Saturday, May 11, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

5 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. कुंडलीत मुख्यतः रवि आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. तर्कशक्ती व निरीक्षणशक्तीही फार चांगली आहे. वागण्याची तर्‍हा स्वतंत्र बाण्याची आहे. वरवर इतरांशी सहज जमवून घ्याल पण प्रत्यक्षात त्यांना कामात ढवळाढवळ करू देणार नाही. उत्तम यश मिळेल. जीवनात अनेक बदल संभवतात. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत इतरांना नव्हे तर तुम्हाला स्वतःला कोडे पडेल आणि तरी आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल.

- Advertisement -

6 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. जीवनात प्रेमाला फार महत्व राहील. त्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असाल. ध्येय प्राप्तीसाठी वाटेल तो त्याग करायला तयार असाल. कलाक्षेत्रात विशेष चमक दाखवाल. आर्थिक बाबतीत आयुष्यात पुष्कळ संधी मिळतील. भाग्यवान असल्याने पैशासाठी मागे धावावे लागणार नाही. पैसाच तुम्हाला शोधत येईल.

7 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. गूढशास्त्रे, अध्यात्म, रहस्य यांचे जास्त आकर्षण असेल. सरावाने यात उत्तम प्रगती करू शकाल. विज्ञानाचे गोडी असल्यास वेगळे संशोधन करण्यात यश मिळेल. समाजकारण चांगले जमेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात बरेच कष्ट घ्यावे लागतील. उत्तरार्धात चांगले आर्थिक यश मिळेल. धनसंग्रह कराल.

8 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनि, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. तुमचे जीवन इतरांसारखे सरळ मार्गाने जाणारे नाही. एक तर सत्ता व संपत्तीकडे जाणारा मार्ग मिळेल किंवा उलट परिस्थिती निर्माण होऊ शकेल. कधी उन्नती तर कधी मार्गात अनेक अडथळे येऊन प्रगतीला अवरोध निर्माण होईल. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. त्वरीत धनप्राप्तीचे मार्ग नुकसानीचे राहतील.

9 मे – वाढदिवस असलेल्या चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आयुष्य अनेक महनीय घटनांनी भरलेले असेल. धैर्य दांडगे व इच्छाशक्ती प्रबळ आहे. त्याचा उपयोग चांगल्या अथवा वाईट कोणत्या कामासाठी कराल हे संगतीवर अवलंबून आहे. व्यवस्थापनात यश मिळेल. व्यापार, उद्योग, भरपूर धन मिळेल. मात्र धाडसी व हट्टी स्वभावावर अंकुश ठेवा.

10 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, रविे ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे.आत्मविश्वास दांडगा राहील. सृजनशीलता व मौलिकता वाखाणण्यासारखी आहे. स्वभाव शांत व सोज्वळ असेल. रागाचा पारा वर गेल्यास लवकर खाली येत नाही. नुकसान होण्याची भीती आहे. तुमचे यश इतके प्रभावी असेल की, त्यामुळे जनसामान्यात लोकप्रियता वाढेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. राहणीमान लक्झरी, ऐश्वर्ययुक्त व अतिव खर्चाचे राहील.

11 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. जीवनात चंद्राचा प्रभाव जास्त राहील. त्यामुळे कल्पनाशक्ती, भावनाप्रधानता, कलेकडील कल, अध्यात्मात जास्त रूची राहील. यागोष्टीचे आकर्षण राहील व जीवनावर मोठा प्रभाव राहील. साहजिकच साहित्य, कला, नाट्यशास्त्रात चांगले यश मिळू शकेल. आर्थिक बाबतीत सारखा चढउतार राहील. कधी कधी भाग्याची चांगली साथ मिळेल. तर कधी कधी त्याउलट अनुभव येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या