Sunday, May 5, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

16 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. नेपच्यून व चंद्र यांच्या युतीमुळे सामर्थ्यवान, प्रबळ, महत्त्वाकांक्षी आपलेच म्हणणे खरे करण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे. नेपच्यूनचा परिणाम मनावर जास्त होतो. त्यामुळे विचीत्र स्वप्ने, साक्षात्कार, आदेश, निरनिराळे मानसिक परिणाम मनावर जास्त होतो. नेपच्यून व चंद्र युतीमुळे गूढ कविता, चित्रकला, संगीत साहित्य निर्माण करता येते. गुरुचे अस्त्त्विामुळे या कल्पना महत्त्वाकांक्षेद्वारा प्रत्यक्षात उतरल्याच नसत्या. आर्थिक परिस्थिती इतरांपेक्षा वेगळी राहील. भरवश्याच्या आर्थिक संस्थांमध्येच गुंतवणूक करा.

- Advertisement -

17 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. शनी व गुरू एकत्रित आल्यामुळे नंबर 8 चा प्रभाव तुमच्यावर राहील. 8 हा अंक शनीचा आहे. करिअरच्या सुरूवातीला फार जास्त त्रास काढावा लागेल. महत्त्वाकांक्षा प्राप्त होण्यामध्ये अनेक अडथळे येतील. सहनशक्ती दांडगी आहे. उत्तम न्यायाधीश, वकील होऊ शकतात. आत्मविश्वास वाढल्यास चांगले यश मिळेल. अतिसावधानता असल्याने आपले पैसे सरकारी बँकेमध्ये गुंतवाल. तरीही काही कारणाने शेवटी प्रचंड तोटा संभवतो.

18 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. आशावादी आहात. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची वृत्ती आहे. नैसर्गिक वातावरण आवडते. विवाहानंतर भाग्योदयास सुरूवात. प्रवास करणे आवडते निरनिराळी स्थळे शोधण्याची फार इच्छा असते. अर्थप्राप्तीच्या बाबतीत अतिशय नशीबवान आहात.

19 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. व्यक्तीमत्व प्रसन्न, आशावादी व आनंदी आहे. सकारात्मक दृष्टीकोन असल्याने संकटावर सहज मात कराल. अतिउदार स्वभावामुळे काही लोक फसवतात. त्यामुळे आर्थिक टंचाईलाही तोंड द्यावे लागेल. कोणत्याही कामापासून पैसा मिळवणे छंद आहे. शेअर्ससारख्या धंद्यात कधी कधी मोठे नुकसान होईल. परत एखाद्या धंद्यात हळुहळु पैसा मिळवून श्रीमंत व्हाल यात शंका नाही.

20 डिसेेंंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. स्वभाव सौम्य, सभ्य व आशावादी आहे. भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखाकडे मन जास्त रमते. धार्मिकता, गूढशास्त्रे, याविषयी फार गोडी वाटते. यातून भावी घटनांची चाहूल लागेल. अंतस्फूर्ती असल्याने उत्तम ज्योतिषी होऊ शकाल. आथिर्र्क बाबतीत स्वभाव हटके असेल. कोणत्याही करिअरमध्ये सहजच उच्चपद प्राप्त होईल.

21 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या शनि,सूर्य, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. गुरू अतिशय प्रबळ असल्याने सूर्याबरोबर युती होणे सामर्थ्यवान बनवेल. कोणत्याही प्रकारच्या करिअरमध्ये असो चांगले यश मिळेल. व्यवस्थापनाचे कार्य चांगले जमेल. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. चलतीच्या काळातच वृद्धापकाळासाठी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.

22 डिसेेंंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. हर्षलच्या प्रभावामुळे जीवनात अनेक वळणांचा अनुभव येईल. हर्षल शनीचा जुळा भाऊ आहे असे म्हणतात त्यामुळे जीवन नेहमी नशीबावर अवलंबून राहील. बुद्धीमत्ता तीव्र असल्याने विशिष्ट विषय निवडून त्यात प्राविण्य संपादन करता येईल.आर्थिक परिस्थिती कधी कमी आवक तर कधी जास्त आवक अशी राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या