इतरांपेक्षा वेगळेपणा निर्माण होईल. विचार स्वतंत्र असल्याने निर्माण कार्यात वैचारिकदृष्ट्या कोणाचीही उधारी नसेल. आर्थिक बाबतीत अत्यंत काटकसरी व सावध असल्याने सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक राहील. आर्थिक सुस्थिती चांगली राहील.

11 जानेवारी – वाढदिवस असलेल्या शनि,चंद्र, नेपच्यून या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. चंद्र व नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्ती चांगली आहे. भावी काळात घडणार्‍या घटनांची स्वप्नाद्वारे आधीच चाहूल लागेल. दिवास्वप्न पाहण्याची सवय महत्त्वाकांक्षी निगडीत असेल. जीवनावश्यक साधन म्हणून पैशाकडे पहाल. पैशाविषयी फारसे आकर्षण असणार नाही.

12 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. गुरूच्या प्रभावामुळे कामाच्या बाबतीत वृत्ती आक्रमक व सामर्थ्यशाली राहील. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. यशाबरोबर मत्सरामुळे विरोधक व शत्रुंची मांदियाळी तयार होऊन पाठीशी लागेल. प्लॅन मोठे असतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना चूक होणार नाही ही काळजी घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या