किरोच्या नजरेतून

28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

28 ऑक्टोबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. जीवनावर शनिचा मोठा प्रभाव राहील. समाजात महत्त्व प्राप्त होईल. सुर्याच्या प्रभावामुळे न्यायशील रहाल. इतरांच्या भांडणात शांतीदूताची भूमिका बजावून त्यांच्यात समेट घडवून आणाल. दुसर्‍यासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार असाल. आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

29 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ, शनि, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. अगोदरच स्वप्नाद्वारे वा अन्य मार्गाने सूचना मिळत राहतील. वैयक्तिक निर्णय कोणताही निर्णय दुसर्‍याच्या आधारावर घेऊ नये. स्वतः विचार करून घेतलेल्या निर्णयाने उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

30 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरूसारख्या अत्यंत शुभ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे महत्त्वाकांक्षा मोठी राहील. सामान्य करिअरमध्ये समाधान होणार नाही. लक्ष्य नेहमी उच्चपदाकडे असेल. मोठ मोठ्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन नीटपणे पार पाडू .शकाल. न्यायशील वृत्ती असून स्वभाव अत्यंत दयाळू आहे. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ उत्तम आहे.

31 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ,सूर्य, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असल्यामुळे क्रियाशीलता प्रचंड राहील. केवळ स्वतःचाच नव्हे तर अनेकांंचे संसार चालावे असा तुमचा उद्योग असेल. राजकारणात भाग घेतल्यास विशेष यश प्राप्त होईल. आर्थिक बाबतीतही जीवनात उत्तम यश मिळेल. पैसा मिळवण्यापेक्षा तो टिकवणे जड जाण्याची शक्यता आहे.

1 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, नेपच्यून, चंद्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक तुला आहे. तुमच्यावर प्रभाव टाकणारा चंद्र स्वतः कमजोर असल्याने तुमच्या स्वभावात विरोधाभास असेल. निर्णय घेण्याच्या बाबतीत तळ्यात मळ्यात न करता निश्चित निर्णय घेण्याची सवय लावल्यास जीवनात उत्तम यश मिळू शकेल. करिअरच्या बाबतीत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा जीवन भरकटत जाईल. आर्थिक बाबतीत विशेष काळजी न घेतल्यास त्याविषयी सतत चिंता वाटत राहिल. इस्टेट व पैसा दोन्ही बाबतीत स्थिती नेहमी वर खाली होत राहील.

2 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. या ग्रहांची चौकट यश व महत्त्व मिळवून देईल. आत्मविश्वास फार दांडगा आहे. आपण जे करतो ते योग्यच आहे अशी तुम्हाला खात्री असते. यामुळे जबाबदारीचे काम तुम्हाला देण्यात येऊन ते तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल. सुरूवातीच्या काळात अनेक अडथळे येतील. पण हळुहळु ते सर्व पार पाडू शकाल. कोणत्याही कामात धनप्राप्ती होण्याची पूर्ण शाश्वती आहे.

3 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. हर्षल व मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपले जीवन इतरांपेंक्षा वेगळ्या वळणावर नेऊन यशस्वी व्हाल. विशेषतः संशोधनाच्या कामात चांगले यश मिळेल. पण दुर्दैवाने कुसंगतीत पडल्यास वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. मौलिक कल्पनातून विपुल धनप्राप्ती होईल.

- सौ. वंदना अनिल दिवाणे

Related Stories

No stories found.