Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

19 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आपला जीवनपट स्वकष्टावर उभा कराल. तुमची सृजनशीलता आणि मौलिकता यांचा तुमच्या योजनात महत्त्वाचा वाटा असेल. शांत व संयमशील स्वभाव असला तरी कोणी मार्गात आडवे आल्यास क्रोधाचा स्फोट होतो. उच्च पदावर व जनसमूहाचे नेतृत्त्व करण्याच्या कार्यात यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात.

- Advertisement -

20 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकटीत चंद्र जास्त प्रभावी असल्याने स्वभाव सौम्य राहील. तुमचा कल अध्यात्म, गूढशास्त्रे यांच्याकडे जास्त राहील. साहित्य, कला, संगीत व अभिनयात चांगले यश मिळेल. सुंदर वस्तू गोळा करण्याचा छंद असेल. प्रवासाची आवड आहे.

21 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरु, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. महत्त्वाकांंक्षी स्वभाव असेल. उच्च दर्जाच्या लोकांशी जवळीक साधली पाहिजे. अन्यायाविरुद्ध बंड करण्याची हौस वाटेल. आर्थिक आघाडीबाबत कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. पैसा मिळवण्याची संधी शोधता येतील.

22 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. जीवनरथ इतरांपेक्षा वेगळा आणि चांगला राहील. तत्वज्ञानी, लेखक, संगीतकार अशा कामात यश मिळेल. भौतिकदृष्ट्या फार भाग्यवान आहात. जीवनात अनेक बदल संभवतात. अडचणींवर मात करणे चांगले जमेल. सहकार्‍यांच्या निदर्शनाखाली काम करणे जमणार नाही. आर्थिक बाबतीत तुमचे अनुभव इतरांपेक्षा वेगळे असतील.

23 मे – वाढदिवस असलेल्या बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. बुद्धीमत्ता तीव्र आणि मौलिक आहे. मानसिक जागरूकता तर्कशक्ती चांगली आहे. स्वभाव स्वतंत्र असला तरी सर्वांशी मिळून मिसळून वागाल मात्र त्याच्या प्रभावात तुम्ही कधी येणार नाही.

24 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध, चंद्र ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. भावना आणि संवेदना फार तीव्र आहे. स्वभावात भक्तीभाव असल्याने जीवनात कोणताही त्याग कराल. प्रेमाइतकीच तुमच्या मनात द्वेषाची भावना प्रबळ असते. त्यामुळे विरोधकांना सैतान असल्यासारखे वाटाल. टोकाची भूमिका घेण्याच्या कृतीवर नियंत्रण ठेवा.आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल.

25 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. विचीत्र वस्तुचा संग्रह करणे आवडेल. गूढशास्त्राबद्दल आकर्षण वाटेल. भावी घटनांचा भास होत राहील. एकाच प्रकारचे काम सारखे करत राहील्यास बेचैन वाटेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात बर्‍याच प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या