Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

23 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, बुध, चंद्रया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. प्रत्येक कामात व्यक्तीमत्वाची छाप असेल. प्रगती नशीबावर अवलंबून असेल. शत्रु कोर्ट केेसेसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकरणातून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्याची वेळ येईल. आर्थिक बाबतीत फार सावध रहाल. त्यामुळे आर्थिक स्थितीचा आलेख हळुहळु वर जाऊन श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

- Advertisement -

24 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास कर्क आहे. बुद्धी तीक्ष्ण राहील. त्यामुळे वादविवादाची खुमखुमी राहील. मोकळ्या मनाचे व स्पष्ट वक्ते आहात. त्यामुळे शत्रुसंख्या मोठी असेल. नवीन संशोधनात यश मिळेल. व्यकतीमत्व सभोवर उत्साहाच्या पाकळया उधळेंल. उतावळ्या स्वभावामुळे घाईने निर्णय घेऊन धोका असलेल्या आर्थिक उलाढालीत भाग घ्याल व त्यातही चांगले यश मिळेल.

25 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,रवि,हर्षल, बुध, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. सर्वांशी संबंध सहानुभुतीचे राहतील. मात्र कधी इतरांनी केलेल्या स्तुतीमुळे हुरळून जाऊन नुकसान करून घ्याल. कशाही प्रकारची कठीण परिस्थिती असली तरी चांगल्या प्रकारे हाताळू शकता. महत्त्वाकांक्षेच्या आड अनेंक संकटे येतील आणि या सर्वांवर मात करून आपले लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. मात्र बरीच धडपड व प्रयत्न करावा लागेल.

26 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली आहे. नवीन कल्पना व नवीन विचारांचा योस आहेश उदारमतवादी असल्याने वागणे सहानुभूतीपूर्वक राहील. भांडण, मारामारी याचा तिटकारा आहे. पण यात गोवण्याचा शत्रू प्रयत्न करतील. साहित्य व इतिहासाची आवड राहील. धनाबद्दल मुळीच आकर्षण राहील. तीक्ष्ण बुद्धीमुळे आवश्यक तेवढे धन प्राप्त होत राहील.

27 जून – वाढदिवस असलेल्या बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. स्वभावातील सौम्यपणा व कल्पनाशक्ती हे विशेष जाणणारे गुण आहे. भांडण, मारामारी याची अ‍ॅलर्जी आहे. साहित्य आणि इतिहासाचे आकर्षण आहे. पैसा मिळवण्याचे जास्त आकर्षण नाही. गरजेपुरता पैसा मिळवून समाधानी रहाल.

28 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे या एकाच विचाराने आयुष्यभर झपाटलेले रहाल. ती पूर्ण होताच आणखी यशाची शिखरे निर्धारीत करून ती गाठण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत जीवनात सहज यश प्राप्त होईल. धनसंग्रह प्रचंड असेल.

29 जून – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, चंद्र, सूर्य, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली आहे. प्रगतीची स्वप्नं रंगवण्याची आवड आहे. प्रत्येक कमात उत्साह वाटेल. कामाचा प्रकार असा असेल की, त्यामुळे प्रसिद्धी मिळेल व जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. आक्रमक वृत्ती व बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण होतील. घाईत निर्णय घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा विचारपूर्वक गुंतवणूक करा. नुकसान होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या