किरोच्या नजरेतून

18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

18 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यासाठी लष्कर व पोलीस खात्यात काम करणे प्रगतीचे राहील. तसे झाले नाही तरी तुमच्या कोणत्याही करिअरमध्ये तुम्ही आपली लष्करी वृत्ती दाखविल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात उत्तम नेता म्हणून तुम्हाला चांगले यश मिळेल. सुरूवातीला संघर्ष केल्यावर आर्थिक बाबतीत तुम्हाला प्रचंड यश मिळेल. त्यानंतर मात्र पुन्हा तुमची पिछेहाट कधीच होणार नाही. दारासिंग यांचाही वाढदिवस याच दिवशी असतो.

19 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास वृश्चिक आहे. सुर्याच्या प्रभावामुळे तुमची शारिरीक व मानसिक शक्ती चांगली राहील. राजकारणात तुम्हाला उल्लेखनीय यश मिळू शकेल. बोलण्यातून विनोदाची पखरण करण्याची सवय असल्याने तुमच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती हास्याच्या कारंजाचा आनंद घेतील. मात्र तुमची दुसर्‍याचे दोष आपल्या तिरकस शैलीने उघड करण्याची सवय शत्रू निर्माण करू शकेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्तम यश मिळेल. पैसा मिळविणे तुमच्यासाठी अवघड नसले तरी तो टिकवून धरणे जड जाईल.

20 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सुर्यरास वृश्चिक आहे. कमजोर मंगळ आणि चंद्र यांच्या विचित्र मिश्रणाने तुमच्या स्वभावात बराच विरोधाभास निर्माण होईल. तुमच्या मनात नक्की काय आहे. हे ओळखणे कठीण आहे. नेमके कोणते करिअर करावे याचा निर्णय घेणे तुम्हाला जड जाईल. त्यामुळे एका करिअरमध्ये शिरून उत्तम नावलौकिक प्राप्त कराल. विशेष काळजी घेतली नाही तर आर्थिक बाबतीत तुम्हाला सतत चिंता वाटत राहील.

21 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास वृश्चिक आहे. गुरू आणि मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे जिवनात यश मिळवून समाजात महत्त्व प्राप्त करणे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला सोपे जाईल. तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील. त्यामुळे बर्‍याच कौटुंबिक जबाबदार्‍या तुम्हाला सांभाळाव्या लागतील. अनेक लोकांचा सांभाळ करणे हे जणू तुमच्या पाचवीलाच पुजलेले असेल. आर्थिक बाबतीत तुम्ही नशिबवान आहात. मातीचे सोने करण्याची क्षमता तुमच्याजवळ आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळवून तुम्ही श्रीमंत व्हाल.

22 नोव्हेंबरला - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, हर्षल, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास वृश्चिक आहे. हर्षल व मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या जिवनात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे घडत राहील. विशेषतः गुढ-शास्त्रांचे तुम्हाला फार आकर्षण वाटत राहील. नाविन्याची हौस असल्यामुळे नवनविन प्रदेश पाहण्यासाठी बराच प्रवास घडेल. मात्र ही वृत्ती प्रेमाच्या बाबतीत धोकादायक असल्याने प्रेमात व वैवाहिक जिवनात सातत्य टिकविणे कठीण जाईल. मनावर ताबा ठेवण्याची सवय केल्यास अशा संकटांपासून संरक्षण मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अतिशय सावध राहणे आवश्यक आहे. दुसर्‍याने दिलेल्या आश्वासनावर विसंबून राहू नये.

23 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुुध, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास धनु आहे. बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या बुद्धीमत्तेत विलक्षण सामर्थ्य राहील. व्यवस्थापनाचे कौशल्य तुम्ही सहज आत्मसात करू शकाल. सहकार्‍याची पारख करणे तुम्हाला फार चांगले जमेल. काहीसा संशयी स्वभाव असल्यामुळे सहकार्‍यावर विश्वास टाकणे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने धनप्राप्ती होईल. कल्पनाशक्ती प्रेमाच्या जोरावर कलेद्वारे धनप्राप्तीही होऊ शकेल. रझा मुराद यांचाही वाढदिवस यादिवशी असतो.

24 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्यरास धनु आहे. प्रेमातील खाचखळग्यांचा प्रश्न सोडला तर तुमच्या जिवनावर असलेला शुक्र आणि गुरू यांचा प्रभाव अन्य बाबतीत फायद्याचा राहील. तुमचे व्यक्तिमत्त्व सर्वांना हवेहवेसे वाटेल. नातेवाईकांना मदत करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तुमची तयारी राहील. आर्थिक बाबतीत तुम्ही नशिबवान रहाल. मात्र स्वतःच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहिले पाहिजे. ऐश्वर्याची आवड असून धन संग्रहात तुम्हाला यश मिळेल. कुणाल गोस्वामी यांचाही वाढदिवस याच दिवशी असतो.

Related Stories

No stories found.