किरोच्या नजरेतून जन्मतारखेनुसार भविष्य..

14 ते 20 ऑक्टोबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून जन्मतारखेनुसार भविष्य..

14 ऑक्टोबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य तुला आहे. ग्रहांची चौकट अतिशय मनोरंजक असून त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व सामर्थ्यवान होईल. शनी प्रबळ असल्याने शुक्र कमजोर असल्याने प्रेमाच्या बाबतीत फार विचीत्र अनुभव येतील. कौटुंबिक जबाबादार्‍या पार पाडताना स्वतःकडे लक्ष देणे होणार नाही. तुमच्या सल्ल्याच्या आधारावर तुमचे मित्र धनी होतील तीच निर्णय बुद्धी स्वतःसाठी वापरा धनवान व्हाल.

15 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. शुक्राच्या प्रभावामुळे लोकप्रियता मिळेल. मित्रांची संख्या जास्त राहील. व्यक्तीमत्वात एकप्रकारची संमोहनशक्ती आहे. समाजात प्रतिष्ठा व मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक गुंतवणूकीबाबतीत नशीबवान असाल. स्वविचाराने केलेली उलाढाल जास्त फायदेशीर असेल.

16 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. मिळालेल्या यशाची हवा डोक्यात न शिरू देता मनाचा समतोल राखू शकलात तर जीवनात उत्तम प्रगती होऊ शकेल. कल्पनाशक्ती चांगली असल्याने काव्य. साहित्य,चित्रकला यासारख्या कलांमध्ये प्रचंड यश मिळेल. आर्थिक स्थिती चढ उताराची असेल. कधी एकदम श्रीमंत तर कधी सामान्य स्थिती अस चक्र सारखे चालू राहील.

17 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. वारसाहक्काने संपत्ती मिळाल्यास जास्त शारिरीक श्रम पडणार नाहीत. व जीवन सुखाचे राहील. बुद्धीमत्ता तीक्ष्ण असल्याने सामान्य माणस ज्या विषयाचा अभ्यास करणे टाळतात त्याचा सखोल अभ्यास करून त्यापासून मोठा नावलौकीक प्राप्त होईल. डॉक्टर वैज्ञानिक, राजकारण यात यश मिळेल. वारसाहक्काने संपत्ती मिळाल्यास आर्थिक स्थिती उत्तम. अन्यथा आय व व्यय यांचा मेळ बसविण्यात ओढाताण होईल.

18 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. उतावळ्या व तर्कटी स्वभावामुळे अनेक भांडणे निमार्र्ण होतील. शत्रुंची संख्या मोठी राहील. वकील किंवा राजकारणी म्हणून या स्वभावामुळे चांगले यश मिळू शकेल. पण तेथेही कलहाच्या अतिरेकामुळे शत्रुपक्षाकडून प्रगतीत अडथळे येतील. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळू शकेल.

19 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल, शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रासे तुला आहे. सूर्याचे शुक्र. शनि, हर्षलशी मिश्रण झाल्याने बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण असेल. शिवाय ज्ञानग्रहणशक्तीचा वेगही वाढलेला आहे. विचारवंत असूेन निसर्गाचे वेड आहे. उद्योगशीलतेमुळे कोणत्याही नोकरी व्यवसायात उत्तम यश मिळेल. अर्थप्राप्तीच्या दृष्टीने फार भाग्यवान आहात. सर्वांचा विश्वास संपादन केल्याने आर्थिक यश उत्तम राहील.

20 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे स्वप्नाद्वारे किंवा अन्य मार्गाने पुढील सूचना मिळत राहतील. ज्याचा उपयोग तुम्ही योजनात केल्यास उत्तम यश मिळेल. दुसर्‍याने केेलेली टीेका तुमचे मन संवेदनशील असल्याने झोंबेल. पण भविष्याचा विचार करून कार्य चालू ठेवा. व्यापार अथवा रूळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःच्या विशिष्ट गुणांचा वापर करून उत्तम आर्थिक यश मिळेल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

Related Stories

No stories found.