Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

7 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, मंगळ, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची ही विचित्र चौकट जीवनात बराच गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आहे. धर्म व सामाजिक चालीरिती याबद्दल स्वतंत्र असे विचार राहतील. प्रवासाची आवड वाटेल. एके ठिकाणी रहाण्याचा कंटाळा येऊन बेचैन व्हाल. आर्थिक स्थिती वरवर पहाता फार वरखाली होणार आहे असे वाटत असले तरी मधून मधून मोठ मोठ्या रकमा मिळत रहातील.

- Advertisement -

8 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. दोन विरुद्ध गुणांच्या ग्रहांचा प्रभाव पडल्याने जीवन अस्थिर राहू नये म्हणून सावधानता बाळगा. लक्ष गाठतांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागेल. एकाकी स्वभावामुळे इतरांबरोबर आर्थिक बाबतीत सहकारी म्हणून काम करणे जमणार नाही. त्यामुळेच आर्थिक स्थिती चांगली राहील.

9 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. विचार व कृतीच्या बाबतीत स्वतंत्र बाणा असेल. दुसर्‍यांनी बंधने लादण्याचा प्रयत्न केल्यास झुगारून द्याल. स्पष्टपणे आपली मते प्रगट कराल. भांडणाची खुमखुमी राहील. खेळाची आवड आहे. अपघातांपासून सावध रहा. विविध उद्योगांद्वारे विपुल धनप्राप्ती कराल.

10 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट एवढी मजबूत आहे की, यश मिळवणे जड जाणार नाही. अंगातील गुण बालपणीच प्रकट होतील. भागीदाराशिवाय काम करणे फायद्याचे राहील. दुसर्‍याच्या निदर्शनाखाली काम न करण्याच्या सवयीमुळे अनेक शत्रु निर्माण होतील. आर्थिक स्थितीत बराच चढ उतार राहील. कारण आवाक्याबाहेरील योजना कायान्वित करण्याचा स्वभाव.

11 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. स्वभावात दोन विरूद्ध प्रकारचे गुण एकत्रित झालेले आहेत. कल्पना मौलिक व परंपरेच्या विरूद्ध जाणार्‍या असतील. कधी इतरांशी प्रेमाने वागाल तर कधी प्रेमाचा अतिरेक कराल. मौलिक प्रतिभाशक्तीने स्वतःचे विश्व निर्माण कराल. कार्यक्षेत्रात वारंवार बदल करत रहाल. एकाच प्रकारच्या कामात गुंतून रहाण्याचा कंटाळा आहे.

12 एप्रिल- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. वरील दोन ग्रह एकत्र आल्यामुळे एक सामर्थ्यवान मिश्रण व्यक्तीमत्वात तयार होईल. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. आपले लक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल. लष्करशाही वृत्ती असूनही विचार ठाम असतील. तुम्ही तयार केलेल्या योजनेबद्दल मुळीच शंका वाटणार नाही. कोणत्याही कार्यक्षेत्रात उतरले तरी चांगले यश प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत फार भाग्यवान आहात. धनसंग्रह करणे जमेल. नोकरी, उद्योग, व्यापार तीनहीत यश मिळू शकेल.

13 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, हर्षल, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, जीवनात अशा काही वेगळ्या घटना घडतील. ज्यामुळे विरोधाभास निर्माण होतील. अकल्पित घटना घडतील. करिअर आणि योजनांमध्ये अनेक बदल होतील. त्यातून आपल्या आवडीचा एकच मार्ग निवडा. एकट्याने आर्थिक प्रयत्न केल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या