किरोच्या नजरेतून

13 ते 19 जानेवारी 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

13 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. हर्षल ग्रहाचा प्रभाव राहील. मते मौलिक असतील. स्वभाव स्वतंत्रताप्रिय राहील. त्यामुळे दुसर्‍यांच्या हाती काम करणे जड जाईल. अनेक गैरसमज होऊन दुसर्‍यांनी टिका केल्यामुळे आपण एकाकी आहोत असे वाटत राहील. अर्थप्राप्तीचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा राहील. मोठ्या प्रमाणात पैसा मिळूनही तो पाण्यासारखा खर्च केल्याने धनसंग्रह होणे कठीण.

14 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. कोणतेही काम शिकणे किंवा करणे सहज शक्य होऊन यश मिळेल. मात्र त्यामुळे करिअरच्या बाबतीत सुरुवातीला सारखे तळ्यात मळ्यात चालू राहील. सातत्य न टिकविल्यास करिअरमध्ये अनेक वेळा बदल घडवून येईल. कोणाशीही सहज मिसळण्याचा स्वभाव असल्याने सर्वांशी तुमचे चांगले पटेल. कर्जाची भिती वाटेल. गुंतवणूकीच्या बाबतीत तुमचे निर्णय अचूक असतील. पण शंकेखोर स्वभावामुळे तुमच्यपेक्षा इतर लोकच जास्त फायदा घेतील.

15 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जीवनात प्रेमविवाह, स्नेह याचे फार महत्त्व राहील. जीवनाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा राहील. व्यक्तीमत्वात संमोहनशक्ती आहे. इच्छाशक्तीत वृद्धी करून भौतिक प्रगतीसाठी तिचा उपयोग केल्यास जीवनात तुम्हाला यश उत्तम मिळेल. धन संग्रहाची आवड नसूनही हळूहळू का होईना प्रयत्नाने तुम्ही उत्तमप्रकारे धनसंग्रह करू शकाल.

16 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. मनाची ठेवण धार्मिक असल्याने कोणत्याही करिअरमध्ये असले तरी भक्तीमार्गाचे आकर्षण राहील. स्वभाव आदर्शवादी, कल्पना विश्वात रमणे असल्याने परदेशगमन सहज शक्य आहे. तेथे स्थायीक होण्याचाही योग आहे. कर्तृत्वामुळे भरपूर प्रसिद्घी व पैसा मिळेल. पण तो टिकवणे तुम्हाला जड जाईल.

17 जानेवारी-

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. तुमच्या जीवनावर शनीचा प्रभाव फार राहील. आयुष्यात सुरूवातीपासूनच अनेक अडथळे व विरोधाला तोंड द्यावे लागेल. दुसर्‍याकडून मदत मिळणे कठीण असल्यामुळे तुमची प्रगती स्वतःच्या कर्तृत्वाने करावी लागेल. सहनशीलता व निश्चयात्मक बुद्धीने यशस्वी व्हाल. सल्ल्याच्या जोरावर अनेक लोक श्रीमंत होतील. मात्र स्वतःसाठी त्याचा उपयोग न केल्याने धनप्राप्ती कठीण होईल.

18 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे जीवन नशीबाच्या प्रवाहात वर खाली होणारे राहील. सर्व काही सुरळीत चालू असतांना अचानक मधला काळ अडचणींनी भरलेला असेल. विशेषतः याचा अनुभव 33 ते 35 वयाच्या दरम्यान जास्त येईल. 35 व्या वर्षानंतर 60 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. या काळात उर्वरीत जीवनासाठी बेत करून ठेवल्यास चांगले राहील.

19 जानेवारी -

वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. सूर्य व हर्षल यांच्या प्रभावामुळे व्यक्तीमत्व विशिष्ट प्रकारचे व इतरांपेक्षा वेगळे राहील. तुमचे विचार मौलिक असतील. त्यातून अनेक विधायक कार्य पार पाडाल. बर्‍याच वेळा असे होईल की, यश मिळता मिळता हुलकावणी देईल. पण जीवनात यश मिळेल हे नक्की. स्वभाव काटकसरी असल्याने आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत फार सावधानता बाळगा. त्यातून पुढे कमाई होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com