किरोच्या नजरेतून जन्मतारखेनुसार भविष्य..

21 ते 27 ऑक्टोबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून जन्मतारखेनुसार भविष्य..

21 ऑक्टोबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरु, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. गुरुच्या प्रभावामुळे सामर्थ्यवान व्यक्तीमत्वाद्वारे तसेच महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धीचा उपयोग यशप्राप्तीसाठी चांगला होईल. महत्त्वाकांक्षा मोठी असल्याने सामान्य पदाकडे ढुंकूनही पाहणार नाही. व्यापार, फायनान्स व इंडस्ट्रीतून उत्तम यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत मिळेल.

22 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. हर्षल शनिच्या एकत्रित प्रभावामुळे वैयक्तिक भावी घटनांवर काहीच नियंत्रण ठेवता येणार नाही. शुक्र कमजोर असल्यामुळे प्रेमविवाहाच्या बाबतीत अनेक विचीत्र अनुभव येतील. शिवाय सहकारी अनेक वेळा अडचणीत टाकायचा प्रयत्न करतील. जीवनाच्या पूर्वार्धात आर्थिक प्रगतीत अडचणी येतील. उत्तरार्धात आर्थिक सुस्थिती राहील.

23 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, बुध, शुक्र, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. प्रबळ शनिच्या प्रभावामुळे प्रेमाच्या बाबतीत खाचखळगे अनुभवास येतील. दुसर्‍यासाठी जीवापाड मेहनत करून व त्याग करूनही ज्यांचावर उपकार केला त्यांच्याकडून प्रेमाचा शब्द ऐकावयास मिळणार नाही. त्यामुळे असामान्य बुद्धीमत्ता कुचकामी ठरेल. विचार उच्च असून कोणत्याही प्रकारचा हीनपणा आवडणार नाही. तुमच्या सल्ल्याने अनेक लोक श्रीमंत होतील. तोच सल्ला स्वतःसाठी वापरला तर उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

24 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. शुक्राच्या प्रभावामुळे मित्रांची संख्या मोठी असेल. अनेक प्रेम प्रकरणे संभवतात. त्यातून प्रेमात ’पडणे’ याचा खरा अर्थ कळून येईल. साहित्य, संगीत, चित्रकला काव्य, नाटक अशा प्रकारच्या कलांमध्ये उत्तम यश मिळू शकेल. आर्थिक गुंतवणूक आणि योजनाबद्ध उद्योगातून आर्थिक यश मिळण्याच्या बाबतीत अतिशय भाग्यवान रहाल.

25 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, नेपच्यून, शनि, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक तुला आहे. अतिशय विलक्षण व तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे धनी आहात. एक पथ्य पाळल्यास जीवनाचे सोने करू शकाल ते म्हणजे, समतोल राखण्याच्या बाबतीत स्वतःवर कडक नियंत्रण ठेवणे हे होय. प्रतिभेचा स्पर्श झालेली लेखनी काव्य, साहित्य यासारख्या कलात असामान्य यश मिळेल. आर्थिक स्थिती सदैव वरखाली होत राहील. काही दिवस श्रीमंती तर काही दिवस गरीबी असे चक्र अव्याहतपणे चालू राहील.

26 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या मंगळ, शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असल्यास किंवा ज्या कामात जास्त कष्ट करावे लागतात असे काम नसल्यास जीवन सुखात जाईल. बुद्धीमत्ता तीक्ष्ण आहे. एखाद्या गंभीर विषयाचा सखोल अभ्यास करण्यात जास्त रस वाटेल. आर्थिक बाबतीत वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असल्यास जीवन सुखात जाईल.

27 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाचा प्रभाव करिअरच्या दृष्टीने जीवनाम फारच महत्त्वाचा राहील. उतावळेपणामुळे त्वरीत निर्णय घेतल्याने व वादावादीची हौस असल्याने अनेक शत्रु निर्माण होतील असे होऊ नये म्हणून इतरांशी वागतांना चातुर्याचा उपयोग करण्याची सवय लावून घेेणे चांगले. वकिलीमध्ये उत्तम यश मिळेल. व भरपूर पैसाही मिळेल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com