किरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

11 ते 17 नोव्हेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

25 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. नेपच्यूनचा प्रभाव तुमच्या बुद्धीपेक्षा मनावर विशेषतः अंतर्मनावर जास्त राहील. त्यामुळे तुम्हाला भावी घटनासंबंधी सूचक स्वप्ने पडतील. त्याचा उपयोग करून तुम्ही आपल्या सहकार्‍यांबाबत अति संवेदनशील आहात. भोवतालच्या वातावरणाचा तुमच्यावर लवकर परिणाम होतो. वारसा हक्काने म्हणा किंवा अन्य प्रकारच्या बक्षीसाद्वारे तुम्हाला अर्थप्राप्ती होईल. रुपा गांगुली यांचाही वाढदिवस याच दिवशी असतो.

26 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. तुमची जीवनात उत्तम प्रगती होईल. अवैध व अनैतिक मार्गाने धनप्राप्ती केल्यास तुमच्या जीवनात अनेक संकटे निर्माण होतील. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाल्यास तुम्ही चांगल्याच मार्गाने जाल. आपले ते खरे मानण्याची व करण्याची तुमची वृत्ती राहील. चांगल्या मार्गाचा अवलंब केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. अन्यथा दारिद्य्राच्या गर्तेत कोसळाल.

27 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. सैन्यदलाचे करिअर तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्यात व्यवस्थापन कौशल्य आणि योजना कृतीत आणण्याची क्षमता चांगली आहे. सरकारी प्रशासन संबंधित खात्यातही तुमची उत्तम प्रगती होऊ शकेल. तसेच काहींना उत्तम शल्यविशारद होण्याची संधी मिळेल. आयुष्याच्या सुरुवातीला संघर्ष करून तुम्ही आपल्या जीवनात आर्थिक सुस्थिती प्राप्त करू शकाल.

28 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या चेहर्‍यावर एक प्रकारची झळाळी राहील. तुम्हाला राजकारणात उत्तम यश मिळू शकेल. सर्वांशी तुमची वागणूक सहानुभूतीपूर्वक राहील. संभाषणात विनोद पेरण्याच्या विशिष्ट शैली तुमच्या अवतीभोवती हास्याचे कारंजे उडत राहतील. त्यामुळे तुमची लोकप्रियता चांगली वाढेल. राजकारणी लोकांना आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. जीवनात यश प्राप्त होणार असल्यामुळे धनप्राप्तीच्या बाबतीतही तुम्ही यशस्वी व्हाल.

29 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. तुमचा चंद्र कमजोर असल्यामुळे कोणताही निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाईल. स्वतःच्या मनाला निर्णय घेण्याची सवय करवून घेतल्यास मात्र तुम्हाला जीवनात उत्तम यश मिळेल. विशेषतः करिअर निवडण्याच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कल्पनाशक्तीवर आधारीत कलात्मक कार्यात तुम्हाला उत्तम यश मिळू शकेल. दुसर्‍यावर लवकर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे बर्‍याच वेळा आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. विवाहाद्वारे पत्नीच्या नातेवाईकांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

30 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, बुध, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. गुरू आणि मंगळ यांची युती हा एक अतिशय सामर्थ्यवान योग आहे. कोणतेही करिअर घेतले तरी त्यात तुम्हाला महत्त्व प्राप्त होऊन उत्तम यश मिळेल. सुरुवातीच्या काळात तुम्हाला अनेक अडचणी व संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील. काहींच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र नियतीने हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या खांद्यावर संसाराचा भार लवकर पडेल. वाईटातून चांगले असे की त्यामुळे लहानपणीच जबाबदारी घेण्याची सवय तुम्हाला लागेल. इतरांची काळजी घ्यावी लागणे हा जणू काय तुमच्या जीवनाचा उद्देशच आहे. कोणत्याही प्रकारचे काम केले तरी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहील. पैसा मिळत असल्यामुळे त्यासाठी कराव्या लागणार्‍या अति श्रमाचा परिणाम होऊन स्वास्थ्यहानी होऊ नये याची काळजी घ्यावी.

1 डिसेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवी, गुरू, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनू आहे. तुमचा स्वभाव आनंदी असून दांडगा आहे. चेहर्‍यावर सदैव हास्य झळकत राहील. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही स्पष्टवक्ते आणि उदार आहात. नवनवीन कल्पना कृतीत आणण्याचे धाडस तुमच्यात आहे. एखाद्या ठिकाणी अपयश झाले तर लगेच उद्योगाचा मार्ग बदलून तुम्ही दुसरा उद्योग सुरू कराल. काही झाले तरी शेवटी यशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल. यात शंका नाही. तुमच्याजवळ आध्यात्मिक शक्ती असून अंतर्ज्ञानाने समोरची व्यक्ती कशी आहे ते तुम्हाला लगेच समजते. त्यामुळे तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. तुमची कर्तृत्वशक्ती दांडगी आहे. मात्र दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे तुम्हाला जमत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com